अपबीट….1 ते 9 संपूर्ण

Written by

नमस्कार वाचकवर्ग

काही वाचकांना तांत्रिक कारणामुळे बहुतेक काही भाग दिसत नाही म्हणून संपूर्ण कथा प्रकाशित करत आहे ……………

ही कथा आहे सर्वसामान्य आपल्याला रोज भेटणाऱ्या आपल्यातल्या वाटणाऱ्या राधा आणि कान्हाची …. अपघाताने सहवास सहवासाने प्रेम आणि प्रेमातून मिळालेली आयुष्याची सकारात्मकता म्हणजे Upbeat :: positive journey of two souls towards love ….

निशीच्या आईबाबांचा निरोप घेऊन ती हसतमुखाने त्यांच्या घराबाहेर पडली मनातलं वादळ लपवून चारचौघात वावरण आता तिच्या अंगवळणी पडलं होतं. घरी पोहोचली तेव्हा आईने विचारले तिला, आज उशीर झाला ऑफिसमध्ये ?? ती मानेनेच हो म्हणाली आणि बाथरूम मध्ये गेली आणि चेहऱ्यावर पाणी मारता मारता डोळे कधी पाझरते झाले हे तिलाही कळलं नाही.

ती …. राधा इतक्या कमी वयात घराचा डोलारा समर्थपणे सांभाळणारी कर्तव्यदक्ष मुलगी. राधाचे बाबा ती कॉलेजमध्ये असताना गेले बाबा होते तोवर एकत्र कुटुंब होत. दोन लहान भावांची आणि एका बहिणीचे सगळे केले तिच्या आई बाबांनी . भाऊ असूनही वडिलांप्रमाणे सगळ्यांचा सांभाळ केला कधीही त्यांच्या कर्तव्याचा मोबदला घेतला नाही. त्यांची शिक्षण व लग्न देखील करून दिली पण बाबा गेले आणि सगळे वर्षाच्या आत वेगळे झाले . कर्ज फेडण्यात राहता वाडा गेला आणि एक गुंतवणूक म्हणून घेतलेल्या 1BHK मध्ये राधा तिची आई सुहासिनी बाई आणि भाऊ सारंग ह्यांची रवानगी झाली. वाडा गेला आणि आपला संबंध संपला अशा थाटात तिचे काका आणि नातेवाईक निघून गेले . सराफ असल्यामुळे गोविंद घोडके (राधाचे बाबा ) ह्यांची कमाई शिल्लक होती थोडी , पण ती न घेता राधाने नोकरी सुरु केली .शिक्षण आणि नोकरी दोन्ही ती सांभाळत होती. पेढी तर आता दोन्ही काकांनी बळकावली होती पण राधाच्या आई कधीच त्यांना काहीच बोलल्या नाहीत कि हक्काची भाषा केली नाही त्यांच्या मते हा पिढीजात व्यवसाय होता व त्यावर सगळ्यांच्या अधिकार असतोच.

राधानेही कोणाशीही न भांडता मनात अढी न ठेवता आपल्या चुलत भावंडांशी मैत्रीचे नाते सांभाळले होते पदवी शिक्षण पूर्ण करून तिने MBA देखील केले आज चांगल्या पोस्ट वर काम करत असताना वयाची तिशी आली सारंगचे शिक्षण होईपर्यंत लग्न नको नको म्हणत हातातली सगळी स्थळ गेली होती

आणि आता सारंगच लग्न होत निशिगंधा बरोबर अर्थातच त्याच्या प्रेमाचा निशिगंध महाविद्यालयात बहरला आणि आता चांगली नोकरी लागल्यावर त्याने घरी हे उघड केलं ,निशी पण स्वभावाने खूप छान होती. सारंगची मैत्रीण म्हणून ती आईला पसंत होतीच.राधालाही ती फार आवडायची. खरतर राधा बाबा गेल्यानंतर जरा शांत झाली होती पूर्वीचा अल्लडपणा जाऊन आता अकाली प्रौढत्व आलं होतं नात्यांमधील फोलपण तिला लहाणपणातच उमगलं होतं.

आणि …आज निशिगंधच्या आई बाबांनी लग्नासाठी घातलेली अट “तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही निशी आणि सारंगला लग्न करू देणार नाही आणि तू लग्न करणार नसशील किंवा सारंग वेगळा राहणार नसेल तर आम्ही परवानगी देणार नाही “. हेही खरच होतं नणंद घरात असेल तर नाही म्हंटल तरी तुलना होणार भांडणे होणार. तिला त्यांचा राग नव्हताच राग होता तो सारंगआणि आई ह्यांनी अट माहीत असूनही आपल्याला सांगितलं नाही ह्याचा . आयुष्याची गेली 12 वर्ष मी सतत आई आणि सरंगसाठी जगात आले आज त्यांनाच माझी अडचण होतीये .

खिन्न मनाने ती जेवायला आली आईने वाढले होते तिला पण तिचे लक्षच नव्हते जेवणात तिच्या अवडीचा गोडाचा शिरा केला होता साजूक तुपातला . तिला आठवलं आई नेहमी म्हणायची शिर्यातल्या साखरेप्रमाणे बाईने संसारात विरघळून जावं दिसत नसतानाही जसा साखरेशिवाय शिर्याला गोडवा नाही तसंच बाइच ती असल्याशिवाय घरातला गोडवा नाती टिकत नाहीत. पण मग हा आईचा विचार आता माझ्या परिस्थितिला कसा लागु होतोय ह्यांना माझ्यामुळे गोडवा चालेल पण माझं अस्तित्व चालणार नाही मी दूर असायला हवंय .. आता माझी गरजच उरली नाही
राधा तशीच उठून निघून गेली जेवण अर्धवट टाकून आई तिला काही बोलणार इतक्यात सारंग ने तिला शांत राहायला सांगितले .
आपण उपाशी राहिलो तरी आईला काहीच वाटत नाही ह्यामुळे ती आणखीनच दुखावली?

कॉलेज मध्ये असताना किंवा ऑफिसमध्ये तिच्यात इंटरेस्ट दाखवलेल्या लोकांची कमी नव्हती पण तिने कधी आपल्या कामा व्यतिरिक्त कोणालाही उभं केलं नाही. राधा दिसायला सर्वसाधारण बेताची उंची आखीव रेखीव चेहरा गोरा रंग आणि काळभोर डोळे अगदी पाणीदार , आश्वासक नजर . मध्यम बांधा जरा जाडेपणाकडे झुकणारा पण मादक.

बिछान्यावर पडल्या पडल्या तिला मात्र आज त्याची आठवण आली तीन वर्षापूर्वी त्याचा लग्नात तो तिला दिसला तास आजही आठवत होता. त्यांचं नात कधीच नव्हतं लपलेलं नव्हतं पण त्याने तिच्यासाठी तिच्या आईकडे लग्नाची मागणी घातली होती . पण तिने नकार दिला आणि त्याच्या घरचे दुखावले यथावकाश त्याचेही लग्न झाले ……. पण तिला असं कधी कधी तिच्या ह्या नकराचा पाश्चाताप होत असावा पण कबूल कोण करेल ?

***************************************************************************************************************************************


सकाळी उठली तेव्हा ति बऱ्यापैकी सावरली होती सारंग आणि आई यांना कल्पना नसेल निशीच्या आईबाबांच्या अटी बद्दल असे तिचे एक मन म्हणत होते मग तिने स्वतःहून विषय काढायचा नाही असे ठरवले नेहमी प्रमाणे ऑफिसला गेली .

तीन महिन्यांपूर्वी तिने ह्या मोठ्या ब्रान्डच्या सुपर मार्केट चेन मध्ये रिटेल डीपार्टमेंट हेड म्हणून जॉइन केले होते. मागच्याच आठवड्यात फिजीकल स्टॊक टेक मध्ये खुप मोठी तफावत समोर आली होती खरेदी, विक्री गोडउन मधला माल ह्यांचा हिशोब कागदावर चोख असला तरी प्रत्यक्षात मात्र 10 ते 12 टक्के माल गायब होता हे कसं झालं असेल? काय काय लूप होल असतील ? हे सर्व शोधायचं काम राधाकडे होत. त्यात आणखी आज नवीन येणाऱ्या बॉस ची भर पडली होती. बॉस म्हणजे बॉस नाही खरंतर पण ऑडिटर कडून कोणी नवीन C A येणार होते . त्यांची टीम दोन दिवस आधीच पोहोचली होती आणि त्यांनी काम पण सुरू केले होते .हा एक multinational ब्रँड असल्यामुळे मोठी ऑडिटर संस्था त्यासाठी कार्यरत होती जीचे जगभरात बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस होते . ते नवीन ऑडिटर इंडियन आहेत की नाही हे बघण्याची उत्सुकता राधाला होती खरी पण ह्या घोटाळ्यात कंपनीच्या सिनिअर ची इन्व्हॉलमेंट असू शकते अशी पुसटशी शक्यता तिला अस्वस्थ करत होती.

त्या टीमला ती शक्य तेवडी माहिती पुरवत होती त्यांच्याशी बोलताना तिच्या लक्षात आलं की त्यांचे सर खूप particular आहेत. कामाच्या बाबतीत प्रचंड गंभीर असतात आणि दोन महिन्या पूर्वीच इंडिया मध्ये परत आलेत . अजून काही विचारयांच्या आतच ते आल्याच समजलं आणि सगळे कॉन्फरन्स रूम कडे गेले म्हणजे त्यांची टीम राधा नाही गेली तिला तिचं रुटीन काम पण करायचं होत,थोड्यावेळाने तिला बोलावण आलाच कॉन्फरन्स रूम मधून. ती जरा बिचकतच गेली आतमध्ये त्या अर्ध वर्तुळाकार रूम मध्ये सगळे बसले होते आणि कोणीतरी पोजेक्टर स्क्रीन कडे तोंड करून पाठमोरे उभे होते, ती आत जाताच त्यंच्या टीम मधल्या रीमाने सर राधा मॅम आल्या असं त्या पाठमोर्या व्यक्तीला सांगितलं त्यांनी तसाच बोलयला सुरवात केली ” मिस राधा तुम्ही नवीन आहात आणि ह्याच department मध्ये आहात म्हणून आम्ही तुम्हाला मदतीला घेत आहोत. system audit तर होईलच पण आपल्याला हेही शोधायला हव कि नेमक कुठल्या प्रोसेस मध्ये controling कमी पडतंय आणि करोडोच्या माल गायब होवून लगेच माहिती पडत नाही. हे दिसत तितक सोप नाही पोलिक कम्प्लेंट तर झाली आहेच पण पुन्हा असा होऊ नये म्हणून काय करता येईल हे मला सांगा आणि उद्या मला गोडावून दाखवा जिथे मुख्य खरेदीचा माल येतो; कारण माझ्या माहितीप्रमाणे सगळ्याच स्टोअर्स मध्ये कमी अधिक प्रमाणात हे होत असणार आणि त्याची सुरवात मुंबईच्या मेन गोडावून मधून असू शकते.shrinkage is a major problem in retail stores but ours is very big” राधाने एक शब्दही न बोलता सगळं एकूण घेतलं .

तिच्या सेल्फ एक्सप्लेनेटरी प्रेझेंनटेशनच सगळ्यानी कौतुक केलं मीटींग डिसमिस झाली आणि इतक्या वेळ पाठमोरी असलेली ती व्यक्ती वळली आणि राधासमोर येऊन उभी राहिली प्रोजेक्टर बंद करून रूमचे लाईट ऑन केले गेले आणि राधा त्या व्यक्ती कडे बघतच राहिली ती व्यक्ती हसली आणि निघून गेली. राधा तिथेच विचारात हरवली आणि भानावर येताच जागेवर येऊन बसली, कान्हा$$$ इथे कसा तो तर uk मध्ये होता PwC मध्ये. इथे कसा कि मला भास झाला , मग तो बोलला का नाही माझ्याशी ? अनेक प्रश्नाचे भेंडोळे तिला त्रास देत होते उद्या भेटणार आहे तेव्हा विचारते किंवा आईला विचारू , नको ती उगीच त्रागा करेल. बघू उद्या.

“सो मिस्टर विराज देसाई काही प्रगती ?? ” विराजच्या बॉसने त्याला फोन करून विचारले

” यस सर ; डेफिनेटली वि विल फाइंड आऊट इट सून . पण आपल्याकडूनही कोणीतरी सामील असावं असं वाटतंय सर”

” म्हणून तर तुला पाठवलं .listen विराज मला आपलं नाव खराब व्हायला नको आहे ,पोलिसांना काही सापडायच्या आत तू शोध. म्हणजे निदान ते निस्तरायच कसं ते बघू the amount of scam is in millions . it can destroy our reputation”

” I will try my best sir”

विराजने फोन ठेऊन एक सुस्कारा सोडला.हे प्रकरण दिसत तितकं सोपं नाही आणि खूप रंजक असणार ह्याची खात्रीच पटत चालली होती त्याला.

राधा मात्र घरी आल्यावर स्वस्थ बसली नाही आधी तिने तिच्या आत्याला कॉल केला आधी इकडची तिकडची बडबड केली आणि मग विचारलं ” आते कान्हा परत आलाय का ग? ” तिच्या ह्या प्रश्नावर आत्या दोन सेकंद शांत बसली मग पलीकडून आवाज आला ” हो आलोय मी परत दोन महिने झाले येऊन पण तुला आज विचारावास वाटलं ” त्याचा आवाजाने अंगावर आलेला शहारा तिला मोहरल्यासारखे झाले पण क्षणभरच ” अरे असं काही नाही ते आज ऑफिसमध्ये भेटलास पण काही बोलणं झालं नाही , तुझा नंबर नव्हता ना म्हणून अत्तुला कॉल केला , कसा आहे रे ??”

” ठीक आहे मी , भेटू उद्या gudnight ” . त्याने फोन ठेऊन दिला.

अजूनही राग राग करतो चिडका कुठला राधानेही रागातच फोन ठेवला.

“का रे इतक्या घाईत फोन ठेवलास बोलायचसना पोरीने समोरून फोन केला होता” विराजची आई म्हणाली

” आई मी तुला आधीपण सांगितलंय ह्यावेळी आपण घाई करणार नाही, पुढाकार घेणार नाही सो प्लीज नो इमोशनल ब्लॅकमेल . चल मला काम आहेत थोडी ”

विराज रात्री काम उरकून लॅपटॉप बंद करून बेडवर आडवा झाला आणि डोळे बंद केल्या केल्या राधाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आली तिच्या डोळ्यातले मुके प्रश्न बघून त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू पसरलं.

कान्हा राधाच्या सख्या आत्याचा मुलगा तिच्या पेक्षा तीन वर्षाने मोठा पण त्यानेच तिचे नाव हट्टाने राधा ठेवायला लावले त्यांची आजी नेहमी दोघांना माझे राधाकृष्ण म्हणायची राधा आणि कान्हाचं लग्न व्हावं असं वाटत होत त्यांना पण तास झालं नाही लहाणपनी सुट्टीत मामाच्या वाड्यावर येणारा कान्हा मोठा झाला आणि शिकून बाहेर देशात सेटल झाला.

*************************************************************************************************************************************** ३

“Miss Radha I will pic you from u r home” अनोळखी नंबरवरून आलेल्या ह्या मेसेज कडे पाहून राधाच्या कपाळावर पडलेली आठी आणखी गडद झाली. तिला अंदाज आलाच हा कान्हा असणार. तिने ठेवणीतले व्हाईट कुर्ता आणि लेगिंग घातले होते. कान्हाचाआवडता रंग होत तो, आईच्याही ते लक्षात आलं पण त्या काही बोलल्या नाही, काल घरी आल्यापासून ती फक्त कान्हा बद्दलच बोलत होती म्हणून आई सगळे जाणून सुद्धा अनभिज्ञ असल्याचे दाखवत होती.

विराज म्हणजेच कान्हाची गाडी येऊन सोसायटीच्या गेटपाशी थांबली ,राधा आधीपासूनच वाट बघत उभी होती.तिला कान्हाने आपल्याकडे पाहत राहावे किंवा किमान तू छान दिसतेस असेतरी म्हणावे हे अपेक्षा होती पण तसे काहीच झाले नाही . ती गाडीत बसली ,त्याने अगदी यांत्रिकपणे गाडी सुरु केली पूर्ण प्रवासात तो काहीही बोलला नाही आणि म्हणून राधाही काहीच म्हणाली नाही खरतर खूप प्रश्न होते तिच्या मनात, त्याच्या वैवाहिक आयुष्यात घडलेल्या घडामोडी तिला त्याचा कडून जाणून घायच्या होत्या आणि त्याची माफी मागायची होती तिने केलेल्या अक्षम्य चुकीबद्दल. पण खरंच चूक तिची होती का ??

ते कधी पोहोचले हे राधालाही कळलं नाही तिथे गेल्या गेल्या त्यांना कळले की watchman ला अटक झाली आहे चौकशी साठी घेऊन गेलेत त्याला पोलीस.विराज तिथले बरेचसे फोटो काढत होता आणि निरीक्षण करत होता मग तो फोनवर बोलला कोणाशी तरी बराच वेळ हे काम चालू होत राधा फक्त त्याच्या पाठी पाठी फिरत होती ना तो तिच्याशी बोलत होता ना तिला महत्त्व देत होता . तिला खूप वाईट वाटत होत पण करणार काय? जेवणाची वेळ उलटून गेली होती तिला फार भूक लागली होती. विराजचे काम झाले आणि तो निघाला पाठी पाठी तीही निघाली .

राधा : जेवूय का आपण ? मला भूक लागली आहे ?

विराज: हो. बघू रस्त्याने कुठे काय मिळेल ते

राधा: मी डबा आणलाय बाहेरच नाही खात मी सहसा.

विराज : ओके

विराजने एका वडापावच्या गाडीपाशी कार थांबवली आणि वडापाव खाल्ला त्याने राधाला विचारलं पण नाही , तिला वाईट वाटत होते आणि जेवणाची इच्छाहि राहिली नाही.स्वतःची अस्वस्थता लपवण्यासाठी ती डोळे मिटून सीटला मागे टेकून बसून राहिली तीच मन धावत होत भूतकाळात तिच्या कान्हा कडे जो आतापेक्षा फार निराळा होता.

तिची बारावीची परीक्षा संपली होती आणि कान्हाची पदवीची आणि ca ची दुसरी एक्साम संपल्यावर तो मामाच्या वाड्यावर राहायला आला होता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सगळा गोतावळा जमला होता बचेकंपनी पण पुष्कळ होती आणि सगळी राधा दीदी राधा दीदी करत राधाच्या अवती भवती असायची मग काय गप्पा गाणी निरनिराळे खेळ त्यात नेहमी दोन गट सगळ्या मुली आणि राधा ,सगळी मुले आणि कान्हा. ह्या सगळ्यात राधाला कान्हा आवडू लागला होता कान्हाची काही वेगळी !परिस्थिती नव्हती पण एकमेकांना सांगायचं कस इथेच सार आडल होतं. न सांगताही काही इशार्यांची देवाण घेवाण होताच होती . काही सूचक शब्द , मोडता न येणारे आग्रह , चोरून बघण, उगीच हसणं, स्वतःच्यात हरवण हे सारे प्रेमाचे खेळ सुरु झाले होते .

असाच एक दिवस संध्याकाळी राधा वाळवण काढून घेण्यासाठी गच्चीत गेली पाउस दाटला होता. वळवाचा पाउस तो ,दोन मुक्या प्रेमी जीवाना एकत्र आणण्यासाठी त्याची सारी धडपड. राधा पळतच खाली जायला निघाली आणि सोपानात कान्हा उभा होता त्याने तिला अडवले . तिच्या चेहऱ्यावर पडलेले पावसाचे थेंब, तिची गोंधळलेली नजर, थरथरणारे ओठ हे सार जाणवाव इतक्या जवळ तो उभा होता. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपळावर त्याचे ओठ टेकले निमिषमात्र ते तसेच होते आणि राधा लाजून पुन्हा गच्चीत पळाली तिच्या मागोमाग कान्हाही गेला.

कान्हा: राधा थांब

राधा थांबली पण पाठमोरी त्याचे श्वास तिच्या मानेला जाणवावे इतक्या तिच्या जवळ गेलेल्या त्याने तिला अलगद मिठीत घेतले

कान्हा : राधा तुझ्यापासून हे गोष्ट लपलेली नाही कि मला तू आवडतेस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे सगळे आपल्याला चिडवतात तेव्हा मला खूप भारी वाटत तुला नाही का आवडत ?

धडधडत्या हृदयाने आपल्या प्रेमाची कबुली द्यायला राधा वळली तितक्यात तिला कोणाचातरी भास झाला आणि ती कान्हाला रात्री गच्चीत भेट असे म्हणून निघून गेली .

जेवण आटोपल्यावर रात्री सगळे गच्चीत गेले आणि कान्हा विडा आणण्याच्या बहाण्याने खाली उतरला आणि थेट राधाच्या खोलीत गेला ती जवळ जवळ किंचाळणारच होती इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेऊन शांत बस असे सांगितले

कान्हा : राधा उद्या आम्ही निघणार आहोत मग भेट होणार नाही लवकर . तू माझ्या प्रश्नच उत्तर दिल नाहीस.

राधाच्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यात बघत त्याने विचारले राधाने उत्तरादाखल त्याच्या ओठांना आपले ओठ टेकले आणि एका क्षणात तिथून निघून गेली

कान्हा त्याच विस्मयकारक अवस्थेत विड्याची पान आणायला पळाला. किती रोमांचक रात्र होती ती दोघांसाठीही.

विराजने गाडी साईडला घेतली आणि डोळे झाकून बसलेल्या राधाकडे एकटक बघत होता त्याच्या मनात आल किती निष्पाप निरागस दिसते अजूनही , पण जे काही माझ्या बाबतीत राधाने केलय त्याला माफी नाही असूच शकत नाही, मी आता तो साधासरळ जीवापाड प्रेम करणारा कन्हा राहिलो नाही आणि तुला हे असं बघून मी विरघळणार नाही. त्याने गाडीचा होर्न जोराने वाजवला आणि राधा दचकली. ” उतर” इतकच म्हणून तो पुढे पाहू लागला.

अगदी निर्जीव पुतळ्याप्रमाणे राधा उतरली आणि घराकडे चालू लागली ती फोन पण विसरली गाडीत, फक्त ती उतरल्यावर एका सेकंदात तो निघून गेला इतकेच कळले. ती दुखावली त्यापेक्षा, आपण किती त्रास दिलाय त्याला त्याचा राग बरोबर आहे हे ती जाणून होती. भूतकाळ बदलत येणार नाही कधीच .तिच्या मुळे तीन जीव दुखावले होते आणि आता ह्या क्षणी इतर दोघांच्या नजरेत तीच खलनायिका ठरत होती.

***************************************************************************************************************************************४

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राधाचा मोबाइल विराजच्या स्टाफने आणून दिला . ती विचार करत होती किती पराकोटीचे प्रयत्न करतोय हा कान्हा आणि कशासाठी तर माझा द्वेष करतो हे दाखवण्यासाठी. पण प्रेम लपत नाहीना, नजरेतून दिसतच कि , खरतर माझ्या या परिस्थितीवर हसावं कि रडावं हे मला कळतच नाही आता, पण असं वाटतंय की यावेळी मी प्रयत्न करायला हवेत तुझ्यासाठी तू हवा आहे मला माझा म्हणून पुन्हा आणि आता काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. एक संधीच दिली आहे आयुष्यानं मला तुला परत मिळवण्यासाठी and i am upbeat this time. पण ह्यासाठी मला आत्याला भेटायला हव आज .जरा लवकर निघते ऑफिसमधून असा विचार करून ती कामाला लागली.

ती आली तेव्हा कान्हा घरी नव्हता , कान्हाच्या वडिलांना साधारण सहा महिन्यानपूर्वी पक्षाघात झाला होता त्यामुळे त्यांची उजवी बाजू संपूर्णपणे लुळी पडली होती खूप इच्छा असूनही राधा त्यांना भेटायला आली नव्हती . तिला पाहून त्यांना भरून आलं असं तिला वाटलं किंचितस,पण ती त्यानं पूर्ण ओळखून होती . तिने आत्याला अगदी विश्वासात घेऊन सगळं सांगू लागली

राधा : आत्या तुला मायरा आणि कान्हाच्या लग्नासाठी मामानी (ती विराजच्या बाबाना मामा म्हणत असे) काय काय केलय हे माहित नसेल तुझ्या लेखी हा प्रेमविवाह होता.

आत्या: म्हणजे ? राधे स्पष्ट सांग सगळे

राधा : तेच सांगण्यासाठी आलेय मी इथे आणि मला त्यांच्यासमोरच हे सांगायचे आहे कारण मी खोट बोलत नाही ह्याला फक्त तेच पुरावा आहे

आत्या : राधे तुला कितीवेळा विचारल लग्नासाठी कान्हाने .त्याला फार आवडायचीस तू पण तू दादानंतर घराची जवाबदारी घेतलीस आणि लग्नाला नकार देत राहिलीस त्यात ह्यांची काय चूक आणि केले असतील त्यांनी कान्हाच्या लग्नासाठी प्रयत्न तर ती त्यांची जवाबदारीच नाही का ?

राधा : किती चिडतेस आते ,एकूण घे ना माझपण . आजपर्यंत कोणालाच माहित नाही ह्या गोष्टी आधी मामांच्या भीतीने नाही सांगितल्या मग कान्हाच लग्न झालं आणि आता सांगण्यात काय अर्थ आहे असं वाटत राहिल तुला सांगणार आहे कारण तुझी परवानगी हवी आहे एका गोष्टीसाठी

आत्या : कसली परवानगी ?

राधा: आधी माझं एकूण घे मग बोलूयात पुढचं .

आत्या : थांब कॉफी करते तुला कान्हा पण येईल इतक्यात

राधा: मी करते कॉफी आणि कान्हाची मीटिंग आहे आमच्या ऑफिसमध्ये सो त्याला यायला तासभर तरी लागेल अजून म्हणूनच मी आले ना ग.

आत्या : तुमचं चालूच आहे का अजून तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना

दोघीही हसल्या अगदी मनापासून मग राधाने सुरवात केली सांगायला जे इतके दिवस तिच्या मनाच्या तळाशी दडवून ठेवले होते.

राधा : कान्हा पदवीपरीक्षा संपल्यावर आला तेव्हाच त्याचे आणि माझे प्रेम आम्हाला कळले किती छान दिवस होते ते भेटणं बोलणं फारस व्हायचं नाही कारण तो ca फायनल ची तयारी करत होता, पण माझ्या वाढदिवसाला आवर्जून भेटला होत गुलाबाचं फुल घेऊन धावपळ करत आला होता आम्ही ठरवलं होत बरच काही. भविष्याची वेडी स्वप्ने पहिली होती खूप सारी पण हे फार काळ अनुभवू शकले नाही मी पुढच्याच वर्षी बाबा गेले मी नुकतीच s y b com ला गेले होते . लहाणच होता सारंग सुद्धा बाबांनंतर वर्षभरात सगळे बदल तुला माहित आहेच पेढी गेली काकांकडे आणि त्यांच्यासाठीच काढलेल सगळं कर्ज त्यात वाडा गेला त्यावेळी कन्हाने मला फार भावनिक आधार दिला बाबांची पोकळी कोणालाच भरून काढता येणार नव्हती पण कान्हामुळे मी निदान ह्या धाक्क्यातून सावरायची हिम्मत तर दाखवली आमची हि जवळीक मामांच्या लक्षात आली होती. बाबांच्या सगळ्या बचतीचे आणि गुंतवणुकीचे सगळे व्यवहार फक्त मामाना माहित होते कारण ते ca होते वाड्याचा लिलाव थांबवा म्हणून काही करता येईल का असे विचारायला मी मामांकडे गेले होते. कर्जाची रक्कम पाहता वाड्याची विक्री थांबवता येणार नाहि पण लिलाव थांबवता येईल असे त्यांनी मला सांगितले निदान लिलाव झाला नाही तर घोडक्यांची अब्रू वाचेल असे ते म्हणाले आणि शिवाय बाबांची शिल्लक आणि एक फ्लॅट आईच्या नावे करण्याची तयारी त्यांनी दाखवली . बाबांनी तो फ्लॅट एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावे घेतला होता आणि फक्त मामा बाबा आणि ते दुसरे कोणीतरी ह्यांनाच त्याची माहिती होती तो फ्लॅट आम्हाला मिळवून देण्यासाठी मामानी एक अट घातली . ती अट होती मी कान्हापासून दूर व्हावे माझ्यामुळे त्याचे ca व्हायचे परदेशी जाण्याचे स्वप्न तो पूर्ण करू शकणार नाही इतक्या लवकर बंधनात अडकला तर त्याची प्रगती होणार नाही असं बराच त्यांनी मला समजून सांगितलं मला तेव्हा ते पटलं देखील आणि मी कन्हापासून अंतर राखायला सुरवात केली त्याने जेव्हा जेव्हा मला लग्नाबद्दल विचारले मी घराची जवाबदारी पुढे करून नाकारघंटा वाजवली मी त्याच्याशी ब्रेकअप केलं म्हणूनतो चिडून परदेशी निघून गेला. पण मसाला यो परत येईल ही खात्रि होतीच. पुन्हा परत आल्यावर त्याने मला पुन्हा गाठले ह्यावेळी तो फारच क्लिअर होता मध्ये ४ वर्ष गेली होती माझं शिक्षण पूर्ण झालं होत सारंगही मोठा झाला होता आणि मी त्याला हो म्हणाले किती छान होते ते दिवस आम्ही भेटत असू फिरत असू ऑफिस संपले कि तो मला घायला यायचा पण पुन्हा ह्या गोष्टींची कुणकुण मामांना लागली आणि ह्यावेळी त्यांनी खूप मोठी खेळी खेळली.

मायरा त्यांच्या मित्राची मुलगी नेमकी तेव्हाच त्यांनी तिला बडोद्यावरून बोलवून घेतलं आणि नाईलाजाने कान्हाला तिला कंपनी द्यायला भाग पडलं तिला इथे मित्र मैत्रिणी नाहीत म्हणून ती त्याच्याबरोबर फिरत असे एकदा तेर ते दोघे माझ्या घरीपण आले. ती खूप स्मार्ट होती सगळ्यांना आवडली. माझा मात्र जळफळाट झाला कान्हा मुद्दाम मला चिडवायला तिला आणखी महत्व देत होता ज्याला ती प्रेम समजून बसली . मामानी माझ्या घरी येऊन मायरा आणि कान्हाच्या लग्नाची जवाबदारी मला सोपवली आईसमोर मला काहीच बोलता येईना आणि त्यांच्या खेळीचा अंदाजही येत नव्हता . मायरा श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी होती तिची सर्व प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याला मिळेल हे मामा ओळखून होते. म्हणून त्यांना ती आवडत होती. हवी होती सून म्हणून. मी आईसमोर काहीच बोलू शकले नाही त्यांना . आईलाही त्यांच्या उपकाराची जाणीव होती कारण त्यांनी बाबानंतर आम्हाला आर्थिक गोष्टींची सांगड घालून दिली होती.

मी त्यांना बाहेर गाठून विचारले कि मी का हे काम करू कान्हा आणि मी लग्न करणार आहोत. त्याना फार राग आला त्यांनी मला स्पष्ट शब्दात बजावले माझ्याकडे घोडक्यांच्या दागिन्यांचे प्रत आणि किंमत ह्याचे सगळे असे कागदपत्र आहे त्यांचा मी वापर केला तेर तुम्ही सगळे रस्त्यावर याला सोन विकत घेताना आणि विकताना चुकवेळेला कर आणि काळे व्यवहार मी उजेडात आणीन हे मला कठीण काम नाही आणि तरीही तू कान्हाला सोडलं नाहीस तर तुझे काका समजावतीलच तुला कारण त्यांचे व्यवहार हे तुझ्या बाबांसारखे पारदर्शी नाहीत . मग आता तू मायरा आणि कान्हाला जवळ आणायचं काम कर त्यांच्यात काही बिनसलं तर घोडके संपले समज.

नातं होत आत्या तुझ्याशी मामांशी तरीही त्यांनी प्रॉपर्टीच्या लोभापायी मी कान्हा आणि मायरा आम्हाला खूप मोठ्या तिढ्यात अडकवलं जो अजून सुटत नाही आहे . माझे सगळे सक्खे नातेवाईक वैरी झाले तेव्हा कान्हा होता माझ्यामागे खंबीर. आता मला परत त्याला दुखवायचं होत मी खूप सैरभैर झाले होते काय करू तेच काळत नव्हते . मग मी एक निर्णय घेतला कान्हा आणि मायराला एकत्र आणण्याचा कारण खरंच मायरासारखी सुंदर आणि श्रीमंत मुलगी त्याला शोभणाराच होती आणि मी एकदा ब्रेकअप केलं आधी तेव्हा ते पुन्हा जुळेल ह्याची खात्री होती म्हणून त्रास कमी झाला. आता मात्र हात सोडायचा होता कान्हाचा तोही कायमचा.

*************************************************************************************************************************************** ५

त्या दिवसानंतर मी कान्हाला भेटणं टाळत असे नंतर नंतर त्याच्याही लक्षात आल कि काहीतरी चुकलंय कारण मी माझ्या ऐवजी मायाराला घेऊन जा असे सांगत असे . सतत एकत्र राहून ते चांगले मित्र झाले होते .असाच मला न सांगता कान्हा एकदिवस सकाळी सकाळी माझ्या घरी आला. आई त्याला चहा नाश्ता आणायला किचनमध्ये गेली आणि मी बाथरूम मधून बाहेर आली माझ्या नकळत त्याने मला मागून मिठीत घेतलं खूपच छान वाटलं मला तेव्हा. मी खरंच विसरून गेले कि हे थांबवायला हवं. मग आम्ही एकत्र खूप छान दिवस स्पेंड केला आणि तोच आठवणीतला सुंदर दिवस आम्ही समुद्रावर फिरलो मूवी बघायला गेलो पण नंतर कान्हाचा फोन सतत वाजत होता माझी जरा चीड चीड व्हायला लागली न राहवून मी विचारलं कोण आहे आणि मला उत्तर मिळालं मायरा.

कान्हा : अगं मी तिला कमीट केल होत आज पूर्णदिवस समुद्रावर जाण्याचं तिला सीफूड खूप आवडत ना आणि घरी बनत नाही सो , म्हणून फोन करतीये ती केव्हाची लवकर ये म्हणून खरतर तिला घेऊनच येणार होतो सकाळी बरोबर .पण तुझ्या मूडच काही अंदाज नव्हता ना .

राधा : (चिडलेल्या सुरात) मग जायला हवं होत तू तिच्या बरोबर मी काय इथेच तर असते .

कान्हा : अगं चिडतेस काय ? ती पाहुनी आहे ना आपली आणि मी देखील सुट्टीवर आलोय भारतात म्हणून फिरतोय तुला देखील म्हणतो पण तूला वेळ कुठं असतो

राधा : हो काय आहे ना,ना माझे बाबा मोठे इंडस्ट्रियालिस्ट आहेत ना ca त्यामुळे त्यांच्या नंतर मला माझ आणि घरच्यांचं पाहायला हवच ना असे रिकामटेकडेपणा करत नाही हिंडू शकत मी रोज

कान्हा: हे बघ काहीही काय बोलतेस आम्हाला दोघांनाही तुझा रिस्पेक्ट आहेच , आणि तिला नाही माहित आपल्या नात्याबद्दल नाहीतर कशाला अशी वागली असती ती

राधा : आणि तू सांगणारही नाहीस कारण सांगू ?? तुला आवडायला लागलाय तिचा सहवास , अस सतत तिच्या सोबत असण, तीच बोल्ड राहणं, टोकडे कपडे घालणं , सतत तुला चिटकून असणं .

कान्हा : काहीही बोलू नकोस (जवळ जवळ ओरडला कान्हा तिच्या अंगावर सगळे आजूबाजूचे लोक बघायला लागले )

राधा : तीन दिवसांपूर्वी दुपारी मी घरी आले होते तुझ्या आवडीच्या नारळाच्या वड्या बनवल्या होत्या आईने त्या द्यायला मी तुमच्या रूम मध्ये आले तेव्हा तुम्ही एकाच बेडवर होतात झोपलेले. काय वाटलं असेल मला शी..तसाच दरवाजा बंद करून परत फिरले वड्या द्यायची हिम्मत पण झाली नाही

कान्हा : काय? अरे यार तिच्या रूमचा ac नव्हता कूलिंग देत म्हणून ती झोपली तिथे आणि आम्ही काही जवळ जवळ नव्हतो झोपलो आणि दुपार होती म्हणून झोपली ती . पण मी का स्पष्टीकरण देतोय तुला ?? (राधाच्या दंडाला पकडून तिच्या डोळ्यात बघत ) परदेशात असूनदेखील तुझ्याखेरीज कुणाचा असा विचार मी नाही केला आणि तू संशय घेतीयेस राधा. थांबावं हा … हि माझी राधा नाही , ती फक्त प्रेम आपुलकी आपलेपणा जाणते हे असं तर्कवितर्क करून नसते संशय घेत नाही

राधा : त्याचाच फायदा घेत आलेत सगळे आजपर्यंत ,पण तू ,तू असा असशील असं वाटलं नव्हतं . मी सगळं विसरून आजचा दिवस दिला आपल्या नात्याला एक संधी म्हणून; त्यात पण आलीच मायरा . बघ ना प्रत्यक्षात इथे नसतानाहि किती प्रभाव आहे तिचा आपल्यात. हल्लीतर अस वाटतंय कि मीच मध्ये आलीये तुमच्या

कान्हा : stop it . आता मी इथे थांबू शकत नाही आपण नंतर बोलू

राधा : हो नको थांबूस तुझ्या जवळच कोणीतरी वाट बघतय जस्ट टू स्पेंड सम कोझी टाईम विथ यु

कान्हा : डिसगसटिंग् राधा हे अति होतंय

राधा : तू करतोयस मी तर फक्त बोलून दाखवलं

असं म्हणत मी तिथून चालत निघाली कान्हा गाडी स्टार्ट करून येई पर्यंत मी रिक्षात बसून घरी आले

त्यादिवशी मी भांडायचे नाटक नव्हतं केलं आता मला खरच राग आला होता , कान्हाने मी अशी का वागते हे शोधून काढावे मला कसले दडपण तर नाहीना हा विचार करावा फिल्मी हिरो सारखे त्याने सारकही ना सांगता समजून घ्यावे माझ्यासाठी जगाशी लढावे आणि आम्ही एकत्र येवून शेवट गोड व्हावा अशी दिवास्वप्न मी पाहत होते , एक आशा होती . पण ती त्यादिवशी मावळली मायरा पुढे त्याला माझा विचार करावा असे वाटतच नाही म्हणून मी आणखी दुखावले.

तीन दिवसांनी जेव्हा कान्हा माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आल्याच समजलं तेव्हा मी मुद्दाम माझा बालमित्र आणि ऑफिस कलीग शांतनूला माझ्याशी सलगीने वागायला सांगितलं मी कान्हाशिवाय खूप खुश आहे. हे दाखवायचं होत मला कान्हाला सगळं प्लान पाच मिनिटात ठरवून मी पुढे गेले कान्हाला कॅन्टीन मध्ये बोलावलं आणि कॉफीची ऑर्डर दिली.

राधा : बोल …. आज कसा काय इकडे
कान्हा : जाऊ का ??
राधा : नाही…काधिच नको जाउस ( मी भावनाविवश होऊन म्हणाली खरी पण नंतर जरा सावरली )
कान्हा : मी मायरला सांगीतल सगळं
राधा : सगळं
कान्हा : तुझं नाव नाही सांगितलं पण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे ह्याची स्पष्ट कल्पना दिली आहे मी तिला
राधा : नाव नाही सांगितले का ??
कान्हा : आधी आपल्या घरी सांगू बरोबर ना ?
राधा मोबाईलवर काहीतरी टाईप करत होती तिने तो बाजूला ठेवून दिला आणि कान्हाला विचारलं ” ती असाही समजू शकते की ती मुलगी तीच आहे”
कान्हा : पण ती असं का समजेन
राधा : कारण तीच प्रेम आहे तुझ्यावर.

कान्हा : काहीही तिने तुला सांगितलं का असं

राधा : हो

कान्हा : काय ? कधी

राधा: बघ बघ स्वतःचा चेहरा बघ किती आतुरता आहे तुला हे ऐकण्याची .तिच्या वागण्यात दिसताच रे .

कान्हा: मला असं का वाटतंय कि तू मुद्दाम हे असं भांडण उकरून काढतीयेस नसलेल्या विषयाला खतपाणी घालतीयेस काही प्रॉब्लेम आहे का

राधा : (जरा सावध पवित्र घेत ) नाही मी मला जे दिसत तेच बोलते आणि आता मला स्पष्ट दिसतंय तू पण गुंतत चालला आहेस तिच्यात

कान्हा : अरे कस समजाऊ तुला राधा असं नाहीये काही

राधा: कितीवेळ झाला तुला घरून निघून ?

कान्हा : साधारण २ तास

राधा : ओके २ तासात तिने एकही कॉल नाही केला तुला ?

कान्हा: का करेल ?

राधा: तुझ्या प्रेमात असेल तर पुढच्या दहा मिनिटात ती तूला कॉल करेल.

कान्हा : मला हे पटत नाही पण तू म्हणतेस म्हणून ऐकतो.

दोघांनीही कॉफी संपवली आणि मी

कान्हाला विचारलं “किती वाजले?”

कान्हा: अजून २ मिनटे आहेत

राधान मिश्किल हसून त्याला म्हंटल बघ मी फक्त वेळ विचारली आणि तू अजून दोन मिनटे शिल्लक आहेत वेळ संपायला हे सांगितलं कान्हा काही म्हणणारच इतक्यातच त्याचा फोन वाजला आणि तो कॉल मायराचा होता (राधने मगाशी मेसेज करून मामानं सांगितले होते कि काहीही करून दहा मिनटात मायराने कान्हाला कॉल करायला हवा)

माझा उद्देश फक्त कान्हाला संभ्रमात टाकायचा होता आणि तो जरासा का होईना विचारात पडला आणि मग शंतनू आला मला बोलवायला मी त्याची कान्हाशी ओळख करून दिली अर्थात कान्हा माझा फॅमिली फ्रेंड आहे असे सांगितले ते कान्हाला आवडले नाही तो निघून गेला

हे आणि असे बरेच प्रसंग मी कान्हाला नाकारत गेले त्याला खूप टाळलं मी शंतनू सोबत असल्याचं त्याला पटायला लागलं .

बरेच दिवस आम्ही एकमेकांशी बोललो नाही . मी स्वतः ला कामात आणि वाचनात गुंतवले आणि तो मायराच्या प्रेमात पडायला लागला ती होतीच तशी . तरीही लग्न ठरणार हे कळल्यावर तो घरी आलाच आणि मला स्पष्ट विचारलं त्याने की तुझा निर्णय काय आहे . मी अगदी निर्विकारपणे त्याला सांगितले की मला जमणार नाही मला आधी सारंगचे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि मला शंतनू आवडू लागलाय.

त्याने खूपवेळा विचारले त्याचा विश्वास बसत नव्हता तो खूप हळवा झाला होता तेव्हा पण मी खूप कठोरपणे वागले त्याला जवळ घेऊन शांत करावं असाही वाटलं एक क्षण पण मामांची धमकी आठवली कोणाला तरी वाईटपणा घ्यायला हवा होता तो मी घेतला आणि मी नाकरल्याच्या रागात पुढच्याच महिन्यात कान्हाने मायरशी लग्न केलं अर्थात त्याने मायरला कधीही जाणवू दिल नाही की हे तो रागावून करतोय. तरीही ते लगेच वेगळे का झाले ह्याचे उत्तर माझ्याकडे आजही नाही .

मग पुन्हा परदेशात गेलेला कान्हा आता आलाय परत तेही कामासाठी. एकदम बदलला ना ग ;मला ओळख पण देत नाही . चिडका झालाय अजून.

आत्या : राधा माझं डोकं सुन्न झालाय अगदी कोणाला दोष देऊ ह्यांना आधीच शिक्षा मिळालीये पण हे सारं कान्हाला कळलं तर ….

राधा : विश्वास ठेव आत्या ह्यातलं काहीही मी कान्हाला सांगणार नाही पण आता मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत म्हणून आलीये ना तुझ्याकडे

आत्या: म्हणजे

राधा : मला कन्हाशी लग्न करायचय

आत्या : मला वाटत नाही तो तयार होईल अकारण आता तो तुझ्यावर प्रेम करत नाही मला त्यादिवशी तो म्हणालादेखील की ह्यावेळी लग्न वैगरे विषय काढुनकोस.

राधा : तो तयार होईल त्याला मी खूप त्रास दिलाय तो बदला घायच्या विचाराने हो म्हणेल कठोर वागेल आणि मग स्वतः च शांत होईल

आत्या: पण हे जमवायचं कसं ??

इतक्यात बेल वाजली राधाने दरवाजा उघडला आणि समोर कान्हा उभा होता .

***************************************************************************************************************************************

मोकळे सोडलेले केस , काजळाची दाट रेघ आणि पाणीदार डोळे दारा समोर राधाला पाहून कान्हा जरा अवाक झाला आणि अगदी क्षणभरच का होईना तिच्या पाणीदार डोळ्यांच्या डोहात हरवला. आपल्या व्याकुळ नजरेने कबुली देऊ नये आपल्या प्रेमाची म्हणून तो लगेच त्याच्या रूममध्ये गेला.

तो फ्रेश होऊन रूममध्येच रोलिंग चेअर वर बसला , राधाने वाफाळता कॉफीचा मग त्याच्या समोर धरला त्याने चमकून तिच्याकडे पाहिले ती मधाळ हसत होती तो हसला एक क्षण पुन्हा गंभीर झाला .
कान्हा : आज इकडे का आलीस आणि हो ऑफिसमध्ये नव्हतीस
राधा : तुला कास समजलं ?लक्ष ठेऊन असतोस की काय ??
कान्हा : त्यापेक्षा बरे उद्योग आहेत मला.आणि ही कॉफी तू का आणलीस ?? ( अस म्हणून त्याने कॉफी जवळच्या वासमध्ये ओतली)
राधाचा डोळे भरून आले पण तीने चटकन ते पुसले तिने ठरवल्या प्रमाणे आता ती अजिबात हळवं वागणार नव्हती , आणि आता जे काम तिला करायचं होतं ते जरा कडक मन ठेऊन साध्य होणार होत .

थोड्या वेळाने राधा आणखी एक कॉफीचा मग घेऊन आली, आता तिने कपडे बदलले होते थ्री फोर्थ आणि ब्लॅक टी शर्ट . ती आरामात खिडकीत जाऊन बसली कान्हा सगळं पाहत होता . खरतर त्याला वाटलं ही कॉफी त्याच्यासाठी असेल. पण अस नव्हताच ,आधीची दिलेली कॉफी त्याने घेतली नाही सो आता काही बोलण्यात अर्थ नव्हता .त्याच लक्ष तिच्या गोबर्या गालांवर होत आणि मनात नसताना तो पटकन म्हणाला “राहणार आहेस का ?” तिने मानही न वळवता उत्तर दिलं ” हो, चार दिवस आई आणि सारंग बाहेर गेलेत म्हणून म्हंटल आत्याबरोबर वेळ घालवू”

शांतता खूपच बोलकी असते, म्हणजे आपण आपल्याशीच बोलतो मनातल्या मनात. तसे हे दोघेही मनातच बोलत होते .( राधा : नशीब इतकं तरी विचारलं, मलातर वाटलं होतं की हा काही मला भीक घालणार नाही पण ठीक आहे , सुरवात इतकीपण वाइट नाही उद्या ऑफीसच्या मीटिंग नंतर याला सरळ प्रपोज करणार नाही म्हणाला तर जबरदस्तीच करणार खडूस कुठला )

कान्हाच काही वेगळं चालू नव्हत तो ही मनात बोलत होताच.
( राधा का असं वागतीये कळत नाही.. मी वाईट वागलो तरी सहन केल तिने जणू आम्ही अनोळखी आहोत आम्हला काहीच भूतकाळ नाही. इतकं सहज मागे टाकलाय का तिने सगळं ? मला तो शंतनू भेटला नसता परवा तर मी अजूनही त्याच भ्रमात असतो की राधा एंगेज आहे आणि तिने मला फसवलं. पण तसं काहीच नव्हतं तो तर त्याच्या लग्नाची फोर्थ अनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होता ह्याचा अर्थ तो तेव्हा म्यारीड होता, मी आणि बाबांनी ती मला शांतनूसाठी टाळतीये हा काढलेला अर्थ चुकीचा होता खरंतर मी बाबांचं न एकता तेव्हा सगळं खरखोट केलं असत तर कदाचित आज चित्र वेगळं असत … पण बाबांचा काय दोष त्यांना तर मीच सल्ला मागितला होता पण मग मायरला आणि माझ्यावर संशय घेऊन राधाने संबंध तोडले असतील तर मग आम्ही एकत्र राहूच शकत नाही संशयी स्वभावाच्या बायकोबरोबर कसं जमेल? नको रे बाबा … पण कधी कधी असही वाटत की काहीतरी आहे तिच्या मनाच्या तळाशी एखादा असा कप्पा जो माझ्यासमोर उघडायचा नसेल . आताच तीच वागणं हे तेव्हच्या तिच्याच वागण्याशी किती विसंगत आहे. आतातर लाईन देतीये सरळ सरळ बाकी अजुनही दिसते तशीच मोहक! मादक! आईला नको नको म्हणून पण तिच्या गोऱ्या पायांकडे लक्ष जातंय आपलं…ओह शिट तिने नोटिस केलं मला पाहताना.. अरे ही इकडे का येतीये ?)

त्याची अवस्था तिच्या नसजरेतून सुटली नाही ती त्याचा अगदिसमोर जाऊन बसली हनुवटीला हाताचा आधार देऊन जराशी वाकून ..आईग गेली विकेट!!!नजर चोरत कान्हा तिथून उठला खरा पण तिला कळलंच शेवटी .

राधा : तू जे cctv फुटेज मागवलेलास ना त्याची कॉपी ह्या pendrive मध्ये आहे

कान्हा :ok पण मी ते पाहिलंय ऑलरेडी nothing suspicious

राधा : चुकतोयस तू ….सगळी मेख इथेच आहे

कान्हा : म्हणजे ??

राधा : ये दाखवते तुला .

अस म्हणून राधाने लॅपटॉप मांडीवर घेतला आणि त्याला pendrive attach केला एव्हाना कान्हाला पण इंटरेस्ट आला होता तो तिच्या जवळ येऊन बसला . तिने फूटेज प्ले केलं आणि एका जागी पॉज केलं ” हे बघ हा ट्रक चुकून एक ओपन ट्रक आलाय त्यातुन matetial अनलोड करून स्टॉक इन ची एन्ट्री आहे पण आता खरी गंमत आहे ” अस म्हणत तिने विडिओ पुन्हा चालू केला तो ट्रक पुन्हा जात होता गोडवन मधून बाहेर पण तो लोडेड होता , पुन्हा पॉज करून राधाने कान्हाकडे सूचक नजरेने पाहिल

कान्हा : असे अजून किती आहेत ?

राधा : असतील बरेच पण महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे एकाच कंपनीचे आहेत and according to MCA master data that company belongs to son in law of Mr Ahuja

कान्हा : म्हणजे HOD Purchase

राधा : आता मुद्दा असा की भरलेल्या ट्रक आणून त्या ना रिकाम्या करता परत पाठवल्या जातात हा ratio साधारण 5:1 असेल आणि ह्यात गोडउन सुपरवायझर इनवोल्व असणार , being employee I can not speak against Mr Ahuja but being Auditor for special task can mention this findings .

कान्हा खूपच खुश झाला होता राधाचा तर्क बरोबर होता आता पुढचा तपास त्याच्या बॉसशी बोलणं हे त्यालाच करायचं होतं तो लगेच कामला लागला

डायनिंग टेबलावर राधा दिसली नाही म्हणून त्याने आईला विचारलं , त्या म्हणाल्या ती जरा राऊंड मारायला गेली आहे आल्यावर जेवते म्हणली आई मी पण जरा आलोच म्हणत कान्हापन निघाला अर्थात फक्त राधाला थँक्स म्हणण्यासाठी बाकी काहीच नाही अजिबात नाही ,☺️

राधा बागेत झोपल्यावर बसून डोळे बंद करून गुणगुणत होती

” सांज ये गोकुळीं सावळी सावळी…”

तिला डिस्टर्ब न करता तो परत आला जेवला स्वयंपाक राधाने केला नव्हता म्हणून त्याला वाईट वाटलं पण बासुंदीच्या सुवसात त्याला राधाच्या हाताची चव कळलीच.

राधा दुसऱ्याच दिवशी तिच्या घरून निघून गेली . कान्हाला ते आवडले नाहीच पण कोणत्या अधिकाराने तिला थांबवावे हे त्याला उमजले नाही .

तिच्याशी पुन्हा नाते जोडावे आणि लग्न करावे का असा विचार यालाही त्याच्या डोक्यात पण त्याआधी त्याला हातातलं कामही संपवायचं होत आणि राधा त्याच्याशी आणि मायराशी अस वागल्याच खर करण शोधून काढायचं होत तेही तिच्या नकळत .

इकडे राधा जाण्याचं करण वेगळं होत खूप दिवसाच्या खटतोपनंतर तिला मायराचा कॉन्टॅक्ट मिळाला होता …..

***************************************************************************************************************************************

CCD मध्ये एक कोपऱ्यातील टेबलं ,ते दोघे बसले होते समोरासमोर ना डोळ्यात प्रेम ना मैत्रीचे भाव फक्त एक ओळख तीही अनोळखी . हो कान्हा आणि मायरा .

मायरा : घे ना कॉफी
कान्हा : हम्म
मायरा : आजही मलाच बोलावं लागेल बहुतेक तू काही बोलत
नाहीस
कान्हा : तू बोलावलं मला भेटायला सो तूच सांग काय नवीन
मायरा : खरतर तुला सांगायला आले होते की मी लग्न करतीये
कान्हा : खरच !! अभिनंदन
मायरा : इतकं काही तोंड पाडून बोलू नकोस आपण वेगळे का झालो हे तुला माहीत आहेच आणि अरे मला खरच खूप आनंद आहे की तो निर्णय तेव्हा जरी त्रासदायक होता तरी आता तो योग्यच होता हे सिध्द झालाय
कान्हा : तेही आहेच
मायरा : आणि तुझं काय ??
कान्हा: माझं काहीच नाही, आई बाबांसाठी परत आलोय; आता जाईन की नाही हे नाही ठरवलं अजून.
मायरा : आणि लग्न
कान्हा : माहीत नाही
मायरा : राधाच काय ??
कान्हा : सध्यातरी इतकच कळलय की ती खोट बोलली होती शंतनू बद्दल. तो आधीच म्यारीड होता. आता मी फक्त ह्या गोष्टीत खुश आहे की ती अजूनही माझीच आहे आणि प्रोफेशनल लाइफमध्ये पण खूप प्रगती केली आहे तिने मला वाटलं त्यापेक्षा ती नक्कीच खुप जास्त हुशार आहे . पण अशी कोणती गोष्ट होती त्यामुळे तिने इतकं मोठं पाऊल उचलले आणि मला स्वतःपासून कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला हेच मी शोधणार आहे

नंतर बराचवेळ बोलत होते दोघे म्हणजे मायरा सांगत होती तिची आणि अश्विनची भेट कशी झाली तो कसा तिच्या प्रेमात पडला त्यांची cute लव्ह स्टोरी आणि कान्हा तो किती ऐकत होता की नुसताच बसला होता ते त्याच त्याला ठाउक .

दोन दिवसांनी अचानक राधाचा आलेला कॉल मायरला कोड्यात टाकणारा होता आता हिला काय हवंय माझ्याकडून अस वाटलं तिला पण तो विचार तिने मागे टाकला आणि राधाला भेटीची वेळी कळवली

दरम्यान ऑडिट रिपोर्ट संबंधित कामा निम्मित कान्हा राधाच्या ऑफिसमध्ये आला होता काम झाल्यावर तो राधाच्या केबिन मध्ये आला ती पाठमोरी उभी राहून गळ्यातला स्कार्फ नीट करत होती तिने फॉर्मल फिकट गुलाबी शर्ट आणि ब्लॅक स्कर्ट घातला होता . कान्हाने हळूच मे आय कम इन अस विचारलं आणि ती चटकन मागे फिरली
राधा : तू
कान्हा : का मी येऊ शकत नाही , इथलं काम संपलं म्हणून म्हंटल भेटून जावं शेवटच
राधा : असं का म्हणतोयस
कान्हा : मग, का भेटुयात आपण परत ? एक कारण तरी तुझ्याकडे आहे का सांग मला
राधा : तसं नाही पण कारण निर्माण करता येतात की अर्थात तशी इच्छा असायला हवी
कान्हा: अडुन अडून बोलण बंद करशील

ह्यावर राधा काही बोलणार इतक्यात तिच्या ऑफिसमध्ये काम करणारी शीतल तिथे आली ती जरा उथळच होती उगीच कान्हा तिथे उभा आहे म्हणून लाडात येऊन नको ते अंगविक्षेप करून बोलायला लागली
शीतल : हे हाय मिस्टर … विराज
अस म्हणत तिने कान्हाला हँडशेक केलं आणि बराच वेळ त्याचा हात धरून ठेवला

राधाचा एकूण रागरंग बघून कान्हाने तिला चिडवायचे म्हणून शीतलच्या हात सोडलाच नाही .राधाने रागातच कॉम्प्युटर बंद केला टेबल आवारल आणि जायला निघाली

राधा : you carry on ,I Will Take your leave

आता मात्र कान्हा पण निघाला त्याने तिला पार्किग मध्ये गाठले
कान्हा : अग थांबना आपण बोलत होतो काहीतरी

राधा : कशाला आणि जा बोल जा त्या शीतल बरोबर ती तुझ्या टाईप ची आहे .. hot अँड सेक्सी तिच्याशीच बोल

कान्हाला हसूपण येत होतं अणि थोडा चिडला देखील होता तो पण पुढचा प्रोग्राम फ्लॉप होवू नये म्हणून तो जरा शांतपणे तीच्या जवळ जाऊन तिला म्हणाला ” चल बस गाडीत सोडतो ”
खरंतर तिला नाही म्हणायच होतं पण जमलंच नाही अगदी जवळ येऊन कान्हाने हे विचारलं होत त्यामुळेच ती अवघडली होती त्यामुळे पटकन गाडीत जाऊन बसली.

जरावेळ शांतता होती चोरून चोरून एकमेकांना बघत होते आणि कान्हा गाणं गुणगुनायला लागला ”

मधुबन में भले कान्हा
किसी गोपी से मिले
मन में तो राधा के ही
प्रेम के हैं फूल खिले
किस लिये राधा जले……..

खाऊ की गिळू आशा नजरेने राधाने त्याला पाहिलं आणि तो गायचा बंद झाला . आपली राधापण काही कमी नाही तीही उत्तरली ( मोबाइल मध्ये लिरीक कन्फर्म करून मगच चुकायला नाकोना☺️ इम्प्रेशन खराब होईल म्हणून जरा वेळाने राधा म्हणाली)

बाहों के हार जो डालेकोई कान्हा के गले
राधा कैसे न जले
राधा कैसे न जल
आग तनमन में लगे
राधा कैसे न जले
राधा कैसे न जले

मन में है राधे को
कान्हा जो बसाये
तो कान्हा काहे को
उसे न बताए…..

कान्हा उत्तर देणारच होता पण गाडी थांबली आणि दोनजण गाडीत बसले राधाला काही समजायच्या आत गाडी पुढच्या प्रवासाला निघाली

कोण असतील ती दोघ ?? आणि पुढील प्रवास काय कलाटणी देणार आहे ??
***************************************************************************************************************************************७.१

सारंग आणि निशीला गाडीत बघून राधाला काहीच कळत नव्हतं गाडी लोणावळ्याला निघाली होती तिने जरा दरडावण्याच्या सुरातच सारंगला विचारले ” काय पोरकटपणा आहे हा ? मला काही सांगशील ??”

कान्हा : अग त्याला का उगीच ओरडतेस हा प्लॅन माझा होता मीच त्याला म्हणलो औटिंग ला जाऊया वीकएंड ला

राधा : अच्छा ठीक आहे पण मला घरी सोड

कान्हा : का ??

राधा : का म्हणजे ? आईची परवानगी नाही घेतली तिला विचारायला हवंच ना ??आणि माझे कपडे बॅग काहीच नाही हा सारंग पण मला काही म्हणाला नाही ( राधाला नक्की काळत नव्हते तिला आनंद झालाय की दुःख झालय की राग आलाय)

निशी : chill तायडे ऑल ओके मॉम ला माहीत आहे आपण जातोय ते she packed your bag & kept it secret on our request

आता मात्र राधाला काही पर्याय नव्हता त्यामुळे तीने शांत बसायचं धोरण स्वीकारले मनातून तिलाही बरं वाटलं होतं किती फरक होता त्यादिवशी गोडउन ला गेलो तेव्हाचा कान्हा आणि आताचा कान्हा आणि कारण काय ह्या बदलमागच. इतकं प्रेम करूनसुद्धा हक्क गाजवत नाही तो कधी, पण त्याने तेव्हा मायरशी लग्न न करता परदेशी जाण्याचा निर्णय का नाही घेतला ? का नाही सिध्द केलं की त्याला फक्त आणि फक्त मीच हवी आहे .थांबु शकला असतंच की माझ्यासारखा नाही थाम्बला त्याला भुरळ पडली होती मायरच्या सौंदर्याची … असे अनेक नकारात्मक विचारच येत होते तिच्या मनात म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती . ‘पोहोचलो एकदाचे’ सारंगचे वाक्याने ती भानावर आली अंधार दाटला होता त्यामुळे फारस काही दिसत नव्हतं रिसॉर्ट मात्र खूप मोठं आणि लॅविश प्रकारच होतं . बुकिंग ऐनवेळेस केल्यामुळे एक रूम फोर्थ आणि एक third फ्लोर ला होता .
निशी आणि राधा 301 आणि सारंग कान्हा 401 असं ठरलं

रूममध्ये गेल्या गेल्या राधा म्हणाली मी अंघोळ करून फ्रेश होते म्हणून ती टॉवेल आणि सॅटिन ची nighty घेऊन बाथरूम मध्ये गेली त्यांनी रस्त्यातच येताना जेवण उरकली होती सो आता झोपायचं ह्या हिशोबाने तिची तयारी चालू होती ती बाथरूममधून साधारण दहा मिनीटांनी बाहेर आली पण रूमचा कायापालट झाला होता

मंद प्रकाश असणारे दिवे आणि गुलाबाच्या रूमच्या बाल्कनीच्या दिशेने जाणाऱ्या पायघड्या राधाला काही समजत नव्हतं ती त्या दिशेने गेली तिथे कान्हा उभा होता हातात गुलाबाचा गुच्छ घेऊन तिला पाहताच त्याचे भान हरपून गेले त्या सॅटिन च्या पिवळ्या नायटीमध्ये ती खूपच मादक आणि मोहक दिसत होती तिचा गुलाबी गोरा रंग खूप आकर्षक वाटत होता …. तिच्या चेहऱ्यावर आशचर्याची जागा आता आनंदाने घेतली होती … अगदी सिनेमात दाखवतात तसं कान्हाने राधाला विचारलं…. तुझं पुढील आयुष्य माझ्याबरोबर घालवायला तुला आवडेल?? will you be mine forever ?? I love You Radha ..

राधाने त्याला हाताला धरून उठवलं आणि त्याच्यासमोर उभी राहिली तिने तिचे ओठ हलकेच त्याच्या ओठावर टेकवले अगदी पहिल्यांदा टेकले होते तसेच आणि ….. कुणीतरी दार वाजवल वाटत …..राधाने स्वतःच्या डोक्यात एक टपली मारली …ती बाथटब मध्ये होती…. तीच तिलाच हसू आलं …किती स्वप्नरंजन … बहुतेक निशी होती दारावर …चला मॅडम आवारा आता….

किती काय काय स्वप्न बघतो माणूस पण हाती काय लागेल ते देवालाच ठाऊक . अरे देवा मी गाऊन बाहेरच विसरले बहुतेक आता काय करू असे बोलत ती बाथरोब वर बाहेर आली आणि समोर बघते तर कान्हा तिची खूप धांदल उडाली होती परत बाथरूम कडे निघालि इतक्यात कान्हाच तिच्याकडे लक्ष गेलं
” अग ते निशिगंधला वरचा रूम हवा होता सो आम्ही खाली आलो आणि ते दोघे समान वर ठेवायला गेलेत येतील इतक्यात ”
तो सांगत जरी असला तरी त्याच लक्ष नक्की कुठे होत ते राधाला कळल आणि तिच्याही नकळत ती लाजली खूप गोड.

कान्हा तिच्या जवळ आला आता मात्र त्याला मोह आवरला नाही त्याने तिच्या ओठांचा ठाव घेतला पण क्षणार्धात तो सावध झाला तो दूर जाणार इतक्यात राधा त्याला घट्ट बिलगली ” मला सोडून जाऊ नकोस , मला सहन होत नाही आता हे सगळं plz कान्हा”
ति रडायला लागली ” अग रडतेस काय ? मी आहे इथेच कुठेही जात नाही” कान्हा हे बोलतो न बोलतो तेच दार वाजलं निशी होती
कान्हाने दरवाजा उघडला आणि राधा परत बाथरूममध्ये गेली
” जरावेळ आमच्या रूममध्ये थांबतेस का ? मला राधाशी जरा बोलायचं आहे”
” ok पण हे जरा द्या त्यांना ” अस म्हणत राधाची कपडे असलेली छोटी बॅग तिने त्याच्या हातात दिली आणि जरा लाजताच ती तिथून निघून गेली .

” राधा बाहेर ये ना ” कान्हाने आवाज दिला ती आली आणि बॅग घेऊन चेंज करायला पुन्हा आत गेली . मागोमाग कान्हाही गेला ती दचकली त्याला बाहेर जा म्हणाली पण ऐकेल तो कान्हा कुठला त्याने राधाला मिठीत घेतले खूपच प्रेमळ आणि आश्वासक स्पर्श ना वासना ना जबरदस्ती ….

चातक पक्षाची तहान भागवणारा पहिला पाऊस म्हणजे ही मिठी .

राधाने हळूच तिचे ओठ पुन्हा कन्हाच्या ओठावर टेकले आणि हळूच त्याला दूर लोटले तोही सावरला आणि बाहेर गेला जारावेळाने राधा बाहेर आली कान्हा आणि ती वरती 401 ला गेले ती बेडवर आडवी झाली निशी काहीतरी बोलणार होती पण राधाचा भावविभोर अवस्था बघून तीही शांत झोपली.

त्या बाथरूम किस नंतर ते एकमेकांशी बोलले नाहीतच कान्हाने मनाशीच पक्के केले उद्या राधाला लग्नाविषयी विचारायचे जरी तिने आपल्याला खरे कारण सांगितले नाही त्यावेळी आपल्याला सोडून जाण्याचे तरी आता ती माझ्यापासून ते फारकाळ लपवू शकणार नाही कारण ते सांगितल्याशिवाय मी लग्न कारेन पण सहायुष्याला सुरवात करणार नाही….

राधमात्र आपण असे कसे वाहवत गेलो ?आपल्यावर आपला ताबा राहत नाही आताशा …..कान्हाला लग्नाच विचारायचं आहे लग्नाचा निर्णय पण पक्का आहेच .पण दोन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत एकतर अचानक अस काय झालंय की त्याचा माझ्यावरचा इतका जुना राग निवळला आणि मायरशी घटस्पोट घेण्याचं करण ….

***************************************************************************************************************************************८

इतकी हळवी ती …..
इतकी हळवी की
ना सांगता यावे ना समजता यावे ..
ना कळून यावे ना आकळून यावे..

सारंग : हे काय ??

कान्हा : सुचलं काहीतरी

निशी: हे काहीतरी खूपच डीप आहे वाटत , कोणा खास व्यक्तीसाठी

( सकाळी सकाळी निशाणे त्यांच्या रूममध्ये येत विचारलं)

कान्हा : राधा कुठे आहे ?

निशी : ओहो…. राधा कुठे आहे ? लगेच विचारलं आम्हाला साधं गुडमॉर्निंग पण नाही ह्यालाच म्हणतात ” गरज सरो वैद्य मरो”

कान्हा: काहीही बोलू नका तुम्ही दोघे.

सारंग : anyways आता ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे भटकायला जात आहोत आणि तुम्ही एकमेकांबरोबर छान वेळ घालवा. तुमचं लग्न आमच्या आधी व्हायला हवय कळलं ना ?

कान्हा: जशी आपली आज्ञा सालेजी

तिघेही हसतात, निशा रूमची चावी कन्हाकडे देते आणि म्हणते ” झोपल्यात अजून राधा मॅडम सो यु कॅन सुरप्राईस हर विथ युअर प्रेसेंन्स”

तास कान्हा जरा चाचरत असतो पण सारंग आणि निशी दोघेही त्याला कन्व्हिन्स करतात कि जरा रोमान्टिक व्हायची गरज आहे आत्ता आणि तो हि अगदी आज्ञाधारक बाळाप्रमाणं सगळं ऐकतो .

तो जरा हळूच रूम मध्ये जातो पण राधा बेडवर नसते ती आरश्यासमोर केस सुकवत असते आणि गुणगुणत असते

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे!
मोकळ्या केसांत माझ्या
तू जिवाला गुंतवावे!

ते दृश्य बघून कान्हाची अवस्था फारच वाईट होते ना राहवून तो राधाला मागून मिठीत घेतो

तिने घातलेले पिवळ्या रंगाची साडी जिचा पदर अजून पिन उप करायचा असतो तो खाली घरंगळतो .त्याचे उबदार हात तिच्या नाजूक कंबरेचा विळखा आणखी मजबूत करतात त्याच्या अचानक मिठीने गांगरलेली ती त्या उबदार स्पर्शाने सुखावते त्याचे श्वास तिच्या मानेवर नक्षीकाम केल्यासारखे हळुवार जाणवतात आणि ती त्या अनुभवाला साठवून घेत असते तिच्या मानेवरील केस मागे करत कान्हा तिच्या गालावर स्वतःचे गाल हलकेच ठेवतो आणि म्हणतो ” का थांबलिस पूर्ण म्हण”

पूर्ण अंगावर आलेला शहरा ,पोटातल्या गुदगुल्या आणि इतकी सलगी कसं गाणार बापुडी ? ती मानेनेच नाही म्हणते , पण कान्हा मिठी आणखी घट्ट करतो ” बघ हा सोडणार नाही मी ” ह्या कान्हाच्या वाक्यावर तिची धड धड आणखी वाढते ती कान्हाला जाणवते पण तो हट्टाला पेटलेला असतो.

तापल्या माझ्या तनूची
तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे
पुन्हा तू पेटवावे!

सुरच लागत नाही इतकी थरथरत असते ती कान्हाला हसू येत तो तिला चिडवतो ” तुझी कंबर इतकी नाजूक कशी ? ” ती अनवधानाने म्हणते ” म्हणजे ?” ” म्हणजे इतके गोबरे गोबरे गाल ? सगळंच कस गुबगुबीत म्हणजे जरा जाडच,मग कंबर कशी काय एकटी नाजूक ” कान्हाच्या ह्या वाक्यावर राधा भयानक चिडते त्याला ढकलून देते तिचा पदर खांद्यावर ठेवते. कान्हा फोन करून २ चहा अशी ऑर्डर देतो. निश्वास टाकून राधा साडी नीट करते आणि केस कसेबसे क्लिप मध्ये अडकवते.

कान्हा स्वतःला सावरत काय आणि कस बोलावं ह्याची उजळणी करत असतो त्याला विचाऱ्याला काय माहित कि राधाची प्रश्नपत्रिका आधीच तयार असते

ते बाल्कनीच्या खुर्च्यांवर बसून चहा घेतात इतका वेळ शांत असलेली राधा आता बोलते

राधा : मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं

कान्हा : मलाही त्यासाठीच आलोय इथे आपण

राधा : हो मला निषीने कल्पना दिली

कान्हा : स्पष्टच सांगतो राधा ,मी माझ्या आणि तुझ्या आईला आपण लग्न करतोय पुढच्या महिन्यात असं कळवलं आज सकाळी

राधा : काय ? जवळ जवळ किंचाळतेच

कान्हा : हे बघ काल संध्याकाळी जे काही झालं ते होणारच आहे आपण समोर आल्यावर गेली इतकी वर्ष दुर्दैवाने यापासुन दूर राहिलो आता एक संधी आहे तर का नाकारायचं तिला

राधा : वा साधारण महिन्याभरापूर्वी मला भेटलास तेव्हा तर तुझ्या डोळ्यात अंगार होते आणि आता अचानक प्रेम; कारण कळेल का ?

कान्हा : तू असं बोलणार आहेस का ? भांडायला आल्यासारखी .

राधा : (जरा ओशाळून )नाही रे असं नाही मी फक्त एक प्रश विचारला

कान्हा: काही गैरसमज दूर झाले आणि माझा राग अशासाठी होता कि आपल्या गैरसमजात आपल्या प्रेमामुळे मायाराचं नुकसान झालं

राधा : अजूनही तुला मायरची काळजी ?

कान्हा : हो आहे , तू टोमणे मारू नकोस राधा. मी सांगतो तुला सगळं खर एकूण घे ” मायरा भेटली होती मला तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशन द्यायला आली होती खूप खुश होती आणि म्हणून मलाही बरं वाटलं तिची लोव्हस्टोरी पण खूप गोड होती , मला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं राधा … आपल्यामुळे कोणाचातरी नुकसान झाल्याची भावना फार बोचरी असते सतत अपराधी वाटत राहत.

राधा : खरंच!! तिला शुभेच्छा दे माझ्याकडून .

कान्हा: मग आता काय विचार आहेत बाईसाहेब ? आपणही खूप वेळ वाया घालवलंय सो आता लग्न करायचंय

राधा : मायराशी लग्न का केलस?

कान्हा : काय ?? तुझ्यामुळेच तुझ्यावर चिडून तूच भाग पाडलस मला

राधा : माझ्यामुळे ?? आता जस शोधलस कि शंतनू माझा कोणीही नव्हता तसं तेव्हा का नाही केलंस ? का नाही विश्वास ठेवलास तुझ्या प्रेमावर आणि उभा राहिलास माझ्या पाठीशी ? का नाही शोधू शकलास कोणाचा दबाव होता? कोणाचा विरोध होता ?कोणाचं षडयंत्र होत ? करण तेव्हा तुझ्याकडे पर्याय होता ना मायरचा ती स्मार्ट होती सुंदर होती ब्युटी विथ ब्रेन म्हणून तू सहज हार मानलिस तेव्हा आणि आज मला म्हणतोस की माझ्यामुळे तुमचं दोघांचं आयुष्य पणाला लागलं

कान्हा : एक मिनिट
राधाला मधेच अडवत कान्हा म्हणाला ” षड्यंत्र! काय म्हणायचं तुला ?? राधा तुला आठवत नसेल तर स्पष्ट सांगतो तू माझ्याशी खूप वाईट वागत होतीस माझ्यावर संशय घेत होतीस तरीही मी सतत तुझ्या मागे मागे करत होतो खूप प्रयत्न केला तुला मिळवण्यासाठी पण तू शेवटपर्यंत नाहीच एकलस ,आणि आज मला दोष देतीयेस.

राधाला कन्हाच्या ओरडून बोलण्यामुळे खूप वाईट वाटले. तो ही जरा शांत झाला आणि तिच्या जवळ येऊन बसला

कान्हा : का त्रास कातून घेतीयेस राधा मी खरच तेव्हसूद्धा विश्वास नव्हता ठेवला की तू इतक्या सहज माघार घेशील आपल्या नात्यातून मी बाबांनाही सतत सांगत होतो की मला वेळ हवाय आपल्या दोघांना वेळ हवाय पण त्यांनी शपथ घातली आणि मला लग्न करावं लागलं म्हणून मी अपराधी आहे तुझा आणि मायरच्या ना मी तुला मिळवू शकलो ना मायरला न्याय देऊ शकलो

कन्हाच्या डोळ्यात पाणी आलं राधाने त्याला जवळ घेतलं त्याला सॉरी म्हणत तयाचया गालावर मायेने हात फिरवला ” राधा मी खूप मिस केलं ग तुला तुझं हे असं आश्वासक वागणं मला धीर देत समजून घेणं , खुप वाईट होती हे मधली 4 वर्ष लग्नानंतर आम्ही गेलो u k ला पण मायरा काही दिवसांनी परत इंडीया मध्ये आली इथल्या कायद्याप्रमाणे आमचा घटस्फोट झाला अर्थात तसेही आम्ही एक झालोच नाही कधी पण ती धाडसी आणि स्वतःच्या निर्णायक वृत्तीमुले ह्या फोल नात्यातून बाहेर पडली लगेच

चार वर्षे राधा …आईचा फोन आला की वाटायचं विचारावं राधाने लग्न केलं का ?? एक मन सांगायचं की ती करणार नाहीच माझ्यासाठी थांबली असेल पण बाबानी सांगितले की तू लग्न करणारं आहेस आणि खूप सुखात आहे म्हणून तुझ्या सुखाच्या आड न येण्याचं मी ठरवलं आणि परत यायचं रद्द केल आता बाबांच्या तब्येतीमुले मी परत आलो राधा.

कान्हा फारच भावनिक झाला होता राधाने त्याला मिठीत घेतले
आणि म्हणाली ” तू प्लिज आता मला सोडून जाऊ नकोस, आपण उद्याच लग्न करायचं का ?? ”

त्या अवस्थेत ही कान्हाला हसू आलं तिची चेष्टा करण्याच्या हेतूने तो म्हणाला ” चालेल पण हनी मून आज करूया ” राधा लाजली आणि त्याला ढकलून आत गेली .

कान्हाने विचार केला कोण असेल ज्याला माझ्या आणि राधामध्ये यायचं असेल ?? षडयंत्र काय म्हणत होती ही ,विचारायला हवं
तिकडे राधही त्याच विचारात होती आपण चुकून बोलून गेलो षडयंत्र कन्हाच्या लक्षात आलं तर तो विचारात बसेल

कान्हा आत बघतो राधा बेड नीट करत असते खाली ववाकुन तिची बॅग उचलते आणि तिचे कपडे नीट ठेवते ह्या सगळ्यामध्ये कान्हाची नजर आपोआपच तिच्या कंबरेवर जाते अनो त्याची विकेट जाते पण जात्याच आगाऊ आणि खोडकर असल्यामुळे तो ह्या संधीचा फायदा घेऊन तिला छेडतो ” राधा तू सफाई नसू नकोस कळवा तो असे पेस्टल शेड्स नको वापरत जाऊस” तीही अगदी गंभीर पणे विचारते ” का रे ” खरतर तिला अपेक्षित असतं की तू फार छान दिसतेस मग माझा कंट्रोल जातो अस रोमँटिक उत्तर पण कान्हा म्हणतो ” तुला सूट नाही करत अग म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तू छान दिसतेस अस मी खोटं सांगणार नाही एकतर उंची कमी नाक नकट जाडी कळा रंग सगळं बेताचच आहे मग कशाला अशी न शोभणारे कपडे ” इतका गंभीरपणाचा आव आणून तो बोलला की राधा रडायलाच लागली तिला भानही राहील नाही की आपण गोऱ्या आहोत नाक नकट नाही किंवा जाडी नाही

आता मात्र कान्हाचा डाव फसला की काय असं वाटत होतं त्याला राधाला खरच वाईट वाटलं होतं कान्हा लगेच तिच्या जवळ गेला
” अग राडतेस काय तुला साधी मस्करी कळत नाही का , गंमत कारत होतो मे आणि मला सांग तू नाहीसच ना नकटी किंवा काळी मग का वाईट वाटून घेतस” हे एकुन राधाला बर वाटलं ती कान्हाच्या मिठीत विसावली कान्हाने तिच्या कमरेच्या नाजूक अढी वर हात फिरवत म्हणाला ” पण जरा जाडी आहेस खरी” आता राधाने बेडवरीळ उशी उचलीत त्याला मारायला सुरुवात केली इयकयात दार वाजले

राधाने हसतच दार उघडले आणि समोर बघते तर दारात

मायरा…………

***************************************************************************************************************************************९

” मायरा ”

मायराला बघून राधाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत तिने कान्हाकडे पाहिलं त्याने हातानेच तीला थांब असा इशारा केला .

मायरा: थँक्स तुम्ही दोघेही आलात मला खरंच खूप बर वाटलं

राधा : म्हणजे ??

मायरा: आज संध्याकाळी रीस्पेशन आहे इथे माझं ..कालच कोर्ट मॅरेज केलं मी आणि अश्विनने हे त्याच्या बाबांचच रिसॉर्ट आहे सो मी खूप आग्रह केला होत विराजला तुम्ही दोघे याच.

राधाने एक जळजळीत कटाक्ष कान्हाकडे टाकला तिला राग आला होता, कान्हा पुन्हा खोट बोलला होता तिच्याशी.

मायरा: विराज can you please excuse us मला जरा बोलायचं होत राधाबरोबर

कन्हाने अगदी आज्ञाधारकपणे काढता पाय घेतला

राधाला कळत नव्हते काय बोलावे नक्की. मग मायरा ने सुरवात केली “तुला काही बोलायचे होते का माझ्या बरोबर ?? तू वेळ मागितला होतास माझा ??”

” हो.. म्हणजे असच काहि नाही “.. राधा जर चाचरत बोलली

मायरा: काही न बोलण्यासाठी कोणी वेळ मागून घेत का?, जाऊदे आता माझं ऐका तुम्ही दोघे लग्न करून घ्या जे प्रेम आहेच, ते लपवून भांडून काही उपयोग नाही, मला माहित नाही तुमच्यात काय होत आणि मला विराजने कधी सांगितलंही नाही ,खरतर त्याने स्पष्ट कल्पना द्यायला हवी होती लग्नाआधीच. पण झालं ते झालं, मी खोटं सांगणार नाही कि मला अंदाज नव्हता तुमच्या दोघांचा तसं मी बोलूनही दाखवलं विराजच्या बाबांना पण त्यांनी सांगितले, की मीच कशी विराजसाठी बेस्ट आहे आणि त्यालाही हे समजलंय म्हणून तो लग्नाला हो म्हणाला, मला तो आवडत होताच सतत त्याच्या सोबत असावं असं वाटायचं मग मी आलेल्या संधीचा फायदा घेतला आणि झाले मायरा विराज देसाई ”

राधाला आताही हे एकूण वाईट वाटले ती म्हणाली ” पण मग तू का ऐकट सोडलस त्याला ?? का घेतलास इतका मोठा निर्णय ?? तू त्याला वेळ द्यायला हवा होता …”

तिला मधेच थांबवत मायरा म्हणाली ” प्रेम सहवासाने निर्माण होत असं म्हणतात ना ग … मग आमच्यात का नाही झालं दोन महिने मी वाट पाहिली?? किती फिरलो आम्ही खूप वेळ दिला एकमेकांना कारण विराज म्हणाला होता मला कि त्याला थोडा वेळ लागेल . त्याचा ते प्रामाणिक वागणं भावलं मला. मला अजूनही स्पष्ट आठवतोय तो दिवस त्या दिवशी माझा वाढदिवस होता म्हणून त्याने खूप काही प्लँन केलं आम्ही डिनरला गेलो. थोडीशी दारू घेतली .आमच्या जेव्हा परतं अपार्टमेंट मध्ये आलो तेव्हा विराजने मला गिफ्ट दिल एक मऊसूत पारदर्शक नायटी ,मी खूप खुश झाले इतक्या दिवसांनी मला जे हवं ते घडणार होत मी लाजूनच त्याला नकार दिला , त्याने विचारलं आवडली नाही का ? मी काहीच बोलले नाही . त्यानं मला मागून मिठीत घेतलं तो स्पर्श ती आस वेगळी होती. मला शिरशिरी आली मी स्वतःला सोडवुन घेतलं आणि बाथरूममध्ये पळाले मग पुढे बरच काही झालं म्हणजे जे व्हायला हवं तेच पण… एका क्षणाला मी पूर्ण कोसळे राधा ….. एक पत्नी म्हणून हरले …”

राधा : म्हणजे ??

मायरा: खूप आनंदात दोन शरीर एकमेकांत पूर्ण विलीन होत असताना त्या पर्मोच्च सहवासाच्या धुंद क्षणी तो म्हणाला “आय लव्ह यू मला तू हवी आहेस राधा , राधा ,राधा $$$$$$$$$$$$$$

राधा स्तब्ध होऊन मायाराकडे बघत होती आणि मायरा शांत होती निश्चल , नकळत सॉरी म्हणाली राधा तिला.

मायारा: खरं सांगू राधा त्याक्षणी वीज कोसळावी असच वाटलं मला मी रात्रभर रडत होते आणि तो सुन्न बसून होता माझ्या बाजूला , कदाचित त्यालाही त्या अनाहूत क्षणी प्रचती आली की तो राधचाच आहे … काही दिवस असेच गेले तो खूप खरेपणाने प्रयत्न करत होता पण ना त्याला जमत होतं ना मला आवडत होतं मन मारून असं राहण्यापेक्षा मी ठरवलं ब्रेक घेऊ थोडे दिवस आणि मुंबईला परत आले एकटीच आणि उभी राहिले विराजच्या बाबांसमोर जाऊन त्यांना जाब विचारायला अर्थात ते तर खूपच भडकले मला वाट्टेल ते बोलायला लागले मीच कशी चुकीची आहे आणि ऍडजस्ट करत नाही असं म्हणाले त्यांचे शब्द सांगायचे तर ” तो मूर्ख त्या बावळट राधाच्या मागे त्यांची भिकार्यासारखी अवस्था आणि तू इतकी श्रीमंत असूनही त्याला काळात नसेल तर काय म्हणावं त्याला पण एक लक्षात ठेव जरी तुम्ही वेगळे झालात तरी तुला काही मिळणार नाही आणि त्या राधाशी त्याच लग्न मी कधीच होऊ देणार नाही” मी कारण विचारलं त्यांनी सांगितलं नाही. मला त्यांचं काहीच पटत नव्हतं मी सरळ बाबांकडे निघून गेले पण मला त्यांच्या तुमच्यावरच्या रागच कारण कळलं नव्हतं. त्या सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली कि मी निघाल्यापासून इकडे आले .दोन दिवसाच्या जास्त झाले पण माझ्या सो कॉल्ड नवऱ्याचा ना फोन ना मेसेज मी कारण विचारल्यावर मला म्हणाला तुझा निर्णय बरोबर होता we are not made for each other , त्याचा निर्णय त्यानेच घेतला राधा आणि सर्वांना वाटलं मायरा इस द कलप्रिट …. नो वे मायरा वॉज व्हिक्टिम …………………………

झालं ते झालं मी आता खूप पुढे आले आणि… आणि खूप सुखात आहे फक्त मला एक सांग का ?? का नाही करत आहात लग्न? कम ऑन राधा स्पीक अप… कळू तरी दे मला काय अडचण होती तुझी तेव्हा हे त्यागाच नाटक होत का तुझं ?? की आणखी काही आणि का माहित नाही पण विराजचे बाबा जरी कारण असतील तर आता तेही काही करू शकत नाही

राधा : काय बोलू ग … इतके दिवस मला माझच दुःख मोठं वाटत होत….आता मला खूप अपराधी वाटतंय … दुःख कुरवाळत बसण्याची आवड असेल माझी म्हणून त्यांना आवडतेच मी माझ्याचकडे येतात ती आपसूकच . बाबा गेले , घर गेलं .. कान्हाही गेला होता….. असो . कुणाला माहित नाही तुला म्हणून सांगते बाबांची सोन्याची पेढी होती त्यामुळे लोकांचा असा समज व्हायचा कि हे श्रीमंत असतील ..व्याजाने पैसे मागणारेही यायचेच त्यात आमचे मामा म्हणजे विराजचे बाबा पण होते आम्ही लहान असताना त्याची मावळात असलेली जमीन गहाण होती कोना सावकाराकडे ती सोडवण्यासाठी त्यांनी बाबांकडे पैसे मागितले . बाबाना नाही म्हणत आले नाही . करण काही केलं तरी बहिणीचे यजमान म्हणून बाबानी देतो सांगितले पण सोय करता अली नाही पैसे कमी पडले जमिनीचा लिलाव झाला त्यासाठी मामानी बाबाना दोष दिला त्यानंतर काही वर्ष आत्याही बोलत नव्हती बाबांबरोबर खरतर आणि असे काही प्रसंग असतील हे सहज आई बोलता बोलता बोलली मला ….

राधाने मायराला सगळे सांगितले कसे कसे विराजच्या बाबानी तिला आधी विश्वासात घेऊन नंतर धमकावून त्याच्यापासून वेगळे केले … दोघीही बराच वेळ बोलत होत्या मग मायरा निघाली …राधाने तिला शुभेच्छा दिल्या

ती गेल्यावर राधा बराचवेळ ठरवू शकत नव्हती ती दुखी आहे की आनंदी? कान्हाच्या मनात फक्त ती आहे म्हणून आनंद कि कान्हा मायराला न्याय देऊ शकला नाही म्हणून अपराधी पण

तीच विचारचक्र मधेच थांबलं कारण सारंग आणि निशी परत आले त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि त्यांची मजामस्ती चालू झाली पण राधाचं सगळं लक्ष कान्हाकडेच होत तो साधारण तासाभराने आला , प्रचंड चिडलेला वाटला पण संयम ठेऊन वागत होता राधाकडे जेव्ह पाहिलं तेव्ह अनोळखी वाटली ती नजर निमिषभर.. कायासच लागत नव्हता तिला नक्की झालाय तरी काय याला .. सकाळी तर छान मूड होता मग आत्ता तो निमूटपणे जेवला आणि अराम करायला म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेला .. पाठोपाठ राधाही गेली . सारंग आणि निषु बघताच राहिले निषु म्हाणालीपण सारंगला बघ दो हंसो का जोडा जा राहा हैं .. दोघेही हसले .

इकडे कान्हा रूममध्ये आला आणि त्याने शर्ट काढून बेडवर टाकला सिगारेट शिलगावली आणि टेरेस मध्ये गेला मागून राधा अली ह. हे त्याला माहित नव्हतं दरवाजा उघडच होता राधा त्याच्या मागे टेरसमध्ये गेली त्याच्या पाठीवर हात ठेला तास तो वळला त्याच्या डोळ्यआत पाणी होत आणि रागही

तो फक्त इतकाच बोलू शकला ” राधा .. बाबा ???” आणि राधाला मिठी मारून त्याने अश्रुना वाट मोकळी करून दिली राधाला कळलं कि मायराने माती खाल्ली असणार कारण आपण तिला कन्हाच्या बाबांचे हे उद्योग कान्हाला सांगू नकोस हे सांगायला विसरलो… तिने कान्हाला सावरलं आणि त्याच्याकडून बाबांशी पूर्वीइतकाच प्रेमळ वागण्याचं वचन घेतलं …

सगळं कस सुरळीत झाल राधा कान्हाचं लग्न ,हनीमून . सासुबाईंचं म्हणजे आत्याचं विशेष प्रेम रथावर कारण विराजला काही ठाऊक नाही राधाने सांगितलं नाही त्यांचा शब्द राखला आणि तो बाबांशी प्रेमानेच वागतो म्हणून .

दोन महिने झाले आणि आज सारंग निशीच लग्नदेखील पार पडले खरतर राधाची आज आइकढे थांबायची इच्छा होती ती सारंगच्या लग्नासाठी म्हणून गेले आठ दिवस आईकडे होती पण कान्हाची तब्येत जरा डाऊन होती म्हणून ती लग्नानंतरचे सगळे विधी निशीचा गृहप्रवेश यावरून रात्री घरी आली कान्हा होता बरोबर पण पोटदुखीचे नाटकच करत होता ती आली आणि बेडरूम मध्ये गेली कापड बदलून त्याला काय हवं नको ते बघावं म्हणून वळली इतक्यात मागे कान्हा उभा होता ” हे काय ?? सरकना आणि बरं नाही वाटत आहे ना ? मग जरा अराम कर ”

कन्हाने तिला करकचून मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले तिने प्रतिकार केला पण फायदा नाही ती चिडली ” हे काय भलतच बरं नाही आणि ” तो मिश्किल हसत म्हणाला ” खर वाटलं का तुला ?? ” … ” म्हणजे ?” ती लटक्या रागाने म्हणाली

” म्हणजे दिवसभर साडी नेसून छान तयार होऊन माझ्यासमोर ये जा चालू आहे आणि इकडे एक चान्स मिळाला नाही जरा स्वतःच्या बायकोला जवळ घेण्याचा …आठ दिवसाचा उपवास घडला आता सोडणार नाही” ……… राधाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं आणि मनापासून आवडलेली हि त्याची धडपड नजरेआड करून त्याला दाटवली ..तो थोडी ऐकणार होता…….मग काय

रात्र सरून गेली स्वप्नी मुकेपणाने

वेल्हाळ श्वास माझे ओठी अडून गेले

कळलेच नाही केव्हा का ते घडून गेले………

समाप्त :

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा