तू मी आणि ऑफिस काम भाग 1

तू मी आणि ऑफिस काम
तू मी आणि ऑफिस काम भाग 1

©️®️शिल्पा सुतार

विषय प्रेमातला शत्रू

राधिका, सार्थक ऑफिसला जायला तयार होते. सार्थक नाश्ता करत बातम्या बघत होता. राधिका चहा घेवून आली. सार्थक...... सार्थक...... त्याच लक्ष नव्हतं. एवढ काय सुरू असत या बातम्यांमधे ते समजत नाही. ती नानांकडे बघत म्हणाली.

"सार्थक जगाकडे तुझ पूर्ण लक्ष आहे. थोड घराकडे ही बघ जरा." नाना म्हणाले. तसे ते राधिका हसत होते.

" काय झालं? काहीतरी महत्वाच सुरू आहे ना." सार्थक परत बिझी झाला.

" हो त्याला त्रास देवू नका." नेहमी प्रमाणे माईंनी त्याची बाजू घेतली.

ते दोघ ऑफिसला गेले. नाना माई घरी होते.

राधिका, सार्थक यांच एका वर्षा पुर्वी लग्न झाल होत. घरात चार लोक होते. ते दोघ हे दोघ. सासू सासरे साधे होते. सार्थक अति बिझी होता. राधिका घरी ही, माई नानांकडे ही लक्ष देवून होती. तिचे आई बाबा जवळ रहात होते. सुखी कुटुंब होत.

सकाळचा नाश्ता झाला. नाना पेपर वाचत होते. त्यांच्या ग्रुपचा फोन आला. ते ट्रीप बद्दल माहिती देत होते. "आपण सगळे सोबत जावू, किती मजा येईल."

"आम्ही नक्की येणार. माझ आणि माईच नाव घ्या." नाना म्हणाले.

" अग ऐकल का. आपल्या ग्रुप सोबत ट्रीपच ठरत आहे ." दोघ खुश होते.

संध्याकाळी राधिका आली. नाना तिच्या आजुबाजूला होते. तिला समजल यांना काहीतरी बोलायचं आहे. "काय झाल नाना सांगा?"

" आम्ही दोघ ट्रीपला जातोय. "

"अरे वाह कुठे जाताय नाना? " राधिका विचारत होती. ते माहिती देत होते.

" वाह मजा आहे. माई आता तयारीला लागा. "

" हो हिच्या साठी जरा पंजाबी ड्रेस घेवून ये."

"हो नक्की तुम्हाला काय हव नाना. लिस्ट करा." राधिका म्हणाली.

"अस करु या आपण तिघे खरेदी साठी जावू."

"चालेल."

खरेदी झाली. जायची तयारी झाली. माई बॅग भरत होत्या. नाना एक एक वस्तु आणून देत होते. राधिका ऑफिस हून आली. "अरे तीन बॅग? तुम्ही दोघे आहात ना?"

" हेच सांगतोय मी हिला. किती ते कपडे घेतले. " नाना म्हणाले.

" थोडे कपडे तर लागतील ना राधिका. काय अस? हे तर इथून वाद घालता आहेत. तूच सांग." माई म्हणाल्या.

" नाना , माई बरोबर बोलता आहेत. बायकांना सामान लागत."

"काहीही करा. मी माझी बॅग धरणार. बाकी मला काही सांगू नका. " नानांनी हात वरती केले.

राधिकाने माईंची बॅग नीट भरून दिली. दोनची एक बॅग केली.

"आमचे चिरंजीव कुठे आहेत? आज तरी लवकर येतील का?" नाना घड्याळाकडे बघत होते.

"माहिती नाही नाना."

"त्याला ऑफिसला दत्तक दिला आहे." नाना जोरात हसत होते.

"तुम्ही खूप जॉली आहात नाना."

"कश्याला शिकवल मग त्याला? मारून मुटकून अभ्यासाला बसवायचे. आता तो त्याच काम नीट करतोय तर त्याला ही नाव ठेवतात. " माई म्हणाल्या

" हे बरोबर आहे. " राधिका म्हणाली.

"राधिका तू सगळ्या बाजूने बोलते आहेस. " तिघे हसत होते. रात्री सार्थक आला. छान जेवण झाल. ते बोलत बसले होते. "प्रवासात काळजी घ्या माई नाना. उगीच वाद घालायचे नाहीत."

" तू यांना सांग. आज ही बॅग वरून कस केल. " माई म्हणाल्या.

नाना......

" समजल, मी शांत राहील. तू राहिला होता सांग तू ही. " नाना म्हणाले.

दुसर्‍या दिवशी ते निघणार होते.

राधिका ऑफिस हून आली. घरात नाना माई सामान बांधत होते. तिने चहा केला. तो पर्यंत बाहेर टॅक्सी आली." मी येवू का स्टेशन पर्यंत?"

" नको उगीच कशाला दमते .आमचा ग्रुप सोबत आहे. आम्ही निघतो."

"लवकर या मला करमणार नाही. " राधिका त्यांना भेटली.

" हो एका आठवड्यात येतो. तुम्ही ही एन्जॉय करा. त्या सार्थकला जरा लवकर ऑफिस मधून बोलवून घे ग." माई म्हणाल्या, तशी राधिका लाजली.

🎭 Series Post

View all