फुलतो मळा व्यथांचा

फुलतो मळा व्यथांचा बहरून घाव येतो दुःखास ह्या पिकाचा पोसून भाव जातो शेतात मीच हल्ली चारून ढोर येतो मी रोज दोष हल्ली मजलाच देत जातो
फुलतो मळा व्यथांचा


फुलतो मळा व्यथांचा बहरून घाव येतो
दुःखास ह्या पिकाचा पोसून भाव जातो

शेतात मीच हल्ली चारून ढोर येतो
मी रोज दोष हल्ली मजलाच देत जातो

फितुरी ऋतू ढगांचा काट्यास साथ देतो
या कोरड्या जिवाच्या हृदयात खोल जातो

गळक्या घरास माझ्या जाणून त्रास देतो
हिसकून सौख्य अवघे सांधून दुःख जातो

डोळ्यात आसवांना घालून बांध येतो
बांधावरील माती चोरून कोण जातो ?

माझ्याच प्रार्थनेला भलताच कौल येतो
एकेक घाव माझा आबाद होत जातो


©® कोमल पाटील