अग बाई सासूबाई..

Written by

मी लग्नं करून जेव्हा सासरी आले ना ? तेव्हा पहिल्याच दिवशी माझ्या सासूबाई मला म्हणाल्या , ” तुला साडी मध्ये सुचत नाही तर तू ड्रेस घालू शकतेस..असे अजिबात नाही तू साडीचं नेसली पाहिजेस.. हे ऐकुन मला गहिवरून आले (कारण साडी नेसायला मला खूप आवडत जरी असले तरी ती नेसता येत नाही आणि नेसलीच तर त्यात मला अजिबात कामे सुचत नाही ..?)

असो , माझा मुद्दा हा नाही..तर लग्नाच्या पहिल्याच दिवशी आईच्या त्या वाक्याने मी माझ्या सासरी साखरे सारखे नाहीतर अगदी मिठा सारखे विरघळले…कारण साखर विरघळायला थोडा वेळ लागतो हो…?

त्यानंतर सासूबाई फक्त सासूबाई न राहता त्या माझ्या आई झाल्या ..आता ही गोष्ट वेगळी आहे की माझ्या चीड चिड्या स्वभावामुळे बरेचदा आईंशी रागात बोलले आहे..काय करणार ना ? स्वभावाला औषध नाही..?

पण त्या माझ्या चुका पदरात घेऊन कायम माझ्याशी प्रेमाणे वागल्या… चुकते मी !! मी माझ्या चुका मान्य करते.. थोडंफार देवाने मलाही इवलसं मन दिलंय.. आणि तेचं मन चुका झाल्यावर मला जाणीव करून देतं की , योगिता ! तू रागात असं बोलायला नको होतं…पण काय करणार ना ?? जितक्या सहजतेने माझा राग व्यक्त होतो तितक्याच सहजतेने मी माझे प्रेम कधीच व्यक्त करू शकत नाही…तो माझा स्वभावदोष झाला..

त्यामुळे बऱ्याचदा इतरांना माझा राग दिसतो , प्रेम नाही !!? पण सासूबाई आणि माझ्या नात्याचं म्हणाल तर कुकिंगची फारशी आवड नसलेली मी … त्यांनी मला स्वयंपाक करणे शिकवले ते पण न चिडता..नीट शांततेत समजाऊन सांगायच्या..मला बऱ्याच भाज्या चिरायच्या आधी धुवायची की चिरल्या नंतर धुवायची ? हे पण त्यांनीच सांगितलं..?

आता वाचकांना हा प्रश्न पडेल की हिला हिच्या आईने काहीच शिकवले नाही का ? तर असे अजिबात नाही..माझ्या आईला माझे खूप टेंशन की हिला इतकं सांगूनही जराही स्वयंपाक शिकण्याचं मनावर घेत नाही ?? पण मी तिला म्हणायचे , माझी सासू शिकवेल ग मला !! तू नको टेंशन घेऊस ..माझी आई बिचारी डोक्यावर हात मारून घ्यायची ..?

लग्नापूर्वी मी जेव्हाही असे काही सासर बद्दल बोलायचे तेव्हा देव वरून तथास्तु म्हणायचा… ? हे लग्न झाल्यावर मला लागलीच लक्षात आले..

मला जीन्स घालायला खूप आवडतं ..मी आईंना विचारलं की जीन्स घातले तर चालेल का ?? आई म्हणाल्या विजू ( माझे अहो ) ला आवडतं का तू जीन्स घातलेला ?? मी म्हणाले ‘ हो ‘ तर त्या म्हणाल्या , मग घाल ना ?? त्याला चालत असेल तर मला काही प्रोब्लेम नाही..

लग्ना आधी जीन्स न घालणारी मी !! लग्ना नंतर जीन्स घालायला लागले..लग्ना आधीचे स्वातंत्र माझे अबाधित राहिले ही माझी मागच्या जन्माची पुण्याई म्हणावी लागेल..कदाचित असेही होऊ शकते की माझ्या बऱ्याच गोष्टी , सवई माझ्या सासूबाईंना कींवा इतर सदस्यांना आवडत नसेलही पण मला कधी त्या बाबतीत रोख टोक केली नाही..

जेव्हा बघावं तेव्हा मुलं , नातवंड , सूनांच्या काळजीत असलेल्या माझ्या सासूबाई !!

लग्नापूर्वी शीळं अन्न पाहून नाक मुरडणारी मी !!लग्ना नंतर मात्र शीळं खायला लागले..कारण मी जर खाल्ल नाहीतर सासू सासरे खातील ही भीती..सासूबाई अजिबात शीळं खाऊ देत नाहीत..पण मलाच वाटतं ह्या वयात त्यांनी गरम खावं पण आमच्याकडे मात्र उलटच , सुनांनी गरम गरम खायला हवं..असे कुठे असतं व्हंय ?? ? पण आमच्याकडे असेच आहे..

मला बरं नसेल तेव्हा खूप खूप काळजी घेणाऱ्या माझ्या सासूबाई !! एकदा मी पडले आणि माझा तळपाय सुजला..काही केल्या सूज कमी होईना..क्लिनिक ला तर जाऊन आले तरीही आराम मिळे पर्यंत पायाला लेप लावून द्यायच्या आई ..

एकदा मला ताप भरला तेव्हा रात्रीचे ३ वाजले होते..ह्यांनी खाली जाऊन आईला सांगितले तेव्हा लगेच वर येऊन मला मायेने विचारपूस करून गोळी दिली..जास्तच वाटल तर मला आवाज दे म्हणून सांगून गेल्या..बर नसेल तेव्हा प्रत्येक वेळी जेवणाची थाळी रूम मध्ये आणून देतात..

जेव्हा नवरोबा बाहेरगावी जातात , मी एकटी असते तेव्हा माझ्या सोबतीला म्हणून झोपायला येतात..तेही कसे ?? त्या खाली झोपतात आणि मी बेडवर..मी कितीही म्हटलं की बेडवर झोपा तरीही नाहीच ऐकत ..मला मग चांगल वाटत नसूनही त्यांच निमूटपणे ऐकावं लागतं..

आता मी वेगळी राहते..तरीही त्यांची काही काळजी कमी झाली नाही..त्यांनी खायला काही बनवलं की वर आठवणीने आणून देतात..जेवली की नाही म्हणून विचारपूस करतात..मला त्यांचा आणि सासऱ्यांचा केयरिंग स्वभावच खूप आवडतो..त्यांचा हा गुण माझ्या नवरोबाने पण घेतला..म्हणजे बरं नसेल तेव्हा मला आरामच आराम असतो..?

असो , सासूबाईंबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच असतं..अगदी गोड गोडचं आहे असेही नाही..थोडफार भांड्याला भांडं लागतच.. बरं , भांड्याला भांडं लागल्यावर त्याचा जोराचा आवाजही होतो..पण तेवढ्यापुरतेच..चालतेच आहे..मग मुकं घर तरी काय कामाचं ?? नाही का ??

पण मला तरी वाटतं की सासू आणि सासरे दोघेही असायलाच हवेत..नाहीतर घरं उदास वाटतं…

आई ह्या चौदा तारखेला ६७ वर्षांच्या झाल्या..त्यांना आम्हा दोघांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

अश्याच कायम मला सांभाळून घ्या..मी चुकीचे वागले तरीही..?

आणि हो , सगळ्याचं सासवा वाईट नसतात..

? योगिता विजय ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा