तिच्या आईला बोलवा भाग 3 अंतिम

तिच्या आईला बोलवा
तिच्या आईला बोलवा भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

विषय मुलीची आई

मीना आतमधून ऐकत होती. चांगल आहे. आई येईल माझ करेल. मी लगेच ठीक होईल. यांच करायला अंगात परत जोर येईल. काय लोक आहेत. आजारी सून नको. तीच करायला तिची आई हवी. लाज ही वाटत नाही. माझी आईला तर ह्या मान देत नाही. उगीच इथेही तिचा पाणउतारा होईल. तिलाही धाकात ठेवतात.

पियु झाली होतो तेव्हा कस केल. लवकर सासरी घेवून आले. नंतर मी आजारी पडली तर थोडे दिवस आईला इकडे बोलवून घेतल. यांच्या घरच मी पण करा. आईने ही करा ही काय पद्धत आहे.

तिने आईला गुपचुप मेसेज करून दिला. "यांनी विचारल तर मला इकडे यायला जमणार नाही अस सांगुन दे."

"अग पण तुझी तब्येत. माझ्या लेकी साठी मी करेल." आई म्हणाली.

" नाही आई. करतील ना त्या. नाहीतर बाहेरून मागवतील. या पुढे अस करायच नाही." मीना ठाम होती.

प्रकाश आत आला. "मीना तुझ्या आईला बोलवू या का? तुला तेवढीच मदत होईल. "

" नको अहो. माझी आई येणार नाही. तिला काही काम नाही का? इतर वेळी मी ठणठणीत असते तेव्हा तुमची सेवा करायची आणि मी आजारी पडली तर माझ्याकडे कोणीच बघायचं नाही. लगेच माझ्या आईला बोलवून घ्यायचं. याला काय अर्थ आहे. "

" बरोबर आहे. घरात जे सुरू आहे ते मला ही दिसतय. पण रोज उठून कुठे भांडणार ." प्रकाश म्हणाला.

" करू बरोबर. आज बर वाटतय. तुम्हाला राग तर नाही ना आला. "मीना त्याच्याकडे बघत होती.

" नाही. "

" तुम्हाला माहिती नाही आई इकडे आली तर तिला डबल त्रास आहे. " नंतर मीनाला समजलं काय बोलली ती गप्प बसली.

" काय त्रास होतो? मीना मोकळ सांग. " प्रकाशने विचारलं.

" एका मुलीच्या आईला डबल त्रास असतो. घर कामही असत परत यांचे टोमणे ही ऐका. सासुबाई असं करतात की आईला काहीच येत नाही. जरा मानाने वागवत नाही. मला ते आवडत नाही. आई कडच्या आणि इकडच्या पद्धतीने वेगळ्या आहेत. "

" बरोबर आहे ह्या लोकांना एकत्र करायला नको." प्रकाश म्हणाला.

" खरं तर माझी आई तुमच्या आईच्या वयाची आहे. तरी ती अजूनही सगळे काम करते. यांच्या पुढे पुढे करा. प्रत्येक ठिकाणी कमीपणा घेते का तर ती मुलीची आई आहे म्हणून का? "

" मग आता काय करूया? "

" करू द्या ना थोडे दिवस सासूबाईंना मी पण जमेल तशी मदत करते आहे. सून आजारी पडली पाठवा माहेरी ही सवय नको. " मीना म्हणाली ते प्रकाशला पटल.

दुसर्‍या दिवशी बाहेरून जेवण घेतल. चहा पाणी घरी केल.

मीना नंतर ठीक होती. पण सासुबाईंनी काही केल नाही हे तिच्या मनात होत.

प्रीती तिची नणंद आजारी पडली. घरात सगळे बोलत होते. तिला इकडे बोलवून घ्या.

" जमणार नाही . मी काही करणार नाही. वाटल तर सासुबाईना तिच्या कडे पाठवून द्या. माझ कोणी करत नाही. आता जश्यास तसे." मीना म्हणाली. खर तर तिला हे सासुबाईना ऐकवायच होत. प्रितिशी काही प्रॉब्लेम नव्हता.

"माझ्या मुलीला आराम नको का?" नीलिमा ताई म्हणाल्या.

"हेच तर करायच नाही. ती करेल तिच्या घरी आराम." मीना म्हणाली.

" प्रकाश मीना बघ कशी करते."

" आई तू किती केल तीच ते सांग. ती चिडणारच."

नीलिमा ताई गप्प झाल्या होत्या. मीना प्रीतीशी बोलत होती. प्रिति माहेरी यायला तयार नव्हती. तिचा निर्णय योग्य होता. इतर वेळी सासरच्या लोकांच इतक करा. ती आजारी पडल्यावर बरी आठवते मुलीची आई.

🎭 Series Post

View all