वधू संहिता भाग 15

A romantic & adventurous story of a young girl & her groom. Thank you
अजयने बॉसच्या पाया जवळ बेशुद्ध पडलेल्या अंजलीकडे बघितलं. त्याला वसतिगृहात मुलाचा वेष घेऊन भेटलेली, खट्याळपणे त्याच्या गालावर ओठ टेकवून पप्पी घेणारी अंजली आठवली. त्याच्या नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. कसा विसरणार तो तिला? ती पहिली मुलगी, जिच्या स्पर्श मात्राने त्याचं अंग अंग शहारलं होतं. वामन तिला आत घेऊन आला तेव्हाच अजयने तिला ओळखलं पण भावनेच्या आहारी जाऊन एका मोठ्या कामगिरीवर पाणी सोडणं त्याला योग्य वाटलं नाही. अजून स्फ़ोटक घेऊन येणारा माणूसही यायचा होता. त्यात त्याला हमी होती कि तो बॉस इतक्या सुंदर मुलीला असंच ठार करणार नाही. पण राजेशला विचलित झालेलं पाहून त्यानं मनोमन योजना आखली. तसेंही ते मुलींची तस्करी करणाऱ्या बॉस कडून मुलगी विकत घ्यायची असल्याची सबब बोलूनच इथे आलेले. अजयने त्याच्या समोर ठेवलेली बियरची पूर्ण शिशी अंजलीवर ओतली. राजेश, वामन, उमेश आणि त्यांचा बॉस त्याला आश्चर्यानं बघू लागले. ओलाव्याने अंजली शुद्धीवर आली. आजूबाजूला बघून ती जागेवरच परत लुढकली. "माशा अल्लाह, काय रुप असता. तुमी बस किम्मत बोल. आम्ही हिला अरब अमिरातला घेऊन जाती आणि आपली बेगम बनवती. आमच्या शंभर बेगमच्या हरम मधे ही हिरा दिसती हिरा.""हो हो" अंजलीचा बचाव करायची अजयची योजना लक्षात येताच राजेश बोलला, "बडे मियाला दर महिन्याला एक नवीन बेगम लागती. पण हीला बघून एक वर्ष तरी नवीन बेगम नाही लागणार असं दिसती."बॉस काय करावं म्हणून विचार करू लागला. तसही अंजलीला मारून समुद्रात फेकने किंवा शेखला विकून अरब अमिरातला पाठवणं. दोन्हीही सारखंच होतं."बॉस आपल्याला पैसा कामातच येईल. हो म्हणून द्या." उमेश म्हणाला. "बाहेर देशातून आपल्याला खूप पैसा मिळणार आहे हे मुंबईतील स्फ़ोट झाल्यावर. तेव्हा काही गरज नाही हिला विकायची. सरळ गोळी मारून खतम करून टाका." वामन कण्हत म्हणाला. त्याला अंजलीने नको त्या जागी चांगलीच जोरात टाच मारली होती. "किती विचार करती तुम्ही लोका? आम्ही या मुलीचे तिस हजार देती." त्यांना विचार विनिमय करत असल्याचे पाहून अजय म्हणाला. "काय?" उमेश डोळे फाडून म्हणाला. "कमी असती, ठीक आहे चाळीस देती.""इतके?""आम्ही अमीर शेख असाच असती. आम्हाला आवडलेली चीज आम्ही मिळवूनच राहती." राजेशने माहिती पुरवली. "छोटे मिया सुटकेस मधून पन्नास हजार काढून देऊन टाकती यांना."अंजली डोळे मिटून निपचित पडून सर्व ऐकत होती. वामनचा तिला मारून टाकण्यावरचा कल पाहून तिला स्वतः ला शुद्धीत नसल्याच दाखवण्यातच भलाई वाटली.इथून बाहेर पडताच वेळ पाहून शेखला चकमा द्यायचं तिने ठरवलं. बॉस ओके म्हणून शेख कडून पैसे घेणार तोच पन्नाशी पार मिस्टर शेन मोठ्या रुबाबात सिगार पीत त्याच्या माणसा सोबत आला. हे क्लब म्हणजे त्यांचा नेहमीचा मिटिंग अड्डा. उमेशने पुढे होऊन त्याला बसायला खुर्ची दिली. "बँगो !" त्यानं त्याच्या माणसाला आवाज दिला. तशा त्यानं दोन सुटकेस टेबलवर ठेऊन उघडल्या. एक पैशांनी भरून तर दुसरी स्फोटक साहित्यानं भरून होती. "हा तुमचा पैसा आणि हे विस्फोटक साहित्य. दोन दिवसांनी बूम बूम आवाज बॉर्डर पार ऐकू आला पाहिजे. समजलं.""नक्कीच !""ही कारिगरी व्यवस्थित पार पडली कि लगेच दुसरं काम देण्यात येईल. ते करून झालं कि कॅनडाचा व्हिजा घ्यायचा आणि इथून नेहमी साठी फुर्रर्रर्र व्हायचं.""धन्यवाद मिस्टर शेन. You are great. नाहीतरी या देशात काही भलं होणार नाही आमचं. मेले राजनेता आपलीच घरं भरत आहेत. आता मज्जा येईल त्यांची." बॉस च्या डोळ्यातून आग बाहेर पडू लागली. इतके त्याचे डोळे लाल झाले, "मी या देशाला माझा मुलगा दिला, सीमेवर लढायला पाठवलं आणि यांनी नकली हत्यारं दिले त्यांना लढाई करायला. ज्यानं माझ्या पोराला जीव गमवावा लागला. मी यांना शांततेत जगू देणार नाही."अजयला बॉसवर दया आली आणि स्वार्थासाठी सीमेवर लढायला गेलेल्या जवानांना नकली हत्यार देणाऱ्या नेत्यांचा प्रचंड राग आला. त्याने राजेशकडे बघितलं. त्याचं सगळं लक्ष अंजलीवर होतं. अजयनी त्याचा हात दाबून खिडकीतून बाहेर बघायचा इशारा केला. "बॉस तुम्ही पाणी प्यावा. त्रास नको करा. हा तुमचा देश असताच असा." अजय पुढे होऊन बॉसला पाणी देत म्हणाला, " पण इथली छोकरी सुंदर असता. ही छोकरी आम्हाला द्यावा. सौदा करावा आणि आम्हाला जाऊ द्यावा."मिस्टर शेनने उभं होऊन अजयला वर पासुन तर खाली नीट बघितलं. मग अजयच्या खांद्यावर हात मारून म्हणाला,"इथल्या ब्युटीचा तर आम्हीही कायल असतो. तेव्हा आम्ही हिला सोबत आमच्या देशात नेऊ आणि आमच्या विशेष मांडलीला पेश करू."हे अजयसाठी अनपेक्षित होतं. पण यांना आपण पकडणार आहोत हेही त्याला माहित होतं म्हणून तो हसून म्हणाला, "आहा, तुमचा आणि आमचा चॉईस सारखाच असता. काही त्रास नाही. आमच्या हरम मधे शंभर बेगम असता. पण बॉस अशीच सुंदरी आमच्या साठीही शोधा."बॉस त्याच्या मुलाला आठवून दुःखी झालेला. त्यानं फक्त मान हलवली. अंजली मनातल्या मनात मृत्युंजय मंत्र जपू लागली, "ओम त्रम्ब्यकं यजामहेम... "राजेश खोकलला. अजयने त्याच्याकडे बघितलं. त्यानं बाहेर पोलिसांच्या गाड्या आल्याचा इशारा केला. अजयने पापण्या उघड झाप केल्या. म्हणजे आपण नक्की कुठे आहोत हे पोलिसांना कळावं म्हणून हातातल्या घड्याळातली टॉर्च सुरु करून त्यांना इशारा द्यायला सांगितलं.इशारा मिळताच तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला पोलीस इन्स्पेक्टर तिथे दाखल झाला."हँड्सअप, कोणीही पळ काढायचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी क्लबला सर्व बाजूंनी घेरलं आहे. चुपचाप सामान्य जनतेला त्रास न देता आमच्या सोबत चला आणि माफीचे साक्षीदार व्हा.""अजिबात नाही." दाराआड लपलेल्या उमेशने इन्स्पेक्टरच्या डोक्याला पिस्तूल लावली, "पिस्तूल खाली टाक आणि सांग तुला इथे कोणी पाठवलं. इन्स्पेक्टर नाहीतर तु गेला."इन्स्पेक्टरला सक्त ताकीद देण्यात आली होती कि काहीही झालं तरीही आपली माणसं तिथे त्यांच्यात आहेत हे समोर येऊ द्यायचं नाही.इन्स्पेक्टर गप्प होता. लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर इन्स्पेक्टरला गोळी मारायला हे लोक कमी करणार नाहीत हे जाणून अजयने अंजलीला उचलून घेतलं. "तुमच्या लढाईत या सुंदरीला दाग नको लागायला. म्हणून मी मिस्टर शेनच्या गाडीत हिला ठेवतो. बँगो, come with me.""खूप झाली चलाखी नकली अरब अमीर शेख." बॉसने अजयच्या डोकयावर पिस्तूल लावली, "तुझा चेहराच सांगतोय तुझा किती जीव आहे या मुलीत ते. तुझी साथीदार आहे ना ही?""हो आहे ती आमची साथीदार," राजेश बॉसच्या डोकयावर पिस्तूल लावून म्हणाला."पिस्तूल खाली टाक नाहीतर तुझी खोपडी उडवायला मी मागेपुढे बघणार नाही. तिला सोफ्यावर ठेव." शेन राजेशच्या डोक्याला आपली बंदूक लावून अजयला म्हणाला. अजयने अंजलीला सोफ्यावर ठेवलं. "इतका गोंधळ? हे काय होत आहे इथे? आणि हा असा अमीर शेख बनून का आलाय? नक्कीच दुसऱ्या गँगचा मेंबर असेल का हा कि हेर असेल आपल्या देशाचा?" अंजलीने अजयचा आवाज आणि हातांचा स्पर्श ओळखला. अंजली अर्धे डोळे उघडून सर्वांना बघत विचार करू लागली."हो नक्कीच हेर असेल. मी ज्यां दोघांचं संभाषण पहिल्यांदा वसतिगृहात ऐकलं त्यांचा मागोवा घेत आला असेल हा वसतिगृहात विद्यार्थी बनून. किती छान मी पहिल्यांदा खऱ्या जासूसला पाहतेय. अगदी कादंबरीत वर्णन करतात तसाच आहे हा, रुबाबदार, बलवान, चतुर आणि चणाक्ष. पण हा इन्स्पेक्टर, याला समजत नाही का असं एकटं येतात का गुंडांना पकडायला? अशाप्रकारे काय हे मुंबईवर होणारे हल्ले थांबवणार? मलाच काहीतरी करावं लागेल असं दिसतंय. पण मी कशी निघू इथून?"बॉस, उमेश, वामन, राजेश, शेन, अजय, सगळ्यांनी एकमेकांवर बंदूक रोखलेली. कोणीच मागे व्हायला तयार नाही. अंजलीची नजर कोटच्या बाहीतुन चाकू काढत असलेल्या बँगोवर गेली. तो चाकू अजयला मारणार असं तिच्या लक्षात आलं. ती पटकन उठून अजय समोर, डोळे घट्ट मिटून उभी झाली. तिला वाटलं आता बँगोच्या हातातील चाकू तिच्या पोटात जाऊन तिची आतडी बाहेर येणार. पण त्या आधीच अजयने तिच्या पोटाजवळ आलेला चाकू पकडला. अजयचा असा अवतार पाहून राजेशने शेनच्या हातातील बंदूक हिसकावून त्याला दूर लोटलं आणि बॉस वर गोळी झाडली. हे बघून इन्स्पेक्टरही ऍक्टिव्ह झाला. त्यांच्यात हातापायी सुरु झाली. बाहेरून पोलीसही मोठ्या संख्येने आत यायला सज्ज झाले. क्लबच्या मॅनेजरला म्युझिक बंद करायला लावून सर्वांना क्लब खाली करायला सांगण्यात आलं. अंजलीच्या मनात आलं, "अजून काहीच दुखलं नाही की आग झाली नाही. मेलो का आपण चाकू पोटात गेल्या बरोबर?" हे बघण्यासाठी अंजलीने डोळे उघडून तिच्या पोटाकडे बघितलं तर चाकू धरलेल्या अजयच्या हातातून पाण्यासारखं टपटप रक्त जमिनीवर पडू लागलं.अंजली पलटून अनिमिष नजरेने त्याला एकटक बघू लागली."धाव, जा इथून, पळ... " तो तिला ओरडून सांगत होता यावरही तिचं लक्ष नव्हतं. बँगोने चाकू सोडून देऊन अजयवर मुक्क्यानं वार केला. अजयने अंजलीला बाजूला करून त्याला दूर लोटलं. "I love you, मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करेल." ती अजयला म्हणाली. "काय?" अजयला समजत नव्हतं या अशा परिस्थितीत ही लग्नाबद्दल कशी काय बोलू शकते."हो." अंजलीने अजयच्या गळ्यात हात टाकून त्याच्या ओठांच चुंबन घेतलं, "जिवंत राहा." इतकं म्हणून अंजली तिथून बाहेर पडली. अजय थक्क होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघू लागला. क्रमश :धन्यवाद !तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. फोटो साभार गुगल, Pinterest वरून ©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all