वांग्याचे कापे !

.
साहित्य :

वांगे
मीठ
हळद
लाल मिरची पावडर
रवा
तेल

कृती :

सर्वप्रथम वांग्याला गोलाकार आकारात कापून घ्या. मग त्या गोलाकार तुकड्यांवर हळद , लाल मिरची पावडर , मीठ टाका. त्यानंतर हे तुकडे रव्यात कालवून घ्या. जेणेकरून वांग्याच्या त्या गोलाकार तुकड्यांवर रव्याचा थर जमा होईल. त्या नंतर तव्यावर दोन-चार चमचे तेल टाका आणि हे तुकडे भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी भाजल्यानंतर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकतात. एन्जॉय.

( जर पदार्थ बिघडला तर लेखक / व्यासपीठ जबाबदार असणार नाही. )

©® पार्थ धवन