५२) तूझ्या आठवणींचा विरह

....
तीने तिचा पकडलेला हात हिसकावला तशी ती नर्स दोन पावल मागे कोसळली.

तशी तीने रागातच तीला टोचलेली सलाईन खेचून काढली. आणि तिथून धावत सुटली.

दुसरीकडे प्रणव बाळांला अंतिम निरोप देऊन हाँस्पिटल मध्ये पोहचला. तसाच तो प्रियाला ठेवलेल्या वाँडकडे वळणावर की, तेवढ्यात प्रिया त्याला त्याचा दिशेने पळत येताना दिसली.

तो घाबरला ती त्याचा पर्यंत पोहोचण्यापूर्वी तो तीच्या दिशेने धावला.

प्रिया"प्रिया अग काय करतेस हाँस्पिटल आहे हे तो तिला दोन्ही  खांद्यांवर पकडत म्हणाला.

प्रणव तू....तू....कुठे? गेला होतास आणि आपलं बाळं ठिक तर....आहे ना"शेवटी तीने प्रश्न केलाच"....

आणि तो गोंधळला काय? सांगाव त्याला काहीच समजत नव्हतं तो एकदम शांत झाला होता.

प्रणव काय? विचारतेयं मी" आपलं बाळं ठिक तर...आहे ना" तू गप्प का ?आहेस काहीच बोलत का? नाहीस प्रणव मला खूप भिती वाटतेय सांग ना"आपल बाळ, ठिक तर ,आहे ना"ती त्याचा शर्टाला ओरबाडून ओरबाडून विचारत होती.तर प्रणव मात्र अजूनही शांत उभा होता.

तर ....दुसरीकडे ओरडून ओरडून बोलणाऱ्या प्रियाचा हात प्रणवच्या शर्टावरून सैल झाला.आणि ती जमिनीवर कोसळणार होतीच की, प्रणव भानावर आला आणि खाली कोसळणार्या प्रियाला सावरलं.आणि तसंच तीला दोन्ही हातावर उचललं. आणि वाँडमध्ये तीच्या बेडवर आणून टाकलं.

डाँक्टर आले इलाज सुरू केला.आणि थोड्या वेळात ते प्रणव कडे वळत"

आहो काय? केलंत हे सांगितलं होत ना" हा धक्का त्यांना सहन होणार नाही म्हणून ,मग आधीच क्रिटिकल कंन्डिशन आहे. त्यातून सावरायला थोडा वेळ दिला असतात तर डाँक्टर प्रणवर आवाज चढवत म्हणाली.

डाँक्टर त्याची काही चूक नाही त्या मँम शुद्धित आल्या तेव्हा ओरडून ओरडून विचारत होत्या खूप रागात होत्या कदाचित त्यांनी त्याचं बाळ गेल्यांचा अंदाज पोटाचा आकारावरून लावला आणि त्या मला धक्का देऊन पळत सुटल्या.

मग हे आधी नाही का? सांगता आलं तूला कधीची मी" त्यांना बोलतेयं आणि तू आहेस हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसलीसं जा ....आता इथून ती डाँक्टर आता नर्सवरच ओरडली.

नर्स जाताच डाँक्टर पुन्हा प्रणवच्या दिशेने वळतं बोलू लागली.

मिस्टर प्रणव नाही म्हणजे? माफ करा जरा गैरसमज झाला. आणि तूमच्यावर आवाज चढवला.बघायला गेलं तर त्या रूम बाहेर पडता कामा नये ही जबाबदारी आमच्या नर्सचीच असते.

ठिक आहे तुमचं ओरडण मी "समजू शकतो शेवटी ती सुरूवाती पासून तुमची पेशंट होती अर्थात तूम्ही तीला या अवस्थेत इमेजिंग केलं नसणार"पण ती आता बेशुद्ध का? पडली.

कदाचित ती नर्स म्हणाली तसं पोटाचा आकारावरून आपल्या  बाळांसोबत काही तरी झालंयं हे त्याना समजलं असावं आणि त्याचा धक्का बसला आणि म्हणून त्याची शुद्ध हारपली पण, आता त्याचाकडे चोवीस तास आहेत चोवीस तासात त्यांनी शुद्धीवर येण खूप गरजेच आहे.नाही तर....

नाही तर...काय? डाँक्टर प्रणवने थोड अडखळत विचारलं.

त्याचा मनावर झालेला आघात डोक्यावर परिणामचं कारण बनेल.डाँक्टर म्हणाली आणि इकडे प्रणवच हृदय पिळवटून निघालं .

पुन्हा एकदा तिला वेगळ्या रूम मध्ये शिप्ट करण्यांत आलं. आयसी यू मध्ये भयंकर शांतता त्यात तो मशीन चा सतत बीप बीप येणारा आवाज "त्यात समोरचा बेडवर प्रिया निपचित पडलेली, मनात हजारो विचाराचा सामाना करत प्रियाकडे एकटक बघणारा प्रणव स्वत:लाच दोष देत उभा होता.

शेवटी त्याला राहावलं नाही आणि तो रूम बाहेर आला.आणि तिथे असणाऱ्या बाकड्यावर मक्कपणे बसला.

फक्त चोवीस तास "आठ तास झाले अजून प्रिया शुद्धित येत नाही आता खूप कमी वेळ उरलायं आणि त्या वेळेत ती नाही आली शुद्धित तर....  खरचं डाँक्टर म्हणाले तसं होईल का?
नाही नाही असं होऊन कसं चालेल मला ही हिंमंत हारून नाही चालणार,आता तर ...मला खूप खंबीर व्हाव लागेल तसंच काही झालं तर ....मलाच तीला सावराव लागेल.

देवा "काय? करू रे....काय ?होऊन बसलं हे लहानपणापासून कुणाचा आधार असेल तर...माझ्या प्रियाचा मला आधार वाटतो.तीलाच काही झालं तर....मी" तुटून पडेन रे..... प्रणव आयसी यू च्या बाहेर बसून विचारत मग्न होता तर...डोळ्यात अश्रूंची संथ धार चालूच होती.

बराच वेळ झाला तीच्या काळजीने विचाराची साखली तुटली. आणि प्रणव प्रिया जवळ गेला.तीच्या जवळ बसला आणि तीचा हात हळूवार स्वत:च्या हातात घेतला.

प्रिया काय? झालंय तूला माझं काही चुका का? रागवलीस का? माझ्यावर"....

तूला माहित आहे का? किती वेळ झाला तू अशी इथे झोपलीस, त्यामूळे बराच वेळ आपलं बोलणं झालं नाही बोलणं राहिलं, तू न ,बोलता राहू शकतेस पण ....अग बाहेरून आल्या आल्या भांडायचं असत तूला माझ्याशी खूप तक्रारी असतात तूझ्यां ते न करता कशी काय, राहिलीस"...

मला माहित आहे नाही म्हटलं तरी" मी...तुझ्यावर खूप रोखटोक करत होतो.आणि त्यामूळे हे झालं कारण तूला लहान मुलांसारखी सवय आहे हे करू ते करू नको म्हटलं की,तूला तेच करायचं असतं.आजही तसंच झालं जागेवरून उठायला नको म्हणालो होतो मी"आणि तू तेच केलंस माझं  ऐकलं नाही म्हणून, मीच रागवायला हवं होत पण तूच गाल फुरगटून बसलीस,

अरे देवा त्यानें काही तरी आठवण्याचं नाटक करत डोक्यावर हात मारला.

असं आहे का? इथे झोपून राहाण्या मागे हे कारण आहे तर हे, माझ्या लक्षात कसं आलं नाही की, माझी प्रिया नौटंकी आहे. तूला वाटलं प्रणवने सांगितलं ते ऐकलं नाही आता काय? त्याला कळलं तर...वाईट वाटेल त्याहीपेक्षा रागवेल मग स्वत:लाच त्रास करून घेईल चूक झालीय आपली पण ती दाखवायची नाही त्याला काही कळायचा आधी आपणच रांगवून बसलो तर....

या जर तर... च्या नादात गेली आठ तास तू झोपेच सोंग घेतलसं बोलत, नाही आहेस एवढच नाही तर ...रोज भांडायचा नियम सुद्धा तोडलास,

पण बसं कर मला नाही सहन होत तुझं हे जीवघेण नाटक कधीपासून मीच बोलतोय तू साधा हुंकार तरी दे.... तूला भीती वाटतेय का? मी"रागवेन याची तर.... नको घाबरू बघ ना " मी किती वेळ झाला तूझ्यांशी बोलतोय ना " चेहर्यावरून रागावलोय असा वाटतोयं  का? हा बघ जरा डोळे उघडून बघ ना" "ग....  प्रणव अगदीच कळवळून बोलत होता. पण प्रिया कडून काही हालचाल जाणवली नाही.तसा तो आतून तूटला हातबल झाला हुंदका दाटून आला स्वत:ची खूप चिड येत होती पण प्रियाला शुद्धीत आणणं खूप गरजेच होतं.म्हणून त्याने काही तरी विचार करून पुन्हा बोलायला सुरवात केली.

प्रिया तूला मी" शेवटच विचारतोय अजून किती वेळ हे नाटक घेऊन आबोल राहाणार आहेस हा मला सहन होत नाही म्हणालो ना "नाही आला मला राग नाही चिडणार मी "तुझ्यावर मग का? माझा जीव घेतेस  तूला तुझ्या प्रणवची थोडी सुद्धा दया येत नाही. का? ग.... तो तूझ्या काळजीने हवालदिल झाला असेल, त्याला तूला या अवस्थेत बघून त्रास होत अलेल,हृदयाची धडधड वाढली अलेल,एकदाही माझी अस्वस्था नाही का? जाणवत तूला"

प्रिया डाँक्टारांनी खुप कमी वेळ सांगितलायं ग...त्या वेळेत तुझं शुद्धित येण गरजेच आहे का? समजत नाही तूला, मला तूझी" तूझ्या सहवासाची" तुझ्या प्रेमाची" गरज आहे प्रिया शुद्धित यावी म्हणून प्रणव रडत होता चिडत होता ओरडत होता तर...कधी हलवा होऊन व्यक्त होत होता.

टेबलवरची बाटली उचलली आणि गरजेपूरत पाणी पिऊन बाँटल पुन्हा टेबल वर ठेवली पुन्हा खुर्चीत बसाव म्हणून मागे वळणार की, मोबाईल खणखणला प्रणवचा फोन आला असेल म्हणून ती तशीच मागे वळली.आणि तो वाजणारा मोबाईल हातात घेतला.आणि पुन्हा मागे होणार की, तीचा पाय सांडलेल्या पाण्यावर पडला.आणि ती घसरून पडणार की,तीने स्वत:ला सावरायचा पुरे पुरे प्रयत्न करत टेबल पकडला.पण ते तीला जमलं नाही कारण त्या गडबडीत तीचा पाय पुन्हा सरकला आणि ती सरळ जाऊन  पोटावर  टेबलच्या काठावर आदळली.


🎭 Series Post

View all