अपबीट…..4

Written by

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये राधाचा मोबाइल विराजच्या स्टाफने आणून दिला . ती विचार करत होती किती पराकोटीचे प्रयत्न करतोय हा कान्हा आणि कशासाठी तर माझा द्वेष करतो हे दाखवण्यासाठी. पण प्रेम लपत नाहीना, नजरेतून दिसतच कि , खरतर माझ्या या परिस्थितीवर हसावं कि रडावं हे मला कळतच नाही आता, पण असं वाटतंय की यावेळी मी प्रयत्न करायला हवेत तुझ्यासाठी तू हवा आहे मला माझा म्हणून पुन्हा आणि आता काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. एक संधीच दिली आहे आयुष्यानं मला तुला परत मिळवण्यासाठी and i am upbeat this time. पण ह्यासाठी मला आत्याला भेटायला हव आज .जरा लवकर निघते ऑफिसमधून असा विचार करून ती कामाला लागली.

ती आली तेव्हा कान्हा घरी नव्हता , कान्हाच्या वडिलांना साधारण सहा महिन्यानपूर्वी पक्षाघात झाला होता त्यामुळे त्यांची उजवी बाजू संपूर्णपणे लुळी पडली होती खूप इच्छा असूनही राधा त्यांना भेटायला आली नव्हती . तिला पाहून त्यांना भरून आलं असं तिला वाटलं किंचितस,पण ती त्यानं पूर्ण ओळखून होती . तिने आत्याला अगदी विश्वासात घेऊन सगळं सांगू लागली

राधा : आत्या तुला मायरा आणि कान्हाच्या लग्नासाठी मामानी (ती विराजच्या बाबाना मामा म्हणत असे) काय काय केलय हे माहित नसेल तुझ्या लेखी हा प्रेमविवाह होता.

आत्या: म्हणजे ? राधे स्पष्ट सांग सगळे

राधा : तेच सांगण्यासाठी आलेय मी इथे आणि मला त्यांच्यासमोरच हे सांगायचे आहे कारण मी खोट बोलत नाही ह्याला फक्त तेच पुरावा आहे

आत्या : राधे तुला कितीवेळा विचारल लग्नासाठी कान्हाने .त्याला फार आवडायचीस तू पण तू दादानंतर घराची जवाबदारी घेतलीस आणि लग्नाला नकार देत राहिलीस त्यात ह्यांची काय चूक आणि केले असतील त्यांनी कान्हाच्या लग्नासाठी प्रयत्न तर ती त्यांची जवाबदारीच नाही का ?

राधा : किती चिडतेस आते ,एकूण घे ना माझपण . आजपर्यंत कोणालाच माहित नाही ह्या गोष्टी आधी मामांच्या भीतीने नाही सांगितल्या मग कान्हाच लग्न झालं आणि आता सांगण्यात काय अर्थ आहे असं वाटत राहिल तुला सांगणार आहे कारण तुझी परवानगी हवी आहे एका गोष्टीसाठी

आत्या : कसली परवानगी ?

राधा: आधी माझं एकूण घे मग बोलूयात पुढचं .

आत्या : थांब कॉफी करते तुला कान्हा पण येईल इतक्यात

राधा: मी करते कॉफी आणि कान्हाची मीटिंग आहे आमच्या ऑफिसमध्ये सो त्याला यायला तासभर तरी लागेल अजून म्हणूनच मी आले ना ग.

आत्या : तुमचं चालूच आहे का अजून तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना

दोघीही हसल्या अगदी मनापासून मग राधाने सुरवात केली सांगायला जे इतके दिवस तिच्या मनाच्या तळाशी दडवून ठेवले होते.

राधा : कान्हा पदवीपरीक्षा संपल्यावर आला तेव्हाच त्याचे आणि माझे प्रेम आम्हाला कळले किती छान दिवस होते ते भेटणं बोलणं फारस व्हायचं नाही कारण तो ca फायनल ची तयारी करत होता, पण माझ्या वाढदिवसाला आवर्जून भेटला होत गुलाबाचं फुल घेऊन धावपळ करत आला होता आम्ही ठरवलं होत बरच काही. भविष्याची वेडी स्वप्ने पहिली होती खूप सारी पण हे फार काळ अनुभवू शकले नाही मी पुढच्याच वर्षी बाबा गेले मी नुकतीच s y b com ला गेले होते . लहाणच होता सारंग सुद्धा बाबांनंतर वर्षभरात सगळे बदल तुला माहित आहेच पेढी गेली काकांकडे आणि त्यांच्यासाठीच काढलेल सगळं कर्ज त्यात वाडा गेला त्यावेळी कन्हाने मला फार भावनिक आधार दिला बाबांची पोकळी कोणालाच भरून काढता येणार नव्हती पण कान्हामुळे मी निदान ह्या धाक्क्यातून सावरायची हिम्मत तर दाखवली आमची हि जवळीक मामांच्या लक्षात आली होती. बाबांच्या सगळ्या बचतीचे आणि गुंतवणुकीचे सगळे व्यवहार फक्त मामाना माहित होते कारण ते ca होते वाड्याचा लिलाव थांबवा म्हणून काही करता येईल का असे विचारायला मी मामांकडे गेले होते. कर्जाची रक्कम पाहता वाड्याची विक्री थांबवता येणार नाहि पण लिलाव थांबवता येईल असे त्यांनी मला सांगितले निदान लिलाव झाला नाही तर घोडक्यांची अब्रू वाचेल असे ते म्हणाले आणि शिवाय बाबांची शिल्लक आणि एक फ्लॅट आईच्या नावे करण्याची तयारी त्यांनी दाखवली . बाबांनी तो फ्लॅट एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावे घेतला होता आणि फक्त मामा बाबा आणि ते दुसरे कोणीतरी ह्यांनाच त्याची माहिती होती तो फ्लॅट आम्हाला मिळवून देण्यासाठी मामानी एक अट घातली . ती अट होती मी कान्हापासून दूर व्हावे माझ्यामुळे त्याचे ca व्हायचे परदेशी जाण्याचे स्वप्न तो पूर्ण करू शकणार नाही इतक्या लवकर बंधनात अडकला तर त्याची प्रगती होणार नाही असं बराच त्यांनी मला समजून सांगितलं मला तेव्हा ते पटलं देखील आणि मी कन्हापासून अंतर राखायला सुरवात केली त्याने जेव्हा जेव्हा मला लग्नाबद्दल विचारले मी घराची जवाबदारी पुढे करून नाकारघंटा वाजवली मी त्याच्याशी ब्रेकअप केलं म्हणूनतो चिडून परदेशी निघून गेला. पण मसाला यो परत येईल ही खात्रि होतीच. पुन्हा परत आल्यावर त्याने मला पुन्हा गाठले ह्यावेळी तो फारच क्लिअर होता मध्ये ४ वर्ष गेली होती माझं शिक्षण पूर्ण झालं होत सारंगही मोठा झाला होता आणि मी त्याला हो म्हणाले किती छान होते ते दिवस आम्ही भेटत असू फिरत असू ऑफिस संपले कि तो मला घायला यायचा पण पुन्हा ह्या गोष्टींची कुणकुण मामांना लागली आणि ह्यावेळी त्यांनी खूप मोठी खेळी खेळली.

मायरा त्यांच्या मित्राची मुलगी नेमकी तेव्हाच त्यांनी तिला बडोद्यावरून बोलवून घेतलं आणि नाईलाजाने कान्हाला तिला कंपनी द्यायला भाग पडलं तिला इथे मित्र मैत्रिणी नाहीत म्हणून ती त्याच्याबरोबर फिरत असे एकदा तेर ते दोघे माझ्या घरीपण आले. ती खूप स्मार्ट होती सगळ्यांना आवडली. माझा मात्र जळफळाट झाला कान्हा मुद्दाम मला चिडवायला तिला आणखी महत्व देत होता ज्याला ती प्रेम समजून बसली . मामानी माझ्या घरी येऊन मायरा आणि कान्हाच्या लग्नाची जवाबदारी मला सोपवली आईसमोर मला काहीच बोलता येईना आणि त्यांच्या खेळीचा अंदाजही येत नव्हता . मायरा श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी होती तिची सर्व प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याला मिळेल हे मामा ओळखून होते. म्हणून त्यांना ती आवडत होती. हवी होती सून म्हणून. मी आईसमोर काहीच बोलू शकले नाही त्यांना . आईलाही त्यांच्या उपकाराची जाणीव होती कारण त्यांनी बाबानंतर आम्हाला आर्थिक गोष्टींची सांगड घालून दिली होती.

मी त्यांना बाहेर गाठून विचारले कि मी का हे काम करू कान्हा आणि मी लग्न करणार आहोत. त्याना फार राग आला त्यांनी मला स्पष्ट शब्दात बजावले माझ्याकडे घोडक्यांच्या दागिन्यांचे प्रत आणि किंमत ह्याचे सगळे असे कागदपत्र आहे त्यांचा मी वापर केला तेर तुम्ही सगळे रस्त्यावर याला सोन विकत घेताना आणि विकताना चुकवेळेला कर आणि काळे व्यवहार मी उजेडात आणीन हे मला कठीण काम नाही आणि तरीही तू कान्हाला सोडलं नाहीस तर तुझे काका समजावतीलच तुला कारण त्यांचे व्यवहार हे तुझ्या बाबांसारखे पारदर्शी नाहीत . मग आता तू मायरा आणि कान्हाला जवळ आणायचं काम कर त्यांच्यात काही बिनसलं तर घोडके संपले समज.

नातं होत आत्या तुझ्याशी मामांशी तरीही त्यांनी प्रॉपर्टीच्या लोभापायी मी कान्हा आणि मायरा आम्हाला खूप मोठ्या तिढ्यात अडकवलं जो अजून सुटत नाही आहे . माझे सगळे सक्खे नातेवाईक वैरी झाले तेव्हा कान्हा होता माझ्यामागे खंबीर. आता मला परत त्याला दुखवायचं होत मी खूप सैरभैर झाले होते काय करू तेच काळत नव्हते . मग मी एक निर्णय घेतला कान्हा आणि मायराला एकत्र आणण्याचा कारण खरंच मायरासारखी सुंदर आणि श्रीमंत मुलगी त्याला शोभणाराच होती आणि मी एकदा ब्रेकअप केलं आधी तेव्हा ते पुन्हा जुळेल ह्याची खात्री होती म्हणून त्रास कमी झाला. आता मात्र हात सोडायचा होता कान्हाचा तोही कायमचा.

क्रमशः

***************************************************************************************************************************************

Article Tags:
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा