अनोळखी ते दोघे..

Written by

ती…ती अगदी गोरीपान,उंचपुरी,लांबसडक केस जे तिने मोकळे सोडले होते..त्यातली एक बट तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला गुदगुल्या करत होती..गडद लाल रंगाची प्रिंटेड सारी…त्यावर साजेशी सुंदर ज्वेलेरी आणि सौंदर्य खुलायला त्या शृंगाराच्या सोबतीला सुंदर टिकली ….ती आली होती तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गावाकडे.. गावातल्या मातीच्या सुगंधात, तिथल्या धुंद हवेत आणि सौंदर्यात रममाण झाली होती.. फिरत फिरत एका पडक्या घराजवळ पोहचली… बाहेर पडवीत रोवलेलं जातं, अंगणातली तुळस वृंदावन आणि बाहेरची विहीर.. आजूबाजूला विविध फुला पानांनी नटलेली बाग… सगळं बघून हरकून गेली होती…शहरातल्या हजारोंच्या गर्दीतही एकटी होती ती… त्या शांत वातावरणात तिला निवांत काही क्षण घालवण्याचा मोह आवरला नाही.. तिथेच ओट्यावर बसून स्वतःसोबत अमूल्य असा वेळ घालवत ती इलेक्ट्रॉनिक दुनियेबाहेरचं सुंदर जग न्याहाळत होती..तिथलं सौंदर्य डोळ्यांनी घटाघट पित होती..कातरवेळी मावळतीला निघालेला सूर्य त्याच्या गुलाबी रंगाच्या छटा दूर डोंगरात क्षितीजापल्याड उधळत होता जणू… ती तो प्रत्येक क्षण, प्रत्येक रंग मनाच्या कॅमेऱ्यात कैद करत होती…
अचानक मागून कसलातरी आवाज आला… हा तर तोच आहे जो दोन तीन दिवसापासून लग्नात दिसतोय…आपल्याला न्याहाळत असतो.. खोडकर हसतो कोण असेल हा?? तोही राजबिंडा, हसरा चेहरा, काळा शर्ट त्याच्यावर खुलून दिसत होता.. तोही त्याच्या मित्रांसोबत उनाडत असावा.. त्या घराजवळ पाणी मागायला थांबला होता..
एव्हाना त्याने तिला बघितलं नव्हतं पण ती त्याला बाजूच्या कावडीतून मनसोक्त बघत होती.. तिलाही पहिल्याच नजरेत आवडला होता तो.. त्याचं व्यक्तिमत्व, हावभाव, देहबोली सगळंच हरकून टाकणार होतं..क्षणात कुणीही प्रेमात पडावं असा होता तो…
तिनेही संधी सोडली नाही.. लपूनछपून त्याला मनभरून बघत होती.. गालातल्या गालात हसत होती.. भलतेच विचार करून लाजत होती.. मधेच तिच्या मनातील खोडकर विचाराने तिला खुदकन हसवले आणि त्याच्या कानावर तो आवाज पडला…
जसे काही जन्मोजन्मीचे नाते असावे ..त्याने बरोबर ओळखलं हा तिच्याच हसण्याचा आवाज आहे..तो कावराबावरा होऊन तिला शोधू लागला तशी ती सावध होऊन पुन्हा लपली… जारावेळात तिने डोकावून बघितले तर तो तिथे नव्हता..आता तिची नजर त्याला चोहीकडे भिरभिर शोधत होती.. तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली…
क्षणात कुणीतरी मागून येऊन अलगद तिच्या डोळ्यांवर हात ठेवले…तिचे अंग अंग शहारले..तिने ते हात चाचपडून कुणाचे हात आहेत हे ओळखण्याचा खोटा खोटा प्रयत्न करू लागली मुद्दामच…तिचा हात जसा त्याच्या हातांवरून फिरत होता तसा तोही बेधुंद होत होता..तिने अलगद त्याचे हात धरून बाजूला सारले आणि वळून, डोळे उघडून त्याला बघू लागली…
तो म्हणाला “ओळखलं नाहीस?? मी तुझा बालमित्र विहंग…तुलाच भेटायला इथवर आलोय..नाही समजलं?? अगं विसरलीस का?? आपण लग्नासाठी एकमेकांना भेटणार होतो पण मॅडम ने न बघताच, न भेटताच नकार दिला म्हणे आम्हाला पण आम्हीही ठरवून टाकलं होतं..लग्न करणार तर तुमच्याशीच.. किती वर्षांनी भेटतोय.. तू अजूनही तशीच आहेस..सुंदर अगदी निरागस…”
तिने हलकेच दाताखाली तिची जीभ चावली आणि दोन्ही हात कानाला लावून नजरेनेच त्याला सॉरी म्हणाली..”ए खरंच सॉरी हा!!मी तुला न भेटता नकार दिला पण मला वाटलेलं तू परदेशात राहिला आहेस तर आपले विचार जुळणार नाही आणि मला माझ्या कल्पनेतील राजकुमार हवा होता.. साधासुधा..आपल्या मातीची घनिष्ठ ओढ असलेला..मला काय माहीत तू तोच असणार.”
तो गालात हसत”म्हणजे आता तुझा होकार आहे का??”
ती लाजतच,”सगळं सांगायलाच हवं का?? काही गोष्टी समजून घ्यायचा असतात.”
तो मुद्दामच,” मला नाही समजून घ्यायच.. मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे..प्लीज एकदा बोल ना..”
ती लाडात येऊन,” आम्ही नाही जा..😊मी बाबांशी बोलेन ते कळवतील तुला माझा निर्णय..”
तो:”अगं ए, आता बाबा कुठे आले इथे मधे?? सांग ना.”
ती: “कानात सांगते ..चालेल??”
तो(लाजून): हो..
ती(कानाजवळ येऊन): माझा ना…माझा ना…(जोरात कानात ओरडून हसून दूर पळून जाते)
तोही तिच्या मागोमाग पळतो.. तिला मागून पकडून घेतो.. तीही अलगद त्याच्या बाहुपाशात शिरते आणि त्यांच्या प्रेमाची उधळण त्या कातरवेळेला अधिकच रोमांचक करून जाते.

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा