तेरा साथ है तो भाग 3

तेरा साथ है तो

तेरा साथ है तो भाग 3

मुझे क्या कमी है

©️®️शिल्पा सुतार

लहान नणंद तिच्याशी खूप बोलत होती. रमाच मन लागत नव्हत. डोळे भरून येत होते. तिने लाइट बंद केला. डोळ्यातलं पाणी कोणाला दिसल तर अजून बोलणे बसतील. 

मला कुठे जावू द्यायच नाही. नवर्‍या बरोबर राहू द्यायच नाही. या सासुबाई का अस करतात? त्यांना सून नको मोलकरणी हवी आहे . स्वतः च्या मुलीला बरोबर नवर्‍याच्या गावाला पाठवून दिल. ती सहा महिने झाले माहेरी आहे ते चालत. सुनेने कुठे जायच नाही. 

यांना ही समजत नाही का? हे का माझी बाजू घेत नाही. ठणकावून सांगायच ना आईला. चार दिवस आईकडे गेली असती. माझ मन सासुबाई समजून घेत नाही .अस वाटत उगीच लग्न केल. 

"वहिनी दादाचा फोन होता का? काय झाल?" मोठी नणंद विचारत होती. 

"हो माई." तिने सांगितल. 

" तुझा आवाज का असा येतोय?" तिने लाइट लावला. रमा रडत होती. 

"काय झालं वहिनी?"

"शु.... माई प्लीज कोणाला बोलू नका. "

"वहिनीला तिच्या घरी जायच होत. आई नाही म्हणाली." छोट्या नणंदेने सांगितल. 

" जा ना मग वहिनी. मी बोलून बघू का?" माई म्हणाली. 

"नको माई. तुम्ही काही बोलू नका. " ती झोपली. 

सकाळी तिचा चेहरा उतरलेला होता.

"रमा चहा झाला का आधी माईला दे. पोरगा रात्रभर अंगावर पितो." सासुबाई जस काही झाल नाही अस दाखवत होत्या. 

"अहो तुम्ही ही चहा घ्या. लगेच कांदे चीर रमा. पोहे कर. यांचा डबा झाला का? यांना उशीर होत आहे." 

सासरे ही कामाला जायचे.

 सासुबाईंना सगळ्यांची काळजी आहे. माझी सोडून. बरोबर आहे ते लोक त्यांच्या घरचे. मी परकी. 

मला काही दहा हात आहेत का? कोणाची मदत नाही. हे झाल का? ते झाल का? आज तिने आरामात केल.

" काय झाल ग तुला? काल माहेरी पाठवायला नाही म्हटलं म्हणून आरामात काम सुरू आहे का?" सासुबाईंनी विचारल. 

" नाही आई करते आहे." रमा हळूच म्हणाली. 

"तु आणि प्रशांत आनंदाची बातमी द्या. मग आरामात जा माहेरी. आता भराभर हात चालव." त्या म्हणाल्या. 

आनंदाची बातमी द्यायला तुमचा मुलगा घरी येतो तरी का? आला तरी तुम्ही किती वेळ आम्हाला सोबत राहू देता? आज तीच मन विद्रोह करत होत. कसेतरी तिने काम उरकले. दुपारचा थोडा आराम करत होती. 

"वहिनी याला घे ना. मी सांभाळून कंटाळले. " माई आवाज देत होती. 

ती जरा वेळ बाळाला घेवून बसली. तिला ते बाळ खूप आवडत होत. ती खुश होती. ती तिथे बोलत बसली. 

"वहिनी तुला अस एकट राहून कंटाळा येत नाही का?" माई म्हणाली. 

"येतो ना." 

"तू जा ना दादाकडे रहायला." 

" माझ्या हातात आहे का ते ? आई नाही म्हणता आणि हे ही. " रमा तिला सगळ सांगत होती. 

" मी बघते." 

" नको माई मला सगळे ओरडतील." 

माईचा फोन आला. ती फोन घेवून बाहेर गेली. बराच वेळ ती बोलत होती. रमा जवळ बाळ झोपून गेला. हा खूप गोड आहे. तिने त्याला पापी दिली. ती थोडी रमली. मला ही अस बाळ हव. कधी होईल पण? एकटीच आयुष्य माझ. 

मी आता माझ्या मनाची समजूत करून घेतली आहे. बहुतेक माझ आयुष्य इथे या घरात असच जाईल. हे ही स्टँड घेत नाही. हे आई म्हणेल तेच करतात. तिला उगीच प्रशांतचा राग आला. मला माझा संसार नाही. 

रात्री प्रशांतचा फोन आला. तिने बोलण्यात जास्त इंट्रेस्ट दाखवला नाही. म्हणजे तिला मनापासुन बोलावसं वाटत नव्हतं.

त्याला ही समजल होत ती नाराज आहे. तो काहीतरी बोलत होता. 

"ठेवू का फोन." रमा मधेच म्हणाली. 

"रमा काय झालं?"

ती काही म्हणाली नाही. फोन ठेवुन दिला. तिने झोपून घेतल.

प्रशांतला काळजी वाटत होती. आई काही म्हटली असेल का? त्याने माईला फोन केला. 

"रमा आज विशेष बोलली नाही. काय झाल. जरा बघ माई ती रडते का?" 

" दादा, वहिनी त्या दिवशी खूप रडत होती. ती कंटाळली आहे. तुमच लग्न झाल तशी ती इकडे आहे. तिच्या ही काही अपेक्षा असतिल. तिला तुझ्या सोबत रहावस वाटत असेल. तू तिला तिकडे का नेत नाही? हे काही आता मी तुला सांगायच का? " 

"इकडे काही नाही. लहान रूम आहे. "प्रशांत म्हणाला. 

" मग घे थोड सामान. दोघांसाठी पुरे लहान रूम नंतर दुसरीकडे घर बघ. "

" आई नाही म्हणते." प्रशांत म्हणाला. 

" तू लहान आहे का. तुझ डीसीजन तू घे. आईसाठी लग्न केल का? नाही ना. "माई म्हणाली. 

" आईला राग येईल. ती म्हणते घर काम कस होईल?"

"घर कामाला बाई लाव. रमाला सोबत ने. तुमच्या लग्ना आधी होत होते ना सगळे काम? आता का अडल? "

" मला ही तो विचार आला होता. आई चिडेल." तो म्हणाला. 

" बायको नाराज आहे ते चालत का? एखाद्या दिवशी ती कायमची माहेरी निघून जाईल. "

" नाही. रमा माझ्या साठी महत्वाची आहे."

" मग तुझ तू ठरव."

" बरोबर बोलते तू माई. कोणाला बोलू नकोस रमाला ही. मी ठरवतो. "

" हो दादा. लवकर ठरव. " माई खुश होती. 

" रमाकडे लक्ष दे. "

" हो मी आहे तू काळजी करू नकोस. "

🎭 Series Post

View all