पेरूचा मेथांबा

पेरूचा मेथांबा रेसिपीज इन मराठी
पेरूचा मेथांबा

सध्या बाजारात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पेरूचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढीला आळा बसतो. शिवाय पचनशक्ती देखील वाढते.
साहित्य
अर्धा किलो पिकलेले पेरू, एक छोटा चमचा मेथी दाणे, लसूण जिरे पेस्ट, हिरवी मिरची, हळद ,मीठ .गूळ आवडीप्रमाणे.
कृती
प्रथम पेरू स्वच्छ धुऊन त्याचे चार भाग करा. त्यातल्या बियांचा भाग काढून टाका. पेरूच्या लहान लहान फोडी करा. मेथीदाणे भाजून त्याची भरड पूड करा. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका. तेलात मेथी दाण्याची भरड पूड, लसूण जिरे पेस्ट, हिरवी मिरची, मीठ, व आवडीप्रमाणे गूळ घालून थोडा वेळ शिजू द्या.
हा पेरूचा मेथांबा भाकरी वा वा
चपात्यांसोबत छान लागतो.

चला तर मग करा रेसिपीला सुरुवात.
मस्त खा.
स्वस्थ रहा. व्यस्त रहा.
सौ.रेखा देशमुख