प्रेमावरचा विश्वास (भाग १)

कथा मालिका
प्रेमावरचा विश्वास

"स्वाती उठतेस का जरा ? कोण आलय बघतेस का?" मृणाल ताईंनी आवाज दिला. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत स्वातीला उठवू लागल्या.

"कोण आलं आहे तेही मला भेटायला? "

"अग डॉ. किरण आहेत. उत्तम फिजिओथेरपीस्ट आहेत. तुझ्यासाठीच मी बोलावले आहे त्यांना."

"डॉ. किरण आत या. प्लीज.."

"माई नको ना."

"घाबरू‌ नकोस. मी आहे तुझ्यासोबत."

"हॅलो, मिस. स्वाती."

स्वातीने घाबरून पहिले तिचा चेहरा झाकून घेतला.

"तुम्ही तुमच काम सुरु करा डॉ. किरण."

"हो ताई तुम्ही काळजी करू नका."

डॉ. किरण यांनी त्यांची बॅग उघडली आणि व्यायाम करण्याचे काही साहित्य बाहेर काढले.
स्वाती सगळ बघत होती.‌

डॉ. किरणने ट्रीटमेंट सुरु केली. प्रथम स्पंजी बाॅल तिच्या हातात दिला आणि बोटांची हालचाल करण्यासाठी तिचा हात हातात घेतला. तर तिने हात झटकून घेतला.

"माईचा हात तिने घट्ट धरून ठेवला. माई नको ना हे सगळ?"

"हे बघ मी तुझ्यासोबत आहे. तुला लवकर बर व्हायच आहे ना. मग ते सांगतील तसे कर."

नाईलाजाने स्वाती तयार झाली आणि ट्रीटमेंट करून घेऊ लागली.‌

मृणालिनी ताई एक उत्तम समाजसेविका. मुलींसाठी त्यांनी महिलाश्रम उघडले होते. एका दिवसाच्या बाळापासून ते अगदी निराधार झालेल्या किंवा विधवा असलेल्या महिलांसाठी त्यांचा आश्रम ही सुरक्षित जागा होती. तेथीलच काही महिलांना संपूर्ण आश्रमाची जबाबदारी वाटून दिली होती. त्यामुळे सगळ काही सुरळीतपणे चालू होत. अशातच स्वातीने या आश्रमात प्रवेश केला होता.‌

"कस वाटतय मिस स्वाती. फार त्रास नाही ‌ना होत आहे. थोड दुखेल काही दिवस नंतर हालचाल करता येईल."

स्वाती मात्र एका निर्जीव देहाप्रमाणे बसून होती. हात आणि पायाला असंख्य वेदना होत असुनही तोंडातून चिक्कार शब्द बाहेर पडत नव्हता. जणु तिच्या भावना आणि संवेदना मरून पडल्या आहेत. पण डॉ. किरण स्वतः चे काम चोखपणे करत होते. दीड तासानंतर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट थांबवली.

"स्वाती तू आराम कर आता मी आलेच."

माई आणि डॉ. किरण खोलीच्या बाहेर आले.

"माई मला तुमच्याशी बोलायचे आहे." डॉ.किरण

"हो बोल ना किरण. तू काय माझ्यासाठी नवीन आहे."

"माई गेल्या तीन वर्षांपासून मी फिजिओथेरपीचे काम करत आहे. पण ही केस वेगळीच आहे."

"म्हणजे ? स्वाती बद्दल काही विचारायचे आहे का? "

"हो. तरच मला त्यांच्याशी संवाद साधता येईल.
म्हणजे त्यांचे वागणे भितीदायक आहे. त्यांना माझा स्पर्श सुध्दा नकोसा वाटत होता.‌ फार संकोच वृत्तीने त्या वागत होत्या. त्यांनी त्यांचा चेहरा सुद्धा .... मला असं वाटतं त्यांची हिस्ट्री कळली तरच मी नीट उपचार करू शकेल. त्यांचा मानसीक समतोल साधावा लागेल. कारण आज फक्त एक दिवस झाला. त्यांना बराच त्रास आहे आणि अशा पध्दतीने जर त्या वागल्या. तर फार वेळ लागेल त्यांना बरे होण्यासाठी."

डॉ. किरण तुम्हाला सांगावेत लागेल. फार सोसल आहे त्या मुलीने. अगदी थोडक्यात बचावली. माझी फार ओळख नाही. कारण आताच मी तिला माझ्या आश्रमात घेऊन आली आहे. पण तिने जे सांगितले आहे. ते ऐकून मी फारच हवालदिल झाली आहे. अंगावर काटा उभा राहतो. तिचे शब्द ऐकून.

माईंना शब्दही सुचत नव्हते. माई काय सांगतात स्वाती बद्दल. पाहुया पुढच्या भागात...

©® अश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all