स्त्री एक कलाकार (कविता)

स्त्री एक कलाकार (कविता)
स्त्री एक कलाकार

उपजतच तिच्या भाळी जणू
कोरला जातो जीवन आकार,
जन्म मृत्यूच्या खेळामध्ये
बनते स्त्री एक कलाकार.

पहाडासम दुःख असो वा
असो भयंकर अडचणी,
सहनशिलतेचा लेवूनी साज
ती रचते जीवन कहाणी.

प्रेम, जिव्हाळा, माया, ममता
दिसे नसानसात भिनलेली,
करता धारण रौद्र रूप ती
भल्यभल्यांची जिरलेली.

प्रपंच नेटका थाटताना
उत्तुंग यशाची जिद्द मनी,
घेऊनिया कर्तृत्वाची भरारी
मानसन्मानाची होते धनी.

अनेक कला अनेक रुपांनी
ठायी ठायी होते साकार,
बहुगुणांची खाण सदैव ती
असते स्त्री एक कलाकार.
—------------------

©®सौ. वनिता गणेश शिंदे