सांग कधी कळणार तुला ( भाग 1 )

सगळं चांगलं होतं.फक्त इतक्या लवकर लग्न करायचं नाही ही काही सबब चालण्यासारखी नव्हती.आपण तयार झालो तर आई बाबांची काळजी मिटेल असा विचार करून कोमल तयार झाली. तसंही नाकरण्यासारखं काहीही कारण नव्हतं. 'चट मंगणी पट ब्याह ' असं काहीसं झालं. कोमलच्या मैत्रीणीना सुद्धा धक्काच बसला.ग्रुप मधल्या पहिल्याच मैत्रिणीच लग्न म्हणून सगळ्यांनी खूप मज्जा केली.लग्न ठरलं ठरलं म्हणता म्हणता कोमल लग्न करून सासरी गेलीसुद्धा.अनेक स्वप्न बघत कोमलचा गृहप्रवेश झाला.मुळात अगदी लाघवी,मृदू स्वभाव आणि उत्तम संस्कार यामुळे ती सहज सगळ्यांना आपलंसं करेल याबद्दल कोणालाच शंका नव्हती.सुरुवातीला काही दिवस खेड्यातल्या घरी राहायचं आणि मग दोघं नोकरीच्या गावी जायचं असं ठरलं होतं.बरेच पाहुणे असल्यामुळे कोमलला अवघडल्यासारखं झालं होतं.पण ते साहजिक होतं.पण दोन तीन दिवसांत आदित्य तिच्याशी धडपणे बोलला नव्हता.ती मात्र त्याच्या चोरट्या कटाक्षासाठी झुरत होती.देवदर्शन झालं आणि पहिल्या रात्रीच्या कल्पनेने कोमल मोहरुन गेली.धडधडत्या हृदयाने ती आदित्यच्या जवळ गेली.सिनेमात बघितल्यासारखं काहीच घडलं नाही.तिच्या अंगावर उठलेले रोमांच फरकाळ टिकलेच नाहीत.' दोघेही नवीन आहोत.एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल.' असे तिने मनाला समजावले.
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.
जलद कथालेखन स्पर्धा मार्च
विषय : दिवस तुझे ते फुलायचे

सांग कधी कळणार तुला ( भाग 1 )


" दिवस तुझे ते फुलायचे ... झोपळ्या वाचून झुलायचे.." छानसा झोपाळा सजला होता आणि कोमलच्या मैत्रिणी तिचं आवडतं गाणं गात होत्या. चेष्टा मस्करीला अगदी उत आला होता.कोमलची आई लता, तिच्या दोन्ही मावश्या,काकू,बहिणी,मैत्रिणी सगळ्या अगदी उत्साहात होत्या. कारणही तसंच होतं.कोमलच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम होता.
काही महिन्यांपूर्वी कोमलची आनंदाची बातमी सगळ्यांना सांगताना लताबाईंचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. लाडकं शेंडेफळ कधी मोठं झालं आणि पहिल्याच स्थळाला होकार देऊन तिचं लग्नही झालं.आणि पाहिले सण साजरे करायच्या आधीच तिला डोहाळे सुरू झाले.सगळं इतक्या लवकर झालं की कोमलला नवीन घरात रुळायला वेळच मिळाला नाही.
कोमलचे नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि तिने मास्टर्स करायची इच्छा व्यक्त केली.कोमल हुशार होती,दिसायलाही सुंदर होती त्यामुळे तिच्या लग्नासाठी आई बाबांना तितकीशी काळजी वाटत नव्हती.फक्त आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे कोमलचे लग्न योग्य वयात आणि चांगल्या घरात व्हावे अशी मनोमन सगळ्यांचीच इच्छा होती.कोमलचा दादा कौस्तुभ तिच्या लग्नानंतर लग्न करणार अशी अट घालून बसला होता. तसं अजून त्याचं बस्तान काही खूप काही व्यवस्थित बसलं नव्हतं त्यामुळे तसही त्याचं लग्न आताच करणं शक्यही नव्हतं.
कोमलला पार्ट टाईम जॉब मिळाला आणि सोबत ती आपलं शिक्षण पूर्ण करायच्या मागे लागली.कोमलची आत्या घरी आली तिने लगेच विषय काढला." काय हे अण्णा,वहिनी कोमलचे शिक्षण झाले की आता.लग्नाचं बघावं लागेल ना आता.तुम्ही दोघं तर अजून शांतच दिसताय.की जुळवलं पोरीने आपल आपलं?"
"नाहीं हो ताई. तसं काही नाही.आपली लेक आपल्या शब्दाबाहेर नाही.पण पुढे शिकायचं म्हणतेय पोर तर दोन वर्ष थांबुया की."आईने लेकीची बाजू घेतली.
"होत राहील शिक्षण बिक्षण.जबाबदारी पार करायला हवी ना वेळेत.आणि आपण हो म्हणून काय होतंय?लग्न गाठी काय लगेच बांधल्या जातात का?बघता बघता वेळ कसा निघून जाईल ते कळणारही नाही.आपल्या अंजूच बघा ना इतकी सुंदर,शिकलेली पण तीन वर्ष झाले अजून नाही जमलं.आणि ताईची सारिका,इतकी उजवी पण लग्न काही जमत नव्हते शेवटी भावोजीनी बक्कळ पैसा देऊन लग्न करून दिलं. पियुच काय झालं ते ही माहिती आहेच की तुम्हाला.मी काय म्हणते इतक्या घाईत नाही पण स्थळं बघायला काय हरकत आहे?उगीच आता नाही नाही म्हणायचं आणि आपण तयार असल्यावर वेळ लागायचा असं नको व्हायला.
अनुभव आहेत असे म्हणून पोटतिडकिने सांगतेय. बघा पटतंय का?"
आत्याच्या बोलण्याचा चांगलाच परिणाम झाला. लेकीची पाठवणी योग्य वयात,योग्य ठिकाणी होईल ना या विचाराने आई बाबांच्या ह्रुदयात धडकी भरू लागली.शेवटी मुलगी कितीही चांगली असली तरी पैश्याच्या बाजूने आपण लंगडे आहोत हे तर मान्य करावेच लागणार होते.
आई बाबांनी स्थळं बघायला सुरुवात केली. मावशींनी आदित्यचे स्थळ सुचवले.घरी सगळं व्यवस्थित होतं.मुलगा मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगारावर होता.त्याचे आई वडील खेड्यात राहत होते.पण आदित्य मात्र शहरातच राहणार होता.तिन्ही बहिणींची लग्ने झालेली होती त्यामुळे तशी काही जवाबदारी नव्हती. कोमलची इतक्यात लग्न करण्याची इच्छा नव्हती पण आई बाबांसाठी ती मुलगा बघायला तयार झाली.आदित्यचे घरचे कोमलला बघायला आले आणि लगेच पसंती दिली.
सगळं चांगलं होतं.फक्त इतक्या लवकर लग्न करायचं नाही ही काही सबब चालण्यासारखी नव्हती.आपण तयार झालो तर आई बाबांची काळजी मिटेल असा विचार करून कोमल तयार झाली. तसंही नाकरण्यासारखं काहीही कारण नव्हतं. 'चट मंगणी पट ब्याह ' असं काहीसं झालं. कोमलच्या मैत्रीणीना सुद्धा धक्काच बसला.ग्रुप मधल्या पहिल्याच मैत्रिणीच लग्न म्हणून सगळ्यांनी खूप मज्जा केली.लग्न ठरलं ठरलं म्हणता म्हणता कोमल लग्न करून सासरी गेलीसुद्धा.अनेक स्वप्न बघत कोमलचा गृहप्रवेश झाला.मुळात अगदी लाघवी,मृदू स्वभाव आणि उत्तम संस्कार यामुळे ती सहज सगळ्यांना आपलंसं करेल याबद्दल कोणालाच शंका नव्हती.
सुरुवातीला काही दिवस खेड्यातल्या घरी राहायचं आणि मग दोघं नोकरीच्या गावी जायचं असं ठरलं होतं.बरेच पाहुणे असल्यामुळे कोमलला अवघडल्यासारखं झालं होतं.पण ते साहजिक होतं.पण दोन तीन दिवसांत आदित्य तिच्याशी धडपणे बोलला नव्हता.ती मात्र त्याच्या चोरट्या कटाक्षासाठी झुरत होती.
देवदर्शन झालं आणि पहिल्या रात्रीच्या कल्पनेने कोमल मोहरुन गेली.धडधडत्या हृदयाने ती आदित्यच्या जवळ गेली.सिनेमात बघितल्यासारखं काहीच घडलं नाही.तिच्या अंगावर उठलेले रोमांच फरकाळ टिकलेच नाहीत.' दोघेही नवीन आहोत.एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल.' असे तिने मनाला समजावले.
सगळेच नवीन शहरात जाण्याच्या तयारीला लागले.आदित्यने भाड्याने घर घेऊन ठेवलं होतं.सुरुवातीला सोबत म्हणून आई बाबा येणार होते.जुजबी सामान घेऊन मंडळी नव्या घरात आली.नव्या नवरीला नवखेपण जगण्याची वेळच आली नाही. घरातल्यांशी कोमल अगदी छान वागायची.आदित्यशी मात्र अजून तसा मोकळेपणा तिला मिळत नव्हता.' हनिमूनला गेलो की अजून जवळ येऊ 'असं ती मनाला समजावत होती.त्या विचारांनी तिच्या मनावर मोरपीस फिरत होते.
पण किती दिवस झाले तरीही आदित्य हनिमूनचां विषय काही काढतच नव्हता.तिने आडून आडून सुचवलं पण तरीही काहीच उपयोग झाला नाही.आतातर आई बाबा ,मैत्रिणी सगळेच विचारायला लागले होते.नक्की काय कारण असेल?

🎭 Series Post

View all