प्रेमावरचा विश्वास (भाग २)

कथा मालिका
प्रेमावरचा विश्वास

"हे बघा डॉ.किरण.."

"माई एक मिनिट...मला अहो जाहो नका करू. मला अवघडल्यासारखे वाटते."

"ठीक आहे."

"माई पटकन सांगा. माझी उत्सुकता ताणल्या जात आहे. "

"ऐक. स्वाती एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी. बी.ए. झालेली. संगिताची अतिशय आवड. आवाज अतिशय सुंदर. पण प्रेमात पडली आणि सगळ संपल. प्रेमावर असलेल्या विश्वासानेच तिचा विश्वासघात केला.

"म्हणजे? "

"अरे, प्रेम फक्त शारीरिक आकर्षण नसत ना. पण स्वातीच्या बाबतीत तेच घडले. स्वाती बारावी उत्तीर्ण झाली आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला.‌ तिथेच तिची विवेक नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली. हळूहळू अभ्यासाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीसाठी सुरु झाल्या आणि भेटीच रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात ती इतकी वेडी झाली की दोघांच्याही घरून जबरदस्त विरोध असतानासुद्धा ती ऐकायला तयार नव्हती. त्या विरोधामुळे ती विवेक सोबत पळून गेली. दोघेही मुंबईला गेले. तिथे एका मित्राच्या मदतीने खोली भाड्याने घेतली. भातुकलीच्या संसाराचा खेळ चालू झाला. आई वडीलांना विसरून ती नवीन आयुष्य जगायला लागली होती. खूप आनंदात होती. तिला जणु जग ठेंगण वाटायला लागल. पण लग्नाच्या आधीचे रुसवे फुगवे काढणाऱ्या विवेकने आता तिच्याशी भांडायला सुरूवात केली. महिनाभरातच त्यांच्यात खटके उडू लागले. विवेकला फार लवकर राग यायचा आणि राग घालवण्यासाठी मग मारझोड करणे, दारू पिऊन धिंगाणा घालते, नको त्या मित्रांना घरी आणणे. असे प्रकार सुरू झाले. शुध्द शाकाहारी असलेल्या स्वातीला तो मांसाहारी जेवण बनविण्यासाठी आणि खाण्यासाठी मागे लागत होता. या सर्व गोष्टीला स्वाती कंटाळली होती. ती सतत विरोध करत होती. आई वडीलांनी संबंध तोडून टाकल्यामुळे ती माहेरी परत जाऊ शकत नव्हती. सतत रडत असायची. कोणत्याही कामात तिचे लक्ष लागत नव्हते. खाण्याची नीट सोय होत नव्हती. रोज रोज त्या स्टोव्हवर स्वयंपाक करून कंटाळली होती. क्षणोक्षणी आई बाबांची आठवण, त्यांचे प्रेम,लाड , हट्ट या गोष्टी तिला डोळ्यासमोर येत होत्या.
हळूहळू तिची सहनशीलता संपली आणि ती विवेकला विरोध करू लागली. तो कित्येक रात्री बाहेर राहायचा आणि घरी आला तरी त्रास द्यायचा. त्याच्या अशा वागणुकीमुळे त्याचे काही मवाली मित्र तो नसतांना घरी येऊन स्वातीला त्रास देऊ लागले. तिची छेड काढू लागले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागले."

माई क्षणभर थांबल्या. बोलतांना त्या खूपच अस्वस्थ झाल्या होत्या.

"माई काय झाल? बर वाटतंय ना?" डॉ. किरण

"हो. मी ठीक आहे."

"अशीच एक भयानक रात्र आली आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंधाऱ्या रात्री अचानक कोसळणाऱ्या पावसात एखादी वीज तळपून जावी तसे घडले. ज्या प्रेमावर विश्वास ठेवून तिने घरदार सोडले. त्यानेच तिला जेरीस आणले. तिच्यावर अतिशय वाईट प्रसंग घडला."

"एके दिवशी विवेक तिच्या चार पाच मित्रांसोबत घरी आला. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. त्यात सगळ्यांना जेवायचे होते. विवेकने स्वातीला स्वयंपाक कराराला सांगितला. पण तिने यावेळी कडाडून विरोध केला. काय होईल ते बघू. पण तिच्यासोबत जे काही घडले ते माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य होते."

"तिने विरोध करताच विवेक चिडला. तिला मारायला सुरुवात केली. विवेकचे मित्रही खूप चिडले. त्यांनी सुध्दा तिला मारहाण करायला सुरुवात केली. एकाने तर तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ती ओरडत होती. किंचाळत होती. विरोध करत होती. पण पुरूषी ताकदीपुढे ती हतबल झाली. विवेक दारूच्या नशेत तर्र झाला होता. तिच्या शरीराचे लचके तुटत होते. वेदनांनी ती विव्हळत होती. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर अनेकदा तिच्याबरोबर अत्याचार होत होता. रात्र सरत होती. पहाटे पहाटे सगळे शांत झाले. सगळे शुध्दीवर आले. तेव्हा त्यांना स्वाती बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. विवेक आणि स्वातीला सोडून सगळे निघून गेले.

ज्यावेळी विवेक जागा झाला आणि स्वातीला पाहिले. तिची अवस्था, तिचे शरीर, त्यावर उठलेले ओरखडे पाहून तर त्याला तिची किळस वाटली.
त्याने ग्लासभर पाणी तिच्या चेहऱ्यावर ओतले आणि तिच्या केसांना धरून तिला मारझोड केली. तिच्यावर बळजबरी केली. तिची ताकद संपली होती. तो शांत झाल्यानंतर विवेकने तिला जबरदस्तीने उभे केले. कशीबशी स्वतः ला सावरत उठत होती. पण मारहाणीमध्ये तिला बराच मार लागला होता. जे प्रेम ,जो विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत आली होती. त्यानेच घात केला. ती उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तिच्या शरीरातून असंख्य वेदनांचे पूर वाहू लागले. पवित्र अशा देहाची माती झाली होती. यातना सहन न झाल्यामुळे तिने निर्णय घेतला. पोलिस स्टेशनला जाण्याचा. पण विवेकने तिथेच अडवले.

"कुठे निघालीस?"

"तुझ्या विरूद्ध तक्रार करायला चालली? आता मी हे सहन करू शकत नाही."

"थांब घरातून एक पाऊल जरी बाहेर टाकलस तर बघ."

"नाव विवेक पण बुध्दी मात्र विवेकशुन्य. त्याने तिला घरात बांधून ठेवले. दिवसभर तिच्या डोळ्यासमोर रात्रीच्या अंधारातील ते क्षण सरकत होते. ती बाहेर पडण्यासाठी संधी शोधत होती. तिचा जीव तहान आणि भुकेने व्याकूळ झाला होता. विवेक जो सकाळीच घराबाहेर पडला तो थेट रात्रीच आला."

"मला पाणी दे ना." ती भीत भीतच बोलली.

"त्याला काय विचार आला काय माहिती. त्याने तिचे हातपाय मोकळे केले आणि पाणी दिले. त्याला तिच्याकडून शरीर सुख हवे होते. पण ती अतिशय थकली होती. तिने कसाबसा विरोध केला. पण विवेकने तिच्या हातापाया वर एका काडीने मारले. त्यामुळे तिचे हात आणि पायावर जबर मार बसला. तशाही अवस्थेत याच संधीचा तिने फायदा घेतला. ती घरातून पळाली. विवेकला राग आला आणि त्याने घरातून ॲसिडची बाटली घेतली आणि स्वातीच्या मागे धावत सुटला. रात्रीची निरव शांतता, सगळ शहर झोपेच्या आधीन झाले होते. ही मात्र रस्त्यावर आली. पळण्याचा प्रयत्न करत होती. पण फार वेळ ती पळू शकली नाही. विवेकने तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. क्षणाचाही विलंब न करता तिला काही कळायच्या आतच त्याने ते ॲसिड तिच्या चेहऱ्यावर ओतले. आर्त किंकाळी आसमंतात गुंजली. त्या आवाजाने काही लोक बाहेर आले. पण तोपर्यंत विवेक पळून गेला होता. ती तिथेच विव्हळत होती. काही लोकांनी तिला रुग्णालयात आणले."

"पोलिसांनी मला बोलावून तिथेच घेतले. त्यात तिने तिची कर्म कहाणी सांगितली. त्यामुळे ती अशी वागत आहे. किरण तू तिला समजून घ्याव हेच मला वाटतय."

©® अश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all