अधीर मन….

Written by

अधीर मन…… 

तुझं माझ्यात असणं,
तुझ्या आठवणींचं प्रतीक आहे..
माझ्यापुरतं आखलेल,
माझ छोटस जग आहे….

तुझ्या त्या आठवणीला,
उंबरठ्या आड सामावलं आहे..
पायातील पैंजण मात्र,
उंबरठा ओलांडून बघत आहे…

माझ्या हृदयात जपलेल,
तुझं हवंहवंसं स्पंदन आहे..
तू नसलास तरी,तुझ्या स्पर्शाची
आजही जाणीव आहे…

तुझी वाट हे नयन,
आतुरतेने बघत आहे…
न राहवून पाऊल माझे,
उंबरा घराचा ओलांडत आहे…

शृंगार माझा अजूनही,
तुझ्या शिवाय अपूर्ण आहे…
ये रे सख्या लवकर,
अधीर मन झाले आहे….

✍️  ©जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा