शाळा

शाळेबद्दलच्या भावना
शाळा
©® सौ. चित्रा अमोल महाराव

सुरूवात न रडता झाली ज्याची
ओळख झाली आयुष्याचा नवीन टप्प्याची
पुस्तक पाटी दप्तर अन काळा फळा
मम प्रिय अशी म्हणजे माझी शाळा...

शाळेने दिली गम्मत जम्मत
शाळेने दिले शाब्दिक ज्ञान
शाळेने दिल्या जीवलग मैत्रिणी
शाळेने दिले व्यावहारिक ज्ञान

शाळा म्हणजे विद्येचे माहेर
शाळा म्हणजे ज्ञानाचे आहेर
शाळा म्हणजे शिक्षकांचे वात्सल्य
शाळा म्हणजे मांगल्य...

कधी कधी येतो कंटाळा
नको अभ्यास अन नको शाळा
मारावी सुट्टी दिवसभर खेळा
नाचा बागडा अन् मस्त लोळा

मनातली इच्छा होई पूर्ती !
मे महिन्याची सुट्टी मिळती. !!
दिवसामागून दिवस जाती. !
मज संगे ना कोणी खेळती !!
ना कोणी घेती कट्टी बट्टी !
उदास जाई ही मे ची सुट्टी !!
घरी आला आता मज कंटाळा !
पुन्हा मनी वाटे भरू दे शाळा. !!

****