स्वीट कॉर्न उपमा

स्वीट कॉर्न उपमा रेसिपीज इन मराठी
स्वीट कॉर्न उपमा
साहित्य
कोवळी मक्याची कणसे (स्वीट कॉर्न) कांदा, कोथिंबीर, लिंबू रस किंवा दही, हिरवी मिरची किंवा तिखट, रवा, मीठ, साखर आवडीनुसार.
कृती
प्रथम मक्याच्या कणसांचे वरचे कव्हर काढून दाणे किसून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल, मोहरी,चिरलेला कांदा, हिरवी मिरची,हळद घालून फोडणी तयार करा. त्यात रवा टाका.व चांगला भाजून घ्या. त्यातच कॉर्न चा तयार केलेला किस देखील परतून घ्या. नंतर पाहिजे तेवढे पाणी किंवा दही घालून चांगली वाफ येऊ द्या. वरून खोबराकिस ,कोथिंबीर टाकून खायला घ्या. अतिशय पौष्टिक असा उपमा तयार.
याचप्रमाणे पोहे करताना सुद्धा आपण वाफवलेले कॉर्नचे दाणे टाकू शकतो.
चला तर मग, वाट कसली बघताय. करा की रेसिपी ला सुरुवात.
मस्त खा
स्वस्थ रहा .व्यस्त रहा.
सौ. रेखा देशमुख