तेरा साथ है तो भाग 2

तेरा साथ है तो

तेरा साथ है तो भाग 2

मुझे क्या कमी है

©️®️शिल्पा सुतार

" मला घेवून चला ना तिकडे." 

"रमा परत तेच नको ना." तो म्हणाला. 

" तुमचे हाल होतात. आणि मला ही तुमची खूप आठवण येते. मला तुमच्या सोबत रहायच आहे. " रमा हळवी झाली होती. 

"त्रास करून घ्यायचा नाही रमा. अग इकडे रूम वर काही सामान नाही. पाणी ही सकाळी येत. तुझे इकडे हाल होतील. तू तिकडे घरी खूप सुखी आहेस." प्रशांत म्हणाला. 

" नाही. इथे तुम्ही नाही ना. तुम्ही जिथे असाल मला तिथे आवडत ." 

" रमा तिकडे घरात सगळ्या सुख सोई आहेत. घरात सगळे लोक आहेत. मजेत रहायचा. " तो समजावत होता. 

" काय उपयोग त्याचा. जीव लावणारा माणूस घरात नाही. मला नाही आवडत इथे. माझ मन लागत नाही. "ती म्हणाली. 

मग तिला समजल की ती काय म्हणाली. अस नको बोलायला यांना राग येईल. 

"नाही म्हणजे इकडे तस ठीक आहे. पण तिकडे तुमच्या कडे येवून राहिली असती तर तुम्हाला घरच जेवण तरी मिळेल. जस असेल तस मला चालेल. तुम्ही सोबत असाल ना. मला तिकडे यायच." रमा परत तेच बोलत होती. 

" हो घाई करायची नाही रमा. घरी ही बघाव लागेल ना. आपण मोठे आहोत. जबाबदारी पार पाडावी लागेल." प्रशांत म्हणाला. 

"त्यात काय जबाबदारी? आणि ती ही फक्त माझ्या एकटी वरच का? एवढ होत तर यांनी लग्न का करायच. " तिला राग येत होता. पण ती काही म्हणाली नाही. 

रमा नाराज होती. प्रशांत खूप बोलत होता. ती ऐकत होती. काही माझ्या मनाप्रमाणे होत नाही. मला इथे आवडत नाही. हे यांना समजत नाही का?

सासरचे लोक काही प्रेम आपुलकीने वागत नाही. सासुबाई किती बोलतात. घरकाम कितीही केल तरी कमी आहे. किती मनापासुन केल तरी त्यांना पटत नाही. आता कंटाळा येतो. मला माझा संसार हवा आहे. 

त्यातल्या त्यात मोठी नणंद जरा साधी आणि बरी होती. ती मदत करायची पण ती बाळंतीण होती. किती करेल .ती प्रेमाने बोलायची. समजून घ्यायची. 

दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणे रमाचा पूर्ण दिवस कामात गेला. अगदी पाच मिनिट बसायला मिळाला नाही. रात्री नेहमी प्रमाणे प्रशांतचा फोन आला. दिवसातून तेवढा अर्धा तास तिचा चांगला जात होता. रमा खूप बोलत होती. प्रशांत ऐकत होता. 

"अहो मला थोडे दिवस माहेरी जायच आहे. आई आठवण काढत होती." ती म्हणाली. 

"जा ना मग. तुला ही बदल होईल." प्रशांत म्हणाला. 

"तुम्ही आईंना विचार ना. त्या सोडत नाहीत." 

"दे तिच्या कडे फोन." प्रशांत म्हणाला. 

रमा फोन घेवून आत गेली. सासुबाई, सासरे बसलेले होते. 

"आई हे बोलता आहेत." 

" काय रे प्रशांत काय म्हणतोस?" 

"आई मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? "

"आता ठीक म्हणायच. तब्येतीच्या तक्रारी सुरू असतात. आज अगदी माझ्याशी बोलतो आहेस. काही काम आहे का?" त्यांनी ओळखल. 

"आई रमाला चार दिवस माहेरी जावु दे." प्रशांत म्हणाला. 

" घरात कोणी करायच मग? बाळाला बघायला पाहुणे सुरू असतात. माहिती नाही का तिला. " त्या मोठ्याने म्हणाल्या. रमा थोडी घाबरली. 

"अग पण माईच बाळ आता तीन महिन्याच झाल. तिला जावु दे ना सासरी." प्रशांत म्हणाला. 

"अरे ती तिकडे एकटी नवर्‍या जवळ रहाते. बाळाला सांभाळता येणार नाही. जाईल ती अजून एक दोन महिन्याने. "

" रमा कंटाळली आहे. जावु दे थोड. "त्याने सांगून बघितल. 

" काय झाल तिला भरल्या घरात कंटाळा यायला? घस घस खायचं दण दण काम करायच. या वेळी नाही पुढच्या वेळी बघू." त्यांनी निर्णय दिला. 

" आई अग ऐक तरी. " प्रशांतला रमाची काळजी वाटत होती. 

" नाही. घे ग फोन पोरी. त्या प्रशांतला काही बाही सांगत जावू नकोस. माझा पोरगा तिकडे एकटा असतो. इकडच्या काळजीने तो अर्धा होती. ही पोरगी जास्त करते. खूप त्रास आहे अशी त्याच्या समोर दाखवते. तुला जिवावर आल का ग घर काम?" त्या ओरडल्या. 

"नाही आई तस नाही. माझी आई आठवण काढत होती." रमा हळूच म्हणाली. अजून फोन सुरु होता प्रशांत तिकडून ऐकत होता. 

" त्यांना काय होतय आठवण काढायला. उगीच मुलीला सारख माहेरी बोलवून घ्यायच. "

" चार महिने झाले कुठे गेली मी. " रमा परत म्हणाली. 

" मला घरात गडबड नको." सासरे ओरडले. 

रमा पटकन फोन घेवून आत निघून गेली. 

बघितल का कशी करते ही. त्या प्रशांतला काही बाही सांगते. तो आपल्याला बोलतो. त्या बडबड करत होत्या. 

रमा परत किचन मधे आली. फोन कानाला लावला.

रमा.... प्रशांत हळू आवाजात म्हणाला. 

"समजल मला तुम्ही काळजी करू नका." तिने फोन ठेवला. ती झोपायला रूम मधे आली.

🎭 Series Post

View all