५३) तूझ्या आठवणींचा विरह

.....
दुसरी कडे प्रणवचा शब्द न,शब्द  प्रियाचा कानात शिरत होता. पण मेंदू जागा होत नव्हता त्यामुळे प्रणव हतबल झाला आणि तिथेच त्यानें रागात त्याचा हात भिंतीवर मारला.

त्याचा हातातून रक्त वाहात होतं पण त्याकडे दुर्लक्ष करत तो जोर जोराने भिंतीवर हात मारत होता.

हातातून वाहाणार्या  रक्ताचा ओघळ प्रियाचा सरळ भांगेत पडला आणि दुसरीकडे  तो टेबलचा टोकदार भाग तीचा पोटात घुसायला एकच वेळ झाली आणि ती ओरडली आई ग.... माझं बाळ"....

ती शुद्धीत आली तीची होणारी हालचाल प्रणव च्या नजरेस पडली आाणि त्याचा ओठावर किंचित हसू पसरलं तीचा वर एक नजर टाकली तर त्याच हसू क्षणांत गायब झालं.

तीचा चेहरा घामाने भिजला होता ओठ थरथरत होते डोळ्यांचा पापण्यांची उघडझाप करत होती चेहर्यावर चे हावभाव जस जसे, बदलत होते तसं तशी तीचा कपाळावरची आठी ठळक होत होती.

तीचा कडे बघून असं वाटतं होत कसल्याशा वाईट स्वप्नाची सफर करून आली होती.

तीला घाबरलेलं बघून  प्रणव तीचा जवळ गेला तीला आवाज दिला तस तीने दचकून वर बघितलं.

प्रणवला समोर बघून तीच्या जीवात जीव आला.

प्रणव तू बाप रे ....कामावर गेला होतास कधी आलास हे काय? आलास आणि मला उठवलंस नाही आाणि एक फोन सुद्धा केला नाहीस मोबाईल खरेदी करून पैसे वाया गेले असे नाही का? वाटत  तूला कधीची खूर्ची त बसून वैतागले होते शेवटी वाट बघून बघून झोपले इतकी गाढ झोपले की, की खूप वाईट स्वप्न पडलं आणि घाबरून उठले. बघते तर तू समोर उभा"

काय? काय? स्वप्न पडलं तूला नाही म्हणजे वाईट स्वप्न पडलं असं म्हणालीस म्हणून विचारतोय प्रणवने तीच बोलण ऐकून गोंधळून विचारलं.

होत वाईट स्वप्न " आणि ते मला पडलं होत पण तुझा का? चेहरा असा झालाय वाईट स्वप्न पडल्या सारखा"

प्रिया अग अशी काय? करतेस तूला जाग आली तेव्हा तूझा चेहरा बघितलास का? किती घामाने भिजला होता मग तूला तसं, बघून मी "थोडा हसरा चेहरा ठेऊ शकतो .

तू ते सर्व सोड पण तू सांगणार आहेस का? काय? स्वप्न पडलं ते प्रणवने स्वत:ला सावरत पुन्हा विचारलं.

ते तू कामावर गेलास अगदी मला इकडून तिकडे करू नको, असं बजावून पण ....बराच वेळ झाला होता मला तहान लागली होती. पर्याय नव्हता पाणी तिकडे टेबलं वर  होतं मला उठावं लागणार होतच त्याशिवाय पाणी कसं पिणार होते ना"म्हणून मी" स्वत'ला सांभाळून उठले. पाणी पिल्ला आणि पुन्हा येऊन खुर्चीवर बसणार की, मोबाईल वाजला तूझाच काँल असावा  म्हणून मी" पुन्हा मागे झाले टेबल वरचा, मोबाईल उचलला आणि पुन्हा मागे फिरले आणि माझा पाय घसरला तशी पोटावर पडले.टेबलावरच आणि टेबलाचा टोकदार भाग माझ्या पोटात घूसला.आाणि माझं बाळ मी "गमावलं बापरे किती मोठं स्वप्न मला पहिल्यांदाच पडलं.तेही बाळांवरून  इतकं वाईट म्हणून घाबरले आणि जाग आली पण नशीब हे सर्व स्वप्न होतं.

प्रियाने तीला पडलेलं स्वप्न सांगितलं आणि तो स्तब्ध झाला.

म्हणजे? हे सर्व त्या  माझ्या काँलने झालं तर ....कोणती दुर ब़ुद्धी सुचली आाणि मी" प्रियाला काँल केला.नाही नाही मी" तो मोबाईल घेतला हेच चुकलं माझं, आणि होत्यांच नोव्हतं झालं

पण हे सर्व खरचं घडलंय मग ही प्रिया त्याला स्वप्न का? समजतेयं काय? झाल़य जे झालंय ते तीला आठवत नाही का?बापरे माझं डोकचं काम करत नाहीयं तीला शुद्ध आली म्हणून आनंद साजरी करू की, तीच आताचा वागण्यावर दु;ख काहीच कळत नाही प्रणव विचारात गुंग होता.

प्रणव प्रणव अरे... काय? झालं कसला विचार करतोस मी"तूझ्या शी बोलतेयं आणि तूझं लक्ष नाही आहे. माझ्या बोलण्याकडे तीने त्याचे दोन्ही हात पकडत विचारलं तसा तो भानावर आला.

दुसरीकडे त्याचे दोन्ही हात हातात तसेच पकडत आजूबाजूला नजर फिरवली.

प्रणव आपण हाँस्पिटल मध्ये काय करतोय , आजूबाजूला असणाऱ्या मशिन बघून प्रिया थोड घाबरून म्हणाली.

काय? बोलणार होता खरं सांगून तीचा जीव धोक्यांत टाकू शकत नव्हता.

अरे... गप्प का? बोल ना"हाँस्पिटल मध्ये काय? करतोय आपण, काय? विचारतेयं मी" तो कारण शोधत होताच की, ती पुन्हा म्हणाली.तसा त्याने रक्तांने माकलेला हात तीचा समोर केला.

प्रणव रक्त अरे... काय? झालं तूझ्या हाताला एवढं कसं लागलं.

अग ते काय? लागलं मलाच समजलं नाही म्हणून आलो होतो. हाँस्पिटल मध्ये "अर्थ ही लागणार नाही असं कारण सांगून प्रणव मोकळा झाला खर"....पण त्याने सांगितलेलं कारण तीला काही पटलं नाही.

प्रणव तूझ्या हाताला लागलंयं आणि तूलाच माहित नाही की, ते काय? लागलंय आाणि हे काय? जर का? आपण तूझ्यांसाठी आलोयं इथे मग तू माझ्या समोर आणि मी" बेडवर का? आहे तीने त्याचा कडे शंकेने बघत विचारलं.तसा प्रणव पुन्हा गोंधळला.

अग तेच तर ....सांगतोयं ऐकायचं सोडून लगेच शंकेने काय? बघतेस अशी"

काय? मग सांग ना "मुहुर्त काढावा लागणार आहे की, काय?

अग बाई ते रक्त बघून तूलाच चक्कर आली आणि मग राहिला माझा इलाज"....बाजूला आणि झोपावं लागलं तूला इथे प्रणवने कसं बसं खोटंच सांगितलं.

अरे... पण तू तर कामावर गेला होतास तू आलास कधी हे कसं मला काहीच आठवत नाही प्रिया नकळून म्हणाली.

प्रिया" मी काय? म्हणतो आपण घरी जाऊन बोलू ना " सविस्तर आता मी" डाँक्टरांना बोलवून आणतो एकदा चेक केलं की, डिस्चार्ज पेपर तयार करता येतील. ना"तीच बोलणं मध्ये थांबवत प्रणव म्हणला आणि तीच पुढचं बोलण ऐकून न घेता निघून गेला.

प्रियाने मात्र जाणार्या प्रणव कडे बघत डोक्यावर हात मारला.आणि तसाच पोटावर हात ठेवला आणि बाळांच अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. पहिल्यांदा हात ठेवला तीला नेहमीसारखी बाळांची चाहूल जाणवली नाही. म्हणून तीने त्याचाशी बोलता बोलता पुन्हा हात ठेवत तोच प्रयत्न केला.तरीही काहीच नाही.तशी ती आता घाबरली हे बाळं  "काही हालचाल का? करत नाही रोज तर किती जाणवतं आज कसं काही जाणवत नाही मला प्रणवशी बोलायला हवं ती स्वत:शीच म्हणाली आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून पोटावर हात ठेवत".....

माझं बाळ काय? झालंयं आज आईला ओ नाही द्यायचं ठरवलंयं का? माझ्या बाळांने असं नको करू बरं आईला रडू येईल. बरं माझा आवाज ऐकू येत असेल तर.... ओ देणार आहेस का? तू.... प्रिया प्रणव येत पर्यंत पोटावर हात ठेऊन बाळांची हालचाल जाणवतेय का? हे बघत होती इतका प्रयत्न करून सुद्धा शेवटी प्रियाचा पदरी नाराजीचं आली. नको ते विचार मनाला घिरट्या घालू लागले आणि घाबरून तीच्या पोटात गोळाचं आला.आता तिला अस्वस्थता जाणवत होती. काही तरी चूकीच घडलंय याची चाहूल लागली होती.

डोळ्यांत पाणी आणून ती प्रणवची वाट बघत होती.

थोडाच वेळ झाला आणि प्रणव डाँक्टरांना घेऊन आला.प्रियाची अवस्था बघून तो गडबडला.

प्रिया "अग काय? झालं तूला" अशी का? बसलीस काही त्रास होतोय का?बोलं ना"अशी गप्प राहून माझा जीव नको घेऊ"

प्रणव माझा जीव कुठे? आहे आपलं बाळ कुठे? आहे ते पोटात नाही आहे असचं वाटतेय मी "मगाच पासून त्याचांशी बोलतेयं
मला नेहमी सारखं त्याचा असण्याची जाणीव का? होत नाही
गेल्या पाच महिन्यात असं कधीच झालं नाही किती फुलासारखं जपलंय मी" किती काळजी घेतलीस तू माझी किती त्रास सहन केलास मग आजच काय? झालंय त्याला सांग ना काय? झालंय
मला काहीच कसं जाणवत नाही प्रिया प्रणला ओरडून ओरडून विचारत होती.

🎭 Series Post

View all