कविता- लेखणी

Poem About Pen
कविता-लेखणी


बाळ जातो शाळेत
हर्ष झाला मनी
दप्तर पाटी हाती त्याच्या
सोबत असे लेखणी

अ आ इ ई अक्षरे गिरवितो
लेखणी संगे मैत्री करितो
जणू जीवनाचे शिल्प घडवितो

हीच लेखणी करी
शिक्षणाची सुरुवात
सुयोग्य दिशेने पडे पाऊल
होतो व्यक्तिमत्व विकास

शिक्षणाचा श्री गणेशा
भविष्याला आकार
याच लेखणीने होतात
जीवनाची स्वप्ने साकार


छाया राऊत बर्वे
अमरावती