वधू संहिता भाग 25 #मराठीकादंबरी

A romantic, suspense & comedy story of a mischievous young bride & her groom

अजयला बेडवर झोपलेलं बघून अंजलीला त्याला खाली ढकलून द्यायला गेली अन लगेच थांबली.

"छे, आता हा खडूस व्हिलन झालाय आपल्या आयुष्यातला. याच्या पासुन दूर राहिलेलंच बरं." ती स्वतःशीच पुटपुटली आणि खाली चटई टाकून झोपली.

"ही मला जीवे मारायला आली होती का?" तिच्या चाहूलीने झोपायचं नाटक करत असलेल्या अजयच्या मनात आलं.

अजयने उठून दोर शोधला आणि अंजलीच्या जवळ गेला. अंजलीला जाणीव झाली.  

"हे काय करताय? दूर व्हा माझ्यापासून. अजिबात पुढे यायचं नाही. नाहीतर मी.." ती उठून बसली झाली. 

"नाहीतर? "

"मी तुमचं डोकं फोडणार?"

"कसं?"

अंजलीने हाताने त्याला ढकलायचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं. त्यानं तिचे दोन्हीही हात बांधले.

"हे काय, कशासाठी?"

"तुमच्यावर माझा विश्वास नाही. दिवस भरचा थकलेला मी. माहित पडलं तुम्ही गाढ झोपेत असलेल्या माझा गळा कापला."

"तुम्ही खूप ridiculous व्यवहार करताय माझ्याशी. तुम्हाला मी सोडणार नाही."

"मला माहित आहे." अजय तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, "म्हणूनच मी ही काळजी घेतोय. झोपा आता गप गुमान नाहीतर मला तुमच्या तोंडालाही पट्टी बांधावि लागेल."

"बांधूनच द्या मग कारण मला खाली झोप येत नाही."

"ओके, for a peaceful night, I will do it." अजयने तिला उचलून बेडवर ठेवायच्या विचाराने पकडलं. अंजलीने त्याला धक्का दिला. 

"No need, I can walk myself." अंजली बेडवर बसली, मग पाय वर घेऊन झोपली. पण पाठीशी बांधलेले  हात. अंगावर चादर कशी घ्यायची?

अजयने चादरीला हात लावला तशी अंजली ओरडली.

"मी म्हटलं का चादर द्या म्हणून? नाही ना ! मग जा झोपा तुम्ही." अंजलीने दातात चादर पकडून मोकळी केली आणि होईल तशी अंगावर घेतली. 

अजयने तिला thumbs up केलं. 

"You are a very capable lady. म्हणून मला तुमच्यावर  जास्त शंका येतेय."  अजय तिच्या अंगावर नीट पांघरून देत म्हणाला, "नाहीतर बघा ना एका व्यापाऱ्याची एकुलती एक, फुला सारखी नाजूक, नुकतीच अठरा वर्षात पदार्पण केलेली मुलगी अशी बिनधास्त, लडाकु वृत्तीची कशी असू शकते?"

तो क्षणभर थांबून परत बोलू लागला, "तुम्ही जुडवा बहिणी आहात का? म्हणजे ते सिनेमात दाखवतात तसें 'गुम के मेले मे बिछडी बेहेने|"

"मला वाटतं तुम्ही दिवसभर पोलीसगिरी करून थकले आहात आणि आता झोपायला हवं तुम्हाला."

"अरे हो मी विसरलो होतो. Good night."

"याने माझे हात बांधले, दृष्ट माणूस. कुठून याच्या प्रेमात पडली होती मी?" अंजली विचारातच झोपून गेली. 

सकाळी सात अजयला जाग आली. अंजलीकडे बघितलं तर ती बेडच्या अगदीच काठावर होती. जरा हलली तर खाली पडणार म्हणून त्याने तिला बेडच्या मधे करायच्या विचाराने खांद्याला धरलं.

"तुम्ही?" अंजली चिडून त्याला म्हणाली, "काय माणूस आहे? मी नाही त्यातली अन कडी लावा आतली."

"म्हणजे?"

"म्हणजे काल पर्यंत तर माझी ड्युटी, माझं मिशन माझं जीवन करत लग्न, बायको, परिवार यांच्याकडे दुर्लक्ष करत  फिरत होते आणि मी तीच क्लबमधे तुम्हाला किस करणारी मुलगी आहे हे कळताच परत परत माझ्या जवळ येण्याचा बहाणा शोधताय तुम्ही."

अजय तिला सोडून दूर झाला अन ती तशीच तोल जाऊन खाली पडली.

"आई गं !" अंजलीला चांगलंच लागलं.

"आता कळलं मी का पकडलं होतं ते?" अजयने तिचे हात सोडून दिले.
"मी ऑफिसला गेल्यावर, मी परत येईपर्यंत अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही."

........
अजय त्याच्या केबिनमधे मिलिटरी हत्यार संबंधीत काही जुन्या फाईलचा अभ्यास करत होता. राजेश दारावर नॉक करून आत आला. 

"अजय काही टेंशन आहे? खूप गहन विचारात दिसतोय?" राजेशने अजयला विचारलं, "माझी शंका खरी निघाली कि काय?"

"सध्या मी काहीच सांगु नाही शकत."

"ओहो, मग चेहरा बघितला कि नाही? आपल्या वधू संहिताच्या विद्यार्थीनी पेक्षा सुंदर आहे का ती दिसायला?"

अजयने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं.
"आपण सध्या आपल्या कामावर फोकस करावा राजेश."

"हुम, म्हणजे ती तिच्यापेक्षा सुंदर नाही तर." राजेश रुबाबात त्याला म्हणाला, "असू दे, लवकरच मी तुला तिच्याशी भेटवणार, तुझी वहिनी म्हणून."

राजेशच्या या वाक्यावर अजयला हसू आलं. "याला अंजली तीच मुलगी आहे हे कळल्यावर काय मज्जा येईल?" अजयच्या मनात आलं.

"तु हसत का आहेस?" राजेशने त्याला विचारलं, "म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला सांग काय झालं ते?"  

अजय फक्त हसत त्याला खांद्यावर थोपटून आपल्या कामात मग्न झाला. 

संध्याकाळी अजयने मीराला ड्रायवर सोबत घरी पाठवलं.
"मीरा !" अंजलीने तिला जोरात मिठी मारली, "मला तुझी खूप आठवण आली."

"हो, दाजींनी मेजर आजोबाला फोन वर सांगितलं तुला एकटं करमत नाही. म्हणून त्यांनी मला तातडीने इथे पाठवलं.

"मिस्टर खडूस द व्हिलन नी सांगितलं आबाला तुला पाठवायला. म्हणजे नक्कीच गडबड आहे."

"का ग? काय झालं?"

अंजलीने तिला घडलेलं सर्व सांगितलं.

"अरे देवा ! हे तर कांड झालं. आता कसं?"

"जे होईल ते बघू, फक्त तु मला वचन दे, मला काहीही झालं तरीही तू आनंदात जगशील आणि माझ्या आजी, सीमा आई, बाबा आणि मंदार कडे लक्ष देशील."

"ते काय सांगायला हवं मला !" मीरा अंजलीचा हात हातात घेऊन म्हणाली, "पण मला वाटतं दाजींना झालेला गैरसमज लवकरच दूर होईल."

"काय माहित काय होईल? तु मला माझं परकर पोलकं दे काढून आधी. ही साडी माझा जीव घेतेय."

"छान !" दाराच्या आडोशाने उभ्या असलेल्या अजयने टाळ्या वाजवत घरात प्रवेश केला, "तुम्ही दोघींनी मिळून फक्त मलाच नाही तर माझ्या घरच्यांनाही मूर्ख बनवलं."

त्याने मुद्दाम अंजली आणि मीरा एकमेकांना भेटल्यावर काय बोलतात, कश्या वागतात हे बघण्यासाठी मीराला ड्रायवर सोबत घरी पाठवलं आणि तिच्या मागोमाग तोही आला. त्याला समोर बघून दोघींचे वारे न्यारे झाले.

"मीराची यात काहीच चूक नाही. मी सांगितलं तसं ती वागली." अंजली स्वतःला सांभाळून आत्मविश्वासाने त्याला म्हणाली.

"हो दाजी. पण आमच्या अंजुच्या मनात काही वाईट हेतू नव्हता. तिची चुकी इतकीच कि तिने रागात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा, म्हणजे तुमचा फोटो न बघता फाडून चुलीत फेकून दिला. म्हणून तुमची मुंबईला भेट झाली तेव्हा तिने तुम्हाला ओळखलं नाही."

"ठीक आहे. पण लग्न झाल्यावर जेव्हा अंजलीला समजलं कि मी तोच आहे ज्याच्याशी यांना लग्न करायचं होतं. तेव्हा तरी यांनी किंवा तुम्ही मला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं ना !" एक लांब श्वास घेऊन स्वतःला शांत करून अजय बोलला, "तुम्हाला माहितेय मी एका खूप महत्वाच्या आरोपीवर काम करतोय. ज्या दिवशी तुम्ही आजोबा सोबत इथे आल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशीच दवाखान्यात भरती असलेल्या त्या आरोपीवर हल्ला झाला. " अजयने तिला राजेशने बोललेलं सगळं सांगितलं. 

"नाही जमलं मला आणि हे सगळं असं झालं. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. हात जोडून क्षमा मांगते." अंजलीने त्याच्या समोर हात जोडले.

तो काहीच न बोलता तिथून निघून गेला.

"आता काय करायचं अंजु?"

"काय करायचं म्हणजे?" अंजली उत्तरली, "अभ्यास करायचा बारावीचा आणि वधू संहिताला भेट द्यायची. मला वाटत होतं तिथे मुलींना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात हातभार लावायला एक संधी मिळावी. आता ती मिळाली. मी आता परांजपे मॅडम सोबत बोलून अभ्यास क्रमात ते सर्व बदल करणार ज्यांनी मुली आत्म निर्भर बनतील."

"अगं पण दाजी तर चांगलेच रागावलेत वाटतं." मीरा अंजलीला काळजीने म्हणाली.

"हे बघ त्यांना विचार करू दे, थोडा वेळ जाऊदे. 
सगळं होईल ठीक . तसही जे आपल्या हातात नाही, त्याच्या मागे लागणे, सतत त्याची चिंता करणे व्यर्थ असतं."

"पण??"

"पण बिन काही नाही. माझ्या कमरेला वळ पडलेत त्या साडी पेटीकोट पायी. त्यावर हळद गरम करून लावून दे."

"हो !" मीरा हळद आणायला गेली.

"अजयची चिंता करायची नाही हे मीराला समजावलं. स्वतःला कसं समजावू?" अंजली विचार चक्रात गुंतली. 

अंजलीचे मॅटर सॉल्व झाले यातच त्याला बरं वाटलं. त्यानं आता पूर्ण लक्ष बॉसवर देणं सुरु केलं. 

 बॉसची तब्बेत आता बरी झाली म्हणून त्याला एका गुप्त बंगल्यावर ठेवण्यात आलं. अजय आणि राजेश त्याच्यावर पाळत ठेवून होते. डॉक्टरने हिरवा झेंडा दाखवताच अजयने त्याची विचारपूस करायचं ठरवलं.

"कसे आहात तुम्ही, श्रीमान महेंद्र कुमार?" अजयने बॉसला विचारलं.

"कोण महेंद्र कुमार?" बॉसने आधी अजयला आश्चर्यानं बघितलं मग त्याला म्हणाला, "माझं नाव बॉस आहे, बॉस ! समजलं?"

"गाढवाने सिंहाची कातडी अंगावर पांघरून घेतली म्हणून तो सिंह मुळीच होत नाही."

"तु मला गाढव म्हणतोय?"

"नाही, मी तुम्हाला समजाऊन सांगायचा प्रयत्न करतोय कि तुम्ही कितीही नाव बदललं, मुखवटे घातले तरीही तुमची खरी ओळख आहे तीच राहते."

अजय त्याच्या हातावर हात ठेऊन म्हणाला, "तुम्ही एका देशभक्त कुटुंबातील आणि मीही. आपल्या दोघांच्याही पिढ्यानं पिढ्या देशसेवेत लिन झालेल्या. हे सत्य आहे, एक नकली नाव लावून ते सत्य बदलविण्याचा प्रयत्न का करताय तुम्ही?"

"हे तुझं गोड गोड बोलणं ऐकून मी काही विरघळणार नाही. मूर्ख असतात ती माणसं जी देशासाठी प्राणार्पण करायला सीमेवर जातात."

"तुमच्या मुलाला अकाली मरण आलं म्हणून हा राग आहे ना? मला तुम्ही सर्व काही सविस्तर सांगा. मी आरोपींना न्यायालयात उपस्थित करेल आणि कठोर शिक्षापात्र करेल त्यांना."

बॉस जोर जोरात हसू लागला.

"माझा या देशाच्या न्याय व्यवस्थेवर अजिबात विश्वास नाही. पोलीस, डिफेंस सर्व करप्ट आहे आणि जे करप्ट नसतात, त्यांना लवकरच मरण प्राप्त होतं. माझ्या मुलासारखं."

अजयचे डोळे भरून आले.

"तूझ्या सारख्या कर्मठ पोलीस अधिकाऱ्याने आरोपीने कबुली द्यावी म्हणून असं डोळ्यात पाणी आणण्या सारखे डावपेच खेळण बरं नाही."

"डावपेच खेळण हा आमच्या पेशाचा एक भाग आहे. पण प्रत्येकच ठिकाणी आम्ही तेच करतो हे जरुरी तर नाही. कधी कधी आमचे अश्रूही खरे असतात."

 त्यानं बॉसला त्याच्या बाबाला कसं मारण्यात आलं आणि त्यावेळी ते मिलिटरी डिफेंसला पुरवण्यात येणाऱ्या हत्यारांच्या टेंडरवर काम करत होते सर्व सांगितलं. 

क्रमश :

धन्यवाद !

तळटीप : कथा मनोरंजन म्हणून लिहीत आहे. कुठल्याही प्रकारे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. काही न आवडल्यास चूक भूल माफ करावी. 

फोटो साभार गुगल, Pinterest वरून 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all