५४) तूझ्या आठवणींचा विरह

.....
प्रिया अग शांत हो असं काही झालेलं नाही.हे बघ डाँक्टर आल्यात ना"त्याना चेक करु देशील तू असा मानसिक त्रास करून घेतलास तर...तूला माहित आहे ना" त्याचा परिणाम सरळ बाळांवर होईल.प्रणव तीची अवस्था बघता तीला शांत करण्यासाठी पुन्हा एकदा खोटं बोलला.

नाही नाही बाळांला काही होता कामा नये,मी "नाही त्रास करून घेणार तू सांग डाँक्टरांना आपलं बाळं ठिक तर ...आहे ना" हे तपासून सांगा म्हणावं"

कुल डाऊन मिस प्रिया" शांत व्हा आणि श्वास घ्या प्रिया प्रणवशी बोलत होती की,डाँक्टरांनी मध्येच तीच बोलणं थांबवत शांत राहायला सांगितलं.तशी प्रिया एकदम शांत झाली.पण मनात असणाऱ्या भितीने तीने प्रणवचा हात घट्ट पकडला.
तसं त्याने एक नजर डाँक्टरांकडे बघितलं आणि डाँक्टरांनी तीला कळणारं ही नाही असं तपासण्याचं नाटक केलं.

सर्व ठिक आहे काहीही झालेलं नाही.इतका विचार करून त्रास करून घेऊ नका डाँक्टरांनी हसरा चेहरा ठेवत थोड, खोटचं सांगितलं.

सर्व ठिक आहे मग डाँक्टर आम्ही घरी जाऊ शकतो ना"मध्येच प्रणयने विषय टाळता यावं म्हणून विचारलं डाँक्टरांनी जास्त काही न बोलता होकारार्थी मान हलवली.आणि निघून गेली.

थोड्या वेळात प्रियाचे डिस्चार्ज पेपर तयार झाले आणि संध्याकाळ पाचचा सुमारास दोघंही घरी जाण्यासाठी निघाले.

ते दोघे जेव्हा केव्हा घरी पोहचले तर ...दरवाजा उघडाचं होता. फक्त कडी तेवढी लावलेली होती.

प्रणवने दरवाजा उघडला  मोबाईलच झाकणं उडून मोबाईल जमिनीवर पडला होता .पाण्याची बाँडल तशीच कलंडली होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होत.प्रियाने घरात शिरताच सगळीकडे नजर फिरवली.

प्रणव अरे ....हे काय? अगदी मगाशी मी "तूला मला पडलेलं स्वप्न सांगितलं होत तसंच वाटत नाही का? अगदी तो मोबाईल ही बाँटल हे पाणी सर्व तसच आहे बघ ना "एकदा ...

प्रिया अग असं काय? करतेस तूला चक्कर आली तेव्हा तूझ्या डोळ्यांवर पाणी मारण्यासाठी घेतली होती ती बाँटल  माझ्या हातूनच सांडली तू शांत पणे इथे बसं मी" ते पाणी पुसून काढतो कसा बसा विषय सावरत तो स्वयंपाक घरात गेला.

एक गोष्ट लपवण्यासाठी किती खोटं बोललोयं मी" असं वाटतंय मी"प्रियाला फसवतोय पण काय? करू तीच्या काळजीने मला खोटच बोलावं लागलंय इच्छा आजिबात नाही.पण....नाही अजून थोडे दिवस त्यानंतर वेळ बघून तिला सर्व खरं खरं सांगून टाकेन बराच वेळ स्वयंपाक घरात उभा राहून प्रणव विचार करत होता.आणि मग फरशी पुसायला फडका घेऊन आला.

काय? रे काय? झालंय इतका वेळ काय करत होतास,

काही नाही ग... फडका शोधत होतो थांब हा थोडाच वेळ एवढ पुसून घेतो मग तू आरम कर मी" जेवणाचं बघतो.

नाही प्रणव मी" ठिक आहे मला काही आराम वगैरे करायचा नाही.आणि जेवणाच राहू दे ....एवढ्या लवकर जेवणार नाही मी" तूझ ते तेवढं झालं की,जरा इकडे ये ....मला तूझ्याशी बोलायचं आहे.

बरं बाबा आलोच थांब हा बोलता बोलता प्रणवने जमिनीवर सांडलेलं पाणी पुसून काढलं.आणि मग तो प्रिया जवळ गेला. तीच्या समोर फरशीवर बसला.हा बोल आता काय? बोलायंच  आहे तूला तिचे दोन्ही हात हातात घेत प्रणवने प्रेमाने विचारल.

प्रणव कधीपासून मी" तूझ्या कडे बघतेयं मला थोड विचित्र वाटतंय नेहमी सारखा खूश नाही वाटतं आहेस तूझ्या डोळ्यांत बघितलं की, असं वाटत काही तरी लपवतोस माझ्या पासून

तूला ते लपवायं नाही तरी लपवतोस हे तूझ्या कडे बघून वाटतं मला सांग काय? झालंयं बोलं ना" नाही सांगायचं का! तूला ठिक आहे मुद्द्याचं विचारते खरं, खर सांग आपलं बाळ खरचं माझ्या पोटात आहे का? तीने विचारलेल्या प्रश्नावर प्रणव ने डोळे मोठे केले.

काय? वितारतेस तू प्रिया "

काय? झालं काही चूकीचं विचारलं का?माझ्या पोटात वाढतंय ना" ते मग त्याची हालचाल मला जाणवत नाही आहे मग मला मनात येणारी शंका तूलाच विचारू शकते अजून कुणी नसतं ना"माझ्या सोबत सांग माझं बाळ खरचं ठिक आहे ना"

प्रिया अग....

बसं झाले प्रणव मला एवढं तर...स्पष्ट झालंय की, तू माझ्या पासून काही तरी लावतोस  तेही  माझ्या काळजीनेच पण आता पूरे ना"रे.... मी स्वत:विचारतेयं सांग काय? झालंय जर ...आपलं बाळ ठिक आहे हे डाँक्टरानी सांगितलं तरी तो आनंद का? नाही दिसत तूझ्या चेहर्यावर"... ती विचारत होती पण तो काहीच न बोलता शांत राहिला.

ठिक आहे नको सांगू असाच बस पण याद राख या नंतर माझ्या समोर जर ...सत्त्य आलं आणि ते माझ्या बाळांच्या बाबतीत असेल ना" तर मी तूला माफ नाही करणार तू मला गमावून बसशील सांगून ठेवते.

प्रिया "....अग काय बोलतेस तू हे तूला तर ...माहित आहेच, ना" "की, मला तूझ्या पासून काही लपवता नाही येत हे सर्व मनावर दगड ठेवून लपवत राहिलो ग....  ते ही तूझ्यांसाठी पण आता नाही आज न उद्या मी"तूला ते सांगणार होतोच पण योग्य वेळेची वाट बघत होतो आणि ती हीच वेळ आहे असं वाटतंय मला पण प्रिया मी"सुद्धा त्या गोष्टी तून सावरलो नाही ग...तर आज मी" तुझ्यांशी त्या  विषयावर नाही बोलू शकत प्रणव मनात म्हणाला आणि मग मात्र तीचा हात सोडून देत"...

प्रिया खरं ऐकायचं आहे ना " तूला ठिक आहे उद्या मी"नक्की तूला सांगेन सर्व "आजची रात्र तेवढी जाऊ दे....

अरे... पण उद्या सांगायचं ठरवलंच आहेस तर... आताचं सांग काय? तो तुकडा पडू देत ना" उगाच रात्रभर हुरहुर आणि कशाला.

प्रिया मलाच सावरू दे ना"या सर्वातून चिंत थार्यावर नाही माझं
ते थार्यावर आणायला निदान एक रात्र दे....

प्रणव तू सावरला नाहीस म्हणजे? काय? बोलायचं आहे तूला कशातून  सावरला नाहीस तू....

काय? यार प्रिया म्हणालो ना "उद्या सर्व  सांगतो म्हणून मग गप्प बसायच्या काय? घेतील किती भूणभुण करतेस ग... माझ्या मागे जरा म्हणून शांतता नाही.

मी" आणि भूणभुण करतेयं तोंड दिलंय म्हणून काही बोलू नकोस नाही करत भूणभुण जाऊ दे... नको सांगू मला काहीच पण मी"जे सांगितलंय ते लक्षात ठेव"....

मला त्रास होऊ नये म्हणून माझ्यांच बाळा विषयी काही लपवलंस तर ....माझं तोंड सुद्धा तू बघू नाही शकणार "

प्रिया गप्प बस ग....  असं काहीच नको बोलू एका रात्रीची गोष्ट
आहे सर्व सांगतो म्हणालो ना"तो म्हणाला आणि प्रिया नाराजीतच खुर्चीतून उठत स्वयंपाक घराच्या दिशेने गेली.

भूणभुण करू नको म्हणे मी"काही विचारलं की, फक्त भूणभुण दिसते पण... त्यामागे माझी काळजी नाही दिसत.कधीचा खोटं बोलत राहिला आणि आता कसा बरं खरं सांगायला तयार झाला तेही आताच सांगून मोकळ व्हाव माणसांने तर ...नाही एक रात्र हवीयं त्याला सांगेन म्हणून म्हणाला पण मग हा असं काय? लपवतोय "ते काहीच सांगितलं नाही. बाळांबद्दल आहे की, अजून काही "....

हे तर....विचारून पापच केलं मी"तर.... सकाळपर्यंत  वाट बघायची म्हणजे? हुरहूरचं ती एक प्रकारची"....

असो विचार करून काही उपयोग आहे का?सांगेल म्हणालायं तर.... सांगेल अती विचार केलेल्याने माझ्या बाळांवर परिणाम नको " शांत"....शांत "....प्रिया, एकदम शांत प्रिया स्वत;लाच समजवत होती.

काय? माती खाल्लीय मी " कसं सांगणार आहे मी"प्रिया ला सर्व".... बोलून तर गेलो की, उद्या सर्व सांगेन पण कसं आणि सांगून तीला ते सहन होईल का? विचार केलाच नाही. देवा अस्वस्थ मनाने  प्रणव  इकडून तिकडे फेर्यां मारत राहिला.

तर.... प्रिया एका कोपर्यात बसून एकटक इकडून तिकडे करणार्या प्रणकडे बघत होती.त्याची अस्वस्था तीला जाणवली.
पण तीने मध्ये न बोलता त्याचा वेळ त्याला द्यायचं ठरवलं.
आाणि शांत बसून राहिली


🎭 Series Post

View all