तेरा साथ है तो भाग 4 अंतिम

तेरा साथ है तो

तेरा साथ है तो भाग 4 अंतिम 

मुझे क्या कमी है

©️®️शिल्पा सुतार

शनिवारी रात्री अचानक प्रशांत घरी आला. रमा नेहमी प्रमाणे त्याच्या फोनची वाट बघत होती. घरात एकदम हसायचा आवाज आला. रमाने जावून बघितल. तिला आश्चर्य वाटल आणि खूप आनंद ही झाला होता. 

त्यांचे जेवण झाले होते. तिने प्रशांतला पाणी दिल. भाजी होती. गरम पोळ्या केल्या. त्याला जेवायला वाढलं. प्रशांत घरच्यांशी बोलत जेवत होता. तो अजूनही तिच्याशी बोलला नव्हता. 

आता रमाला भीती वाटत होती. मी आठवडा भर यांच्याशी नीट बोलली नाही. हे रागवले असतिल का? काही बोलतील का? जे होईल ते.

रात्री प्रशांत रूम मधे आला. रमा त्याची वाट बघत बसली होती. त्याने तिला जवळ घेतल. "खुश ना? बर वाटत का आता? राग गेला का?" 

"हो. तुम्ही मधेच कसे आलात?" तिने विचारल. 

"कोणी तरी रुसल होत. माझ तिकडे मन लागत नव्हत." 

तिला एकदम हसू आल. तिच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्ट दिसत होता. ती लहान मुला सारखी तिच्या मिठीत शिरली.

माझ्या रागावण्याचा यांना फरक पडतो. हे माझ्यासाठी आले. ती खुश होती. अहो सॉरी. 

" अस नुसत सॉरी चालणार नाही." त्याने लाइट बंद केला. 

सकाळी ति उत्साहात होती. तिने भराभर काम केले. प्रशांत पुढे आई बाबांशी बोलत होता. माईचा ही आवाज येत होता. काय बोलत असतिल? ती उपमा घेवून गेली. सगळे शांत बसले. तिला वाईट वाटल मी आल्यावर हे लोक बोलत नाही. ती परत जात होती.

" रमा बस इथे." प्रशांतने आवाज दिला. ती त्याच्या जवळ बसली.

"काय ग पोरी तू फोन वर याला काय सांगितल?" सासुबाई म्हणाल्या. 

ती घाबरली. काय झालं नेमक? 

"तुला इथे कसली कमी आहे? आम्ही त्रास देतो का?" सासुबाई रागात होत्या. 

"नाही आई." 

"आई तिला बोलू नको तिला काही माहिती नाही."प्रशांत म्हणाला. 

"घ्या आता याच्या बायकोला काही बोलायच ही नाही." 

" काय झाल आहे? " तिने माई कडे बघितल.

"तुला जायच ना दादा सोबत शहरात रहायला?" माई म्हणाली. 

तिने प्रशांत कडे बघितल.

तो मानेने हो म्हणाला.

तिला आनंद झाला होता.

"जा काहीही करा .सासू सासरे म्हातारे झाले. राहतील ते एकटे. करतील त्यांच त्यांच. खातील काहीतरी. काही काम नको की कोणती जबाबदारी घ्यायची नाही. राजा राणी मस्त रहा." सासुबाई म्हणाल्या. 

"आई काय अस करते? तुझ एवढ काही वय झाल का? घरकामाला बाई लाव. छोटीच लग्न झाल्यावर तू दादाकडे रहायला जा. आता दादा वहिनीला का दूर करते. नवीन लग्न झाल. त्यांना ही त्यांच आयुष्य जगू दे. जा वहिनी बॅग भर. तुझ सगळं सामान घे. " माई म्हणाली. 

" आत्ता? "

" हो. दुपारी निघा. दादा गाडी बूक कर. वहिनीला बस ने नेवु नको. "

रमा तयारी करत होती. ती खूप खुश होती. तिने घाईने स्वयंपाक ही केला. जेवण झाल. 

" आई माझ मंगळसूत्र बांगड्या द्या. "

 सासुबाईंनी तिचे दागिने दिले. तिने आठवणीने सामान घेतल. 

दोघ निघाले. रमा वेगळीच खुश होती. ती प्रशांत जवळ बसली होती. प्रत्येक क्षण एन्जॉय करत होती. आधी ते तिच्या माहेरी गेले. रमा अगदी अति आनंदात होती. आई वडिल भाऊ भेटले. आईने संध्याकाळी छान स्वयंपाक केला होता. तिने आईशी खूप गप्पा केल्या. मुलगी नवर्‍या कडे रहायला जाते त्या ही समाधानी होत्या. आईने खूप सामान दिल. भांडी, पीठ, तांदूळ, वाळवण, लोणच. ती नाही म्हणत होती. 

एक रात्र तिथे राहिले सकाळी लवकर ते निघाले. त्यांच्या घरी आले. दोन रूम होत्या. पुढची खोली मागे किचन होत. अगदी थोड सामान होत. 

रमाने पटापट आवरल. प्रशांत सामान घेऊन आला. "रमा फक्त खिचडी कर. हे घे तुझी आवडती गरम गरम भजी." 

दोघांच जेवण झाल. "रमा तुला इथे सुचत ना? सामान जरा कमी आहे. आपण तुला हव ते घेवू. " 

"अहो मला खूप छान वाटत आहे. मला तुम्ही सोबत हवे. बाकी काही नको." ती म्हणाली. 

"किती छोट्या अपेक्षा आहेत हिच्या. अगदी वेडी आहे." तो हसत होता. 

दोघ खूप आनंदात होते. रेडिओ वर गाण सुरू होत. 

तेरा साथ है तो मुझे क्या कमी है

अंधेरो से भी मिल रही रोशनी है

कुछ भी नहीं है तो कोई गम नहीं है

हर एक बेबसी बन गयी चांदनी है

रमा गाण गुणगुणत आवरत होती. प्रशांत तिच्याकडे बघत होता. आज ही या घरात आहे तर किती छान वाटत आहे. या पुढे मी हिला सोडून रहाणार नाही.

🎭 Series Post

View all