तिच्या आईला बोलवा भाग 2

तिच्या आईला बोलवा
तिच्या आईला बोलवा भाग 2

©️®️शिल्पा सुतार

विषय मुलीची आई

डॉक्टरांनी औषध लिहून दिली. चार दिवसांनी परत दाखवायला या. दोघ घरी आले. मीना थोडी पडली.

"मीना जेवून घे. " प्रकाश आवाज देत होता.

मीना उठत होती.

"बाबा आईला चक्कर येते आहे." पियू म्हणाली.

"स्वयंपाक झाला का ? "

" आईने खिचडी केली आहे. " पियु म्हणाली.

" बाहेरून मागवून घ्यायच मीना. मी जेवणाचे पान घेतो तू बस. चल पियु मदतीला. तांब्या भांड घे. "

घरात काय मी एकटी आहे का? मी नाही केल तर सासुबाई ही काही करत नाही. हे ही काही म्हणत नाही. सरळ म्हणतात बाहेरून घ्यायच. जस यांच्या आईने कधीच स्वयंपाक केला नाही. काहीतरी कौतुक. मीना विचार करत होती.

" आज प्रकाश काम करतो आहे का? " बाजूच्या बाई विचारत होत्या.

" हो मीनाला बर वाटत नाही." नीलिमा ताई म्हणाल्या.

"काय झाल काही आनंदाची बातमी?"

"कसल काय. आता तर दहा दिवसा पुर्वी पाळी येवून गेली. मी सांगते नातू हवा ते दोघ कुठे मनावर घेतात. ती मीना आणि तिची पोरगी दोघी प्रकाशला काही सुचू देत नाही. " नीलिमा ताई तोंड वाकड करत म्हणाल्या.

"मीनाला काय झाल?"

"काय माहिती. कुरबूर सुरूच असते."

" थोडे दिवस माहेरी जावू द्या. सलाईन वगैरे लावायला सांगा."बाजूच्या बाईने सांगितल.

" हो तेच करते."

जेवण झाल. आवरून झाल.

" मीना उद्या पियुला शाळेत पाठवू नकोस. " प्रकाश म्हणाला.

" अहो पियूची परीक्षा आहे. पाठवाव लागेल."

" ठीक आहे मी आईला सांगतो. ती डबा करून देईल. "

नीलिमा ताईंनी हात वर केले. माझी ही कंबर खूप दुखते आहे.

प्रकाश आत आला. मीनाला माहिती होत असच होईल.

" त्या काही करत नाही. पियुला ही मला ही पाण्यात बघतात. तेच त्यांचा नातू असता तर बरोबर केल असत. आपल्या मुलीसाठी मी आहे ना . मी उठेन करेन बरोबर. " मीना म्हणाली.

सकाळी सहाला मीना किचन मध्ये काम करत होती. पियूला शाळेत जायचं होतं. प्रकाशही डबा नेत होता. तिला कसं तरी होत होतं. तरी तिने कपभर चहा करून पिला. पटापट भेंडी कापली फोडणीला टाकली. कणिक भिजवली. तो पर्यंत प्रकाशने पीयूला तयार करत होता. शेवटी डोळ्यापुढे अंधारी आली. प्रकाश तिने आवाज दिला तो पळत आला. तिला हाताला धरून आत मध्ये नेलं. नीलिमाताई ही मागे आल्या.

"काय झालं हिला? ." त्या बघत होत्या.

"आई जरा भाजी कडे बघ ना."

"हो आता तेच काम आहे मला तुम्ही बायकोला जवळ घेऊन बसा."

दिवसभर मीना झोपलेली होती. तिला जेवायला ही कोणी विचारलं नाही. शेवटी तिने तिच्या हाताने दुपारी खाऊन घेतलं. भाजी थोडीशी होती. पियू आली तिने तिला मॅगी करून दिली. तिला खूप राग आला होता.

या सगळ्या आजारी असताना मी अशी करते का? गोळ्या औषध वेळेवर देते. सूप, मऊ खिचडी करून देते. माझ्या कडे कोणीच बघत नाही.

संध्याकाळी प्रकाश ऑफिसहुन आला. नीलिमा ताईंनी चहा केला. "प्रकाश मीनाला माहेरी जाऊ दे थोडी दिवस."

" तिला कसं जाता येईल पियूची शाळा आहे ना." तो म्हणाला.

"एक काम कर तिच्या आईला बोलवून घे. पोरीच करतील दोन पदार्थ करुन खावु घालतील. डॉक्टर कडे घेवून जातील." नीलिमा ताई म्हणाल्या.

🎭 Series Post

View all