तु माझी लाडकी भाग -2 अंतिम

कौटुंबिक
भाग -2

विजयची कार एका बंगल्याजवळ येऊन थांबते, " आलं.. चल.. "

" वाह पप्पा हा बंगला कोणाचा आहे, मस्त आहे ना..? " प्रीती चा मुलगा अभिराम बोलतो.

" अरे हा बंगला तुझ्या आजोबांचा आहे, म्हणजे तुझ्या मम्मी च्या वडिलांचा.. " विजय त्याला कौतुकाने सांगते.

" मम्मी तु कधी बोलली नाही, माला आजोबा आहेत आणि त्यांनाच एवढा मोठा बंगला आहे ते.. " अभिराम तिला प्रश्न करतो.

ति विजय आणि अभिराम कार मधुन उतरतात..

तिचे बाबा बाहेरच झोपाळ्यावर झोका घेत बसलेले असतात, अभिराम त्यांना धावत जाऊन, " आजोबा.. आजोबा... " म्हणुन जोरात आवाज देतो आणि त्यांना मिठी मारतो.

" आजोबा... अरे बाबा तु आहेस कोण, आणि मला आजोबा का म्हणालास..? " प्रीतीचे बाबा विचारतात.

" अहो आजोबा कारण तुम्ही माझे आजोबा आहात म्हणुन.. " अभिराम चं हे बोलणं ऐकुन त्यांना हसु येतं..

तेवढ्यात प्रीती त्यांना आवाज देते, " बाबा.. "

प्रीतीचे बाबा तिच्या कडे पाहतात, डोळयांवरील चष्मा बाजुला करतात.. त्यांना प्रीतीला पाहुन आनंद झालेला असतो, पण ते दाखवत नाही.

" हा अभिराम तुमचा नातु.. " प्रीती बोलते.

प्रीतीचे बाबा विजय कडे पाहतात, आणि घरात गपचूप काहीच न बोलता जातात.

प्रीती विजय कडे पाहते, " तु आत जां, आणि अभिरामला पाहुन त्यांना खुशीच झाली आहे ते नक्की सगळं विसरतील आणि कदाचित विसरले सुद्धा असतील."
तो तिला धीर देतो.

प्रीती घराच्या उंबरठ्यात उभी राहुन, " बाबा.. " पुन्हा आवाज देते तिचा आवाज ऐकुन तिची आई सुद्धा बाहेर येते
आईला सुद्धा तितकाच आनंद झालेला असतो.

" आता कशाला आली आहेस..? " तिचे बाबा पाठमोरे उभे राहुन..

" बाबा तुमच्या लेकीला तुम्ही माफ नाही करणार..? लहानपणा पासुन अनेक चुका पोटात घातल्या ना तुम्ही, मग आता ही चूक नाही का घालणार पोटात.. " आणि ति बाबांचे पाय धरते..

" रोज फोन करतेस, पण बोलता येतं नाही का.. " बाबांनी बरोबर ओळखलं होतं..
वडिलांच काळीज पण ते प्रीतीला समजल नव्हतं..

" बाबा.. "

" पळुन जाताना एकदाही ह्या बापाचा विचार नाही आला तुला..? एकदा माझ्या जवळ बोलली असती तर आज अशी खाली मान घालुन आठ वर्षे राहिली नसती..बापावर इतकाच विश्वास होता का..? "

" बाबा खरंच मला माफ करा.. "

" मुलगा झाला हे सुद्धा तुला वाटलं नाही का सांगावस, इतका निर्दयी वाटला का तुझा बाप.. "

ति रडु लागते ति आईचे सुद्धा पाय धरते, " ही आई तुझी मैत्रीण बनु शकली असती, जर तुझा माझ्यावर विश्वास असता तर.. "

"आई मला खरंच माफ कर.." आणि ति आईला मिठी मारते..

अभिराम आणि विजय हे सारं पाहत असतात, " ये बाळा... जवळ ये... " तिची आई अभिराम ला जवळ घेते आणि त्याच्या हातात चॉकलेट देते आणि गालाचा पापा घेते.

" बाबा माफ करा.. आम्ही खरंच चुकलो.. " विजय त्यांची माफी मागतो पण बाबा त्याला काहीच दोष देत नाही कारणं चूक फक्त आणि फक्त आपल्या मुलीची होती.

मुलगा कितीही लाख बोलु दे, पण पळुन जाऊन मुलीने लग्न करू नये ह्याचा एका आई बापाला किती मनस्ताप होतो हे फक्त त्या आई बापाला माहित असतं.

समाप्त..




🎭 Series Post

View all