तू मी आणि ऑफिस काम भाग 3 अंतिम

तू मी आणि ऑफिस काम
तू मी आणि ऑफिस काम भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

विषय प्रेमातला शत्रू

लंच ब्रेक मधे ती मैत्रीणीं सोबत बोलत बसली होती. "आज काय प्रोग्राम आहे?"

"काहीच नाही."

"आमच्या सोबत येतेस का शॉपिंग साठी."

"हो चला." नाहीतरी सार्थक रात्री नऊ पर्यंत येत नाही. आता त्याला डिस्टर्ब करायच नाही. आपल आयुष्य असच असणार आहे. सार्थक काही मुव्ही मधल्या हीरो सारखा माझ्या पुढे मागे करणार नाही.

संध्याकाळी त्या निघाल्या. खूप मजा आली. स्ट्रीट शॉपिंग केली. राधिकाने खूप ड्रेस घेतले. सार्थक साठी टी शर्ट घेतले. पाणी पुरी खाल्ली.

सार्थक लवकर घरी निघाला. त्याने रस्त्यातून फुल घेतले. चॉकलेट घेतले. घरी कुलूप होत. त्याने त्याच्या जवळच्या चावीने दार उघडल. कुठे आहे ही? अस घरी किती बोर होत. ती रोज माझी वाट बघत बोर होत असेल. त्याने तिला फोन लावून बघितला. तिने उचलला नाही. पर्स मधे फोन होता. ऐकू आला नाही.

"चला पाव भाजी खावू." मैत्रिणी आग्रह करत होत्या.

"ठीक आहे मी सार्थक साठी पार्सल घेते." राधिका विचार करत होती.

त्यांनी ऑर्डर दिली. तिने पर्स मधून फोन हातात घेतला. पाच मिस कॉल होते. अरे सार्थकचा फोन तिने फोन केला

" कुठे आहेस?" त्याचा नेहमी प्रमाणे प्रेमळ आवाज आला.

"अरे मी फ्रेंड्स सोबत आहे तू घरी आलास की सांग. तू पावभाजी खाणार ना. मी घेवून येते. "राधिका म्हणाली.

" मी केव्हाच घरी आलो आहे."

" ओह सॉरी."

" त्यात काय. मी येवू का तिकडे? म्हणजे तुझा फ्रेंड्सला चालत असेल तर."

"ये ना. लगेच ये."

थोड्या वेळाने सार्थक आला. तो किती गप्पिष्ट आहे, प्रेमळ आहे सगळ्यांना समजल. त्याच जेवण झाल. मुलींना कुल्फीची पार्टी ही दिली.

आम्ही निघतो. दोघ बाईक वरून निघाले. राधिका त्याला चिटकून बसली होती." सॉरी सार्थक तू आज नेमका घरी लवकर आलास. मला वाटल तू बिझी असशील."

"सॉरी तर मी तुला बोलायला हव. मला काल तू तयारी केली ते समजल होत ." तो हसत म्हणाला.

"मग चान्स घ्यायचा ना. किती रे मठ्ठ तू." दोघ हसत होते.

"पण आज मजा आली. तुझ्या मैत्रिणी किती छान आहेत."

"अस का." राधिका त्याला मारत होती.

दोघ घरी आले. त्याने तिच्यासाठी फुल आणले होते ते दिले. चॉकलेट होत.

" ओह माय गॉड किती क्यूट. सॉरी मी तुझ सरप्राईज खराब केल. "

" त्यात काय. आपण तस ही आज डिनर साठी जाणार होतो. आता काय प्रोग्राम आहे ? "

" आज तू बिझी नाही का? " ती म्हणाली.

" माझ्या राणी साठी सगळे काम बाजूला टाकले." त्याने तिला जवळ ओढल.

राधिका लाजली

" दोन दिवस सुट्टी घेतली आहे. आता माझी राधिका म्हणेल ते मी करेन." तो तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला.
ती शहारली. त्याच्या मिठीत शिरली.

" आता छान मुव्ही बघू या. " ती म्हणाली.

" बस इतकच? मला वाटल तुझ्या कडे रोमॅन्टिक प्लॅन तयार असेल. "

राधिका त्याला मारत होती.

"उद्या मस्त सोबत राहू. किचन बंद. संध्याकाळी वॉक साठी जावू. रात्री डिनर. तू ती साडी नेस. कसली भारी दिसत होतीस ." सार्थक तिच्याकडे बघत म्हणाला.

"काही नको. तेव्हा नाही सांगता आल का? " राधिका चिडली.

" आजची मीटिंग महत्वाची होती. आता मी रीलॅक्स आहे. तू माझ ऐकणार नाही का? बघू बर ." त्याने तिला उचलून घेतल. तो तिला आत घेवून जात होता.

" सार्थक सोड ना. "

" आता दोन दिवस हो नाही नको. तुला हेच हव होत ना."

" तुला समजल होत?"

हो.

ती लाजली त्याच्या छातीत तोंड लपवल.

तो तिच्या जवळ येत होता. त्याचा फोन वाजत होता. "एक मिनिट ह."

"येस सर. आता? हो पाठवतो. ओके."

तो लॅपटॉप उघडून बसला होता.

राधिकाने डोक्याला हात लावून घेतला.

" पाच मिनिट."

ठीक आहे. ती हसत होती. हा माझ्या सोबत आहे हेच खूप आहे. ती चेंज करायला गेली.

सार्थक आला. "मधून मधून थोड काम असेल."

"काही हरकत नाही." ती खाण्याचे पदार्थ घेवून त्याच्या जवळ बसली. दोघ मुव्ही बघत होते. ती त्याच्याकडे जास्त बघत होती. त्याने टीव्ही बंद केला. तिला जवळ घेतल. "आज तू घरी नव्हती. मला बोर झाल. तु रोज अशीच माझी वाट बघत असशील ना? एक प्रॉमीस करतो मी जमेल तस तुला वेळ देईल. लवकर घरी यायचा प्रयत्न करेल."

ती खूप खुश होती. समजुतीने घेत होती. सगळं नीट सांभाळत होती. दोघ एकमेकांसोबत खुश होते.

"सार्थक आपणही ट्रीपला जावू या. "

" हो नक्की जावू मी रीटायर झाल्यावर. "

आता राधिका खूप हसत होती. बरोबर आहे. आता तर याला अजिबात वेळ नाही. जे आहे ते ठीक आहे.

🎭 Series Post

View all