अखेरचा निरोप : संस्मरणीय व आनंददायी….

Written by

🔴अखेरचा निरोप : संस्मरणीय व आनंददायी ….!!

🔵नववर्षाचे संकल्प : जगण्याची नवी उमेद …!!

सरत्या वर्षाला निरोप देताना मन सद्दगदीत होते.अनेक संस्मरणीय घटना आठवणींच्या कुपीत जपून ठेवलेल्या असताना पदोपदी यांची आठवण तर येतेच पण पुढील काळामध्ये जगण्याची नवी आशा निर्माण करतात. या वर्षातील अनपेक्षित गीफ्ट म्हणजे निबंध स्पर्धेच्या निमित्ताने ईरा ब्लाॕगशी भेट झाली आणि लेखनप्रवासाला कलाटणी मिळाली… अडगळीत पडलेली लेखणी लिहू लागली..अनेक विषयावर लिहताना मन भरभभरुन जाते..आणि नवनविन विषय हाताळताना ज्ञानाने पाजळलेली लेखणी वाचकवर्गाकडून कौतुकास पात्र होते.. गंजलेल्या बुद्धीला ईरामुळे हुरुप मिळाला आहे…आज ही लेखणी निडर मनाने सारे विषय सहजपणे लिहीत आहे ही बाब आल्हादायक वाटते…

समाजासाठी मनाने उचलेले पाऊल म्हणजे गेले कित्येक दिवस मी गावातील व्यक्तिंचा वाढदिवस हा उपक्रम राबवत आहे… वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण…! त्या व्यक्तिंना आनंद देण्यासाठी वाढदिवस असणार्या व्यक्तिंच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत…जसे व्यक्तिमत्व असेल तसा त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्याविषयी गौरवपर लेखन केले आहे..सामाजिक भान राखून आंबा , चिक्कू , शेवगा अशा प्रकारची रोपे देऊन पर्यावरणाला हातभार लावला आहे.या उपक्रमात जेष्ठांचा गौरव अतिशय आनंददायी वाटतो..अजुनही हा उपक्रम चालू आहे…यातून सहृदयी प्रेरणा मिळत आहे… यावर्षाचे हे समाधानाचे फळ आहे…

अचानक उपजिवीकेचे साधन बंद पडावे आणि कौटुंबिक जबाबदारी वाढावी नेमक हेच घडल यावर्षी साखर कारखाना बंद पडला आणि जीवनातील सारी गणित कोलमडली…या वर्षाची ही धक्कादायक घटना….. पण यामुळे धीर नाही सोडला…नव्या आवेशाने , जोशाने काम सुरु आहे …नैराशाला थारा दिला नाही..नेहमी सकारात्मक विचारधारा ठेवली आहे..यासाठी ईरा , वाचकवर्ग ..लेखकवर्ग व मित्रमंडाळी यांचे अभुतपुर्व प्रोत्साहन मिळत आहे येणारा काळ निश्चितच प्रेरणा देत राहिल…

वर्ष संपत जात आणी कांही मनातले संकल्प अपुरे असतात ते पुर्ण करण्यासाठी नववर्षात नव्या उमीदीने कामाला लागावे लागते..सामाजिक प्रश्नावर लिहायला आवडते..यापुढेही अधिक विस्ताराने लिहीन….महिलांचे अनेक प्रश्न आहेत त्यांंच्याबद्दल कमालीची आस्था आहे…लेखणीने त्यांना वाचा फोडण्याचे काम करेन…अनाथ व गोरगरीबांना मदत करणे… वृद्धांचा आदर करणे.. सकारात्मक विचारधारेच्या लोकांना प्रेरणा देणे..हट्टी व हेकेखोर माणसांच्यात बदल घडवणे..दुसऱ्यांना त्रास न देणे…सर्वांचे कौतुक करणे… सामाजिक काम करणे…हे सारे संकल्प पुर्णत्वास जाण्यासाठी यावर्षी कसोशीने प्रयत्न करणार आहे..आपल्या बहुमोल मार्गदर्शनाने या संकल्पांचे सोने व्हावे हीच नव्या वर्षाची आपल्याकडून अनमोल भेट मिळावी हिच अपेक्षा आहे…

आपनासर्वांच्या नववर्षातील ईच्छा फलदृप व्हाव्या ,आपले जीवन आनंददायी घटनांनी बहरावे…आपल्या मनातील संकल्प पुर्णत्वास जावेत….व हे नविन वर्ष सर्वांना भरभराटीने जावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना …..!!

मिळावी चेतना
मिळावी प्रेरणा
मिळावा हुरुप
नववर्षात बदला जीवनाचे स्वरुप..

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
रोमांचक

Comments are closed.