अंगणातली तुळस..माझ्या माहेरची राखनकर्ती!!!

Written by

“निघालीस सासरी जायला??माझी सखी, माझी बहिण.. दोघीही याच अंगणात जन्माला आलो, वाढलो..एकमेकींसोबत हितगुज केलं..
माझ्याभोवती प्रदक्षिणा मारत रोज तू तुझे दुःख,आनंद,प्रार्थना सांगत होतीस,हे घर उभं राहताना बघितलं..तुझ्या आगमनाने घराचं गोकुळ झालेलं बघितलं..तू दुडुदूडू धावायला लागलीस तेव्हा इथेच माझ्या अवतीभोवती गिरक्या घ्यायचीस,लपंडाव खेळताना माझ्या वृंदावनाच्या मागे लपायचीस…
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनमोल क्षण मी जवळून पहिला..तुझ्या शाळाकॉलेजच्या निकालाचे पेढे सगळ्यात आधी मला मिळायचे..तुला पडलेली वाईट स्वप्न आजही माझ्या मनाच्या चोरकप्प्यात सुरक्षित आहेत हं!! जा तू दिल्याघरी सुखी रहा,या घराची आणि आईबाबांची राखनकर्ती आहे इथे!!या घरात येणारी नकारत्मकता,संकटं, दुःख,निराशा दारातूनच परत लावीन..हे वचन आहे माझं..!!!”

अंगणातली तुळस जणूकाही वैदेहीला आश्वासन देत होती…

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा