अबोल प्रीत

Written by

ते दोगेही एकाच गावात रहात होते.अगदि पाच मिनिंटाच्या अंतरावर दोघांच घर होते. तो चार वर्षानी मोठा होता. शाळा ही एकच अंन एणारा जाणारा रस्ता ही एकच. शाळेतून सुटल्यावर ते एकमेकांना फक्त बघत यायचे. हा आता त्यांचा नित्यक्रम झाला होता. दोघनी ही कधीच मैत्री करायचा देखील प्रयत्न केला नाही.होती ती फक्त तोंडओळख. असेच एक दिवस तो दहावी पास होउन कॉलेजला गेला. ती मात्र रोज मनातच त्याची आठवण काढत असे. दोगेही एकमेकांना रोज बघत असे. अंन चेहर्यावर फक्त एक गोड हसू अन नजरेत एकमेकांना बघण्याची ओढ दिसायची. पण दोघांमध्ये अजुनही संवाद झालाच नव्हता.?
कालांतराने तिचेही शालेय शिक्षण पूर्ण झाले. ती ही कॉलेज ला जाऊ लागली. आता ती तेरवीला होती आणि तो कामाला लागला होता. तिला बसने प्रवास करायला लागत होता. दुपारच कॉलेज असल्या मुळे सन्ध्याकाळी ती परत येत असे.इतके वर्ष फक्त नजरानजर अन एक गोड स्माइल या व्यतिरिक् दोघांचीही गाडी कधिच पुढे गेली नाही. अन अशाच संध्याकाळी ती बस स्टॉपवर होती. बस आली ती बसली आणि खिडकीच्या बाहेर बघत असताना अचानक एका मुलाच्या आवाजाने तिची तन्द्री भंगली.बाजुला तोच होता. अचानक त्याच्या बाजुला बसल्या मुळे ती खुप गांगरुन गेली होती. आज प्रथमच त्यांच्यात संवाद होत होता.दोघांचा ही आनंद त्यांचा डोळ्यातून आणि चेहर्यावर दिसत होता. आता हे अगदि रोजचेच झाले होते. तो कामावरुन येताना अन ती कॉलेज मधून येताना एकत्र यायचे.आता त्यांच्यात मैत्री झाली होती. पण त्याला प्रेमाच नव द्यायला कोणालाही जमत नव्हतं. पुढे त्याला बाहेरगावी नोकरी लागली. त्याचा नोकरीचा आनंद तर होता पण दुर रहायला लागणर याच दु:ख ही होते. एक दिवस ते संध्याकाळी ते समुद्र किनारी भेटले. तिथेच त्यांचा मैत्रीच प्रेमात रुपांतर झाले. पुढे तो बाहेरगावी गेला. दोघांचा वाटेला आला फक्त विरह. विरहात त्यानी घालवलेले क्षण आठवुन दिवस काढत होते. असेच एक वर्ष निघुन गेले. तो ही रजेसाठी परत आला होता. दोघांचे ही लग्नाचे वय झाले होते. घरात लग्नाची बोलनिही चालू होती. अशातच त्यानी ठरवले की त्यांचा प्रेमाबद्दल घरात सांगायचे. दोघांनिही खुप हिम्मत करुन घरी शेवटी सांगितले.पण……..
दोघांचा ही घरात त्यांचे प्रेम आणि लग्न मान्य नव्हते. कारण धर्म नावाची मोठी भिंत त्या दोन घरांमध्ये उभी होती. हो ते दोघे ही वेगळ्या धर्माचे होते. हेच कारण त्यांचा कायमच्या दुरव्यला होते. घरातून विरोध होता. आता पुढे काय होणार????
तेच होणार जे नियतीला मान्य असणार.
तसे दोघेही खुप समजदार होते. आईवडिलांना दुखवुन त्रास देऊन त्याना संसार करायचा नव्हता. परिणामी आईवडिलांचा निर्णय त्यानी मान्य करून प्रेमाचा त्याग केला.
आज तिचे लग्न होते…तिचा आनंद असणारा आजचा दिवस होता पण ती मात्र खुप रडत होती. कारण आजपासून तिचा प्रेमाच्या रोपट्यची वाढ खुंटली होती. लग्नाच्या होम कुंडात तिच्या प्रेमाच नात स्वाह: झाल होते. आईवडिलांसाठी ते कायमचे दुरावले होते. पुढे त्याच ही लग्न झाले.
आता 20 वर्षे झालीत दोघांचा ही संसार सुखाचा आहे . संसाराच्या वेलीवर 2 फुले ही फुलली आहेत. कशाची कमी दोघांनाही नाही.. पण….आजही मनातील ओढ दोघांसाठी दोघांकडे तेवढीच आहे. दोघे ही त्यांचा जोडीदारशी अगदि प्रामाणिक आहेत म्हणुनच आजही त्यांच्यात कसलाही संवाद नाही. लग्नाच्या होम कुंडात स्वाह: झालेल्या नात्याला परत कधीच संजीवनी दिला नाही. पण ….
आजही कधी एकमेकांची नजरानजर झालीच तर फक्त पुर्वीसारख एक गोड हसू असते. आणि नजरेतील ओढ मात्र तशीच असते. आता दोंघेचेही वय झाले तरिही…..
संध्याकाळच्या कातरवेळी मनात
फक्त त्याची आठवण असते..
अन डोळ्यात आता तिच्या
अश्रुंची साठवण असते….
समाप्त.
लेखिका: सौ : राजेश्री पाटील..

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा