वधू संहिता भाग 16

Romantic & adventurous story of a young couple

अंजलीला जातांना बघत असलेल्या अजयवर, बँगो खाली पडलेला चाकू उचलून धावून आला.

"आज तो बहोत खुश होंगे तुम?" अजयला टोमणा मारून राजेश बँगोवर तुटून पडला, "मी तर आधीच ओळखलं होतं तुला ती आवडली म्हणून. Love at first sight !"

"राजेश असं काहीच नाही." वामन आणि उमेश सोबत दोन दोन हात करत अजय सफाई देत म्हणाला, "तु बघितलं ना तिने मला किस केला. मी नाही."

"हो तिने केला, पण तु थांबवलं तर नाही ना तिला किस करण्यापासून. तूझ्या तर दोन्हीही हातात लड्डु. आणि आमच्या तोंडाशी येऊन घास गेला. काय गरज होती इतकी  हिरोगिरी दाखवत चाकू पकडायची?"

"तिची आतडी बाहेर आली असती."

"मी गोळी मारणारच होतो त्याच्या हाताला."

"ओके आय एम सॉरी."

"काय सॉरी? फक्त तुझ्याशीच लग्न करणार म्हणून तुला जिवंत राहा असं सांगून गेली ती." 

"मी उद्याच सांगतो तिला की मी ऑलरेडी एंगेज आहे म्हणून. आता खुश?"

"तु कसा सांगणार तिला?" राजेशने डोळे मोठे करून अजयला विचारलं, " म्हणजे तुला माहितेय कुठे राहते ती? आणि इतके दिवस झाले तु मला सांगितलं नाहीस."

"तुझं लक्ष भरकटनार म्हणून नाही सांगितलं. ती वधू संहिता ची विद्यार्थीनी आहे. मी संस्थेच्या रजिस्टरमधे उमेश आणि वामन ची माहिती शोधत होतो तेव्हा तिचा फोटो बघितला ."

"नाव काय तिचं?"

"मला तिची माहिती वाचणं इतकं महत्वाचं नाही वाटलं."

"बघ कसा खोटं बोलतोय तु. म्हणे माहिती समोर असून वाचली नाही."

"तुला पटो ना पटो पण मी असाच आहे राजेश. काम पूर्ण झालं की इतरत्र लक्ष देणं मला नाही जमत."

पोलिसांनी वामन, उमेश, बॉस, शेन आणि बँगो सर्वांना ताब्यात घेतलं. 

"चल आपल्याला वस्तीगृहात जायला हवं." अजय राजेशला म्हणाला, "मी घरी काही महत्वाचं काम निघालं असं श्री परांजपेला सांगून उद्याच कमिशनर सांगतील तिथे जॉईन व्हायला जातो. मग ती तुझीच आहे."

राजेशने अजयला निरखून बघितलं.

"हे बघ तुमचं लग्न झालं तर मला काहीच फरक नाही पडणार. I am a handsome, young & dashing police officer , most eligible bachelor of mumbai. मला कोण ना कोणी अप्सरा मिळूनच जाईल. खटकते हे की तुला ती आवडली आहे हे तु मान्य करत नाही आहेस."

"मला आयुष्यात अजून खूप कोडी सोडवायची आहेत राजेश. लग्नाबद्दल घरच्यांशी वाद करून आणखी एका कोड्यात नाही पडायचं मला. लग्न ही गोष्ट अगदी नगण्य आहे माझ्यासाठी. मी लग्न करतोय ते फक्त आईला आनंदी पाहता यावं म्हणून आणि आबांच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी. जेव्हा पासून मी लग्नाला होकार दिला आहे आई हसत आहे, हो नाहीच्या पलीकडे बोलत आहे. नाहीतर माझ्या हातात असतं तर मी कधीच लग्नाच्या भानगडीत पडलो नसतो. समजलं? परत प्लीज या गोष्टी वरून माझ्याशी वाद नको घालू."

 अंजली क्लबच्या बाहेर पडताच कोणीतरी तिचा हात पकडून तिला पार्किंग कडे नेऊ लागलं. अंजली मुक्का ठेऊन देणार तोच ती व्यक्ती बोलली,

"हे थांब, मी किंजलचा मित्र मयंक."

"सॉरी सॉरी." अंजली त्याला नीट बघून म्हणाली, "किंजल कुठे आहे?"

"ते सर्व गाडीत बसून तुझी वाट बघत आहेत. इथे काहीतरी गडबड झाली. आम्ही नाचतच होतो की अचानक पोलिसांनी बाहेर जायला सांगितलं . म्हणून त्यांना गाडीत बसवून मी तुला शोधायला इकडे आलो."

"ओके, थँक्यू !"

अंजली दिसताच किंजलनी तिला मिठी मारली. 

"Darling where were you? You know you scared us today so much."

"सॉरी यार. मी भटकली होती. वॉशरूम शोधत कुठून कुठे गेली कळलंच नाही."

"किंजल तुम्ही निघा इथून आधी. हॉस्टेलला जाऊन बोला बाकी. आम्हीही निघतोय." मयंक काळजीने बोलला. 

"होहो अंजली बस आधी."

अंजली कार मधे बसताच मेघा तिच्या गळ्यात पडून रडू लागली आणि जया अंजलीवर चांगली भडकली. 

"तुला वॉशरूमला जायचं होतं तर मला किंवा मेघाला सोबत न्यायचं. जिथं तिथं एकटीने भटकत फिरणं बरोबर नाही. हे तुझं गाव नाही. मुंबई आहे ही."

"अगं पण ती आतच तर होती ना क्लबच्या?" मेघा तिला म्हणाली. 

"हा पण क्लब तर मुंबईत आहे."

"शांत बसा तुम्ही दोघीही. मिळाली ना तिथे?" किंजलच्या शेजारी फ्रंट सीटवर बसलेली शारदा इरिटेट होऊन बोलली. तिचं लक्ष अंजलीच्या ड्रेसवर गेलं. 

"तूझ्या फ्रॉकच्या बाह्या कोणी फाडल्या? आणि तुझी लिपस्टिकही पसरल्या सारखी दिसतेय?" शारदाने मागे वळून अंजलीला विचारलं. 

"अं S S, मी चुकून त्या गुंडांना जाऊन धडकली आणि त्यांना वाटलं मी पोलिसांची हेर आहे म्हणून त्यांनी मला टॉर्चर करण्यासाठी माझ्या बाह्या फाडल्या. पण वेळेवर पोलीस आले आणि मी वाचली." अंजली खोटं खोटं हसून म्हणाली. 

"नक्की?" चौघींनी तिला एकसुरात विचारलं. 

"हो नक्कीच."

"बघ नाहीतर मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना मुलगा मुलगी जवळ आले की काय होतं?" किंजल म्हणाली, "म्हणून तुझी मदत करता यावी यासाठी आम्ही विचारतोय."

अंजली काहीच बोलली नाही.

"It's ok, आता ती शॉक मधे आहे. इतके प्रश्न नका विचारू. आम्ही बोलू रूमवर फ्रेश झाल्यावर." मेघा म्हणाली. 

"हो बरोबर, आता आपलं वसतिगृहात लवकरात लवकर जाणं महत्वाचे आहे. एक वाजलाय." जया म्हणाली. 

वसतिगृहात गेल्यावर तिघी फ्रेश झाल्या. अंजलीचा चेहरा अजूनही खूप चिंताग्रस्त दिसत होता.

"नक्की काय भानगड झाली अंजली?" जयाने तिच्याजवळ  पलंगावर बसून विचारलं, "तूझ्यासोबत खरंच कोणी मुलाने काही केलं का?"

"हे काय विचारतेय तु जया? कोणी मुलाने काही केलं असतं तर ती तिच्या पायाने धावत आली असती का आपल्याकडे?" मेघा अंजलीच्या बचावाला धावून आली.

"मी तुला प्रश्न केला नाही. तिचा चेहरा बघ कसा पडला आहे. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे." जयाने परत अंजलीकडे मोर्चा वळवला,

"तु सांगणार का आता काय झालं ते?"

"माझ्यासोबत कोणी काहीच नाही केलं. मीच भावनेच्या भरात एका मुलाच्या ओठांचं चुंबन घेतलं." अंजली लाजून उत्तरली. 

"काय?" दोघींनी डोळे फाडून तिला वरून खाली न्याहाळलं. 

"हुम्म्म," अंजलीचा चेहरा परत चिंताग्रस्त झाला, "आता मी प्रेग्नेंट होणार ?"

"तु फक्त ओठांचंच चुंबन घेतलं ना?" मेघाने विचारलं. 

"हो"

"मग कशी होणार प्रेग्नेंट?"

"पण त्या दिवशी किंजल तर म्हणाली होती की मुला मुलीने एकमेकांचं चुंबन घेतलं की मुलीला दिवस जातात."

"कोणत्या दिवशी?" जयाने भुवया उंचावून विचारलं. 

"आपण नाही का सर्व सिनेमा पाहायला गेलो होतो परांजपे मॅडमला विचारून. त्यात हिरो हिरोईन ओठांचे चुंबन घेतात  अन मग काही दिवसांनी हिरोईनला उलट्या होतात, चक्कर येतात आणि डॉक्टर सांगतो की तिला दिवस गेलेत. म्हणून मी माझ्या शेजारी बसलेल्या किंजलला विचारलं की बाळ असं होतं का? तर ती हो  म्हणाली आणि बोलली की लग्न झाल्यावरही तेव्हाच नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं जेव्हा बाळ हवं असेल."

"आणि तु विश्वास ठेवला." जया हसतच तिला बोलली. 

"हो ना हे जर खरं असतं तर ती स्वतः आतापर्यंत एक दोन डजन मुलांची माय असती." मेघाही पोट धरून हसू लागली. 

"म्हणजे तिने मला मूर्ख बनवलं."

"हो, मग काय?"

"मग कसं राहतं बाळ? त्या सिनेमात का नाही दाखवलं?"

"कारण ती खूप खाजगी गोष्ट आहे. डॉ सुप्रियाचा वर्ग आहे परवा. त्या समजावून सांगतील व्यवस्थित." जया म्हणाली, "पण तुला इथे मुंबईत असं कोण भेटलं ज्याचं तुला चुंबन घ्यावं वाटलं?"

"मी नाही ओळखत त्याला?"

"गजब, ओळखत नाहीस म्हणतेस आणि सरळ चुंबन घेतलं. मला पूर्ण कथा सांग बरं तु. तसेंही तीन वाजलेत आणि हसून झोप उडली. तेव्हा तुझंच पुराण पूर्ण होऊ देऊ आज." जया म्हणाली. 

"हो हो मलाही ऐकायचं आहे नक्की काय झालं ते." मेघा ही उत्सुक होऊन म्हणाली. 

अंजलीने मुलांच्या वसतिगृहातील गोष्ट सोडून क्लब मधे घडलेलं सगळं पुराण सांगितलं. 

"तुला त्याचा नाव गाव पत्ता काहीच माहित नाही आणि तु इतक्या लोकात सरळ त्याला त्याच्या सोबतच लग्न करणार असं म्हणालीस?" जयाला अंजलीच खूपच आश्चर्य वाटलं.

"अगं त्याला जिवंत राहायलाही सांगून आली ही."

"हो ना, कमाल आहे तुझी. तुझं लग्न ठरलेलं आहे विसरलीस का तु?"

"नाही विसरली. मी बाबांना समजावून सांगेल व्यवस्थित. मला माहित आहे ते मला अजिबात बळजबरी करणार नाहीत."

"अगं पण तो ASP पोलीस, ज्याच्याशी तुझं लग्न जुळलं आहे. त्याला राग आला तर किंवा त्यानं करतोच म्हटलं तूझ्याशी लग्न तर?"

"त्याला कशाला राग यायचा? पण तरीही मी त्याला समजावून सांगणार की तो मोठा पोलीस अधिकारी. त्याला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळणार. वाटलंच तर शोधून देईल मी एखादी."

"देवी हे जग इतकं सोप्प नाही." जया तिला गंम्मतच हात जोडून म्हणाली.

"माझ्या तर डोक्याच्या वर गेलं सगळं. मी झोपते." मेघा तिच्या पलंगावर पडून म्हणाली. 

"हो हो मी पन झोपते. उद्या लवकर उठावे लागेल." अंजलीही ब्लॅंकेट अंगावर ओढून झोपली. 

"काय पोरगी आहे? अगं तु त्याला शोधणार कुठे हा तर विचार कर." जया अंजलीला हलवून म्हणाली. पण अंजली काहीच बोलली नाही. चुपचाप झोपल्याच मिस घेऊन पडून राहिली मनात विचार करत, 

"मला त्याला शोधायची गरजच नाही. तोच शोधून घेईल मला."

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 


©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all