अभिमान आहे मला गृहिणी असल्याचा

Written by

5 वाजले, स्वरा ची शाळा सुटायची वेळ झाली, बाहेर पालक मुलांची वाट बघत थांबले होते. शाळा सुटायला अजून 15 मिनिटे बाकी होती.  स्वरा च्या एका मैत्रिणीची आई जवळच उभी होती, वेळ होता म्हणून गप्पागोष्टी कराव्या असं वाटलं.

‘तुम्ही ईशा ची आई ना? स्वरा सांगत असते ईशा बद्दल, खूप हुशार आहे ईशा’

‘हो मी तिची आई, थँक्स हा, तिला पहिल्यापासून खूप बोल्ड बनवलंय आम्ही, तिच्याशी आम्ही इंग्लिश मधेच जास्त बोलतो, म्हणजे पुढे तिला काही अडचण नाही येणार, ऑफिस मुळे फार वेळ नाही मिळत, मी काही कॉम्पुटर कोर्सेस केले आहेत, सो खूप संधी आहेत मला आणि म्हणून वेळ काढणं मुश्किल असतं. बट वि ट्राय अवर बेस्ट, बाय द वे तुम्ही काय करता?’

‘ मी गृहिणी आहे’

थोड्या तिरस्कृत नजरेने त्यांनी स्वरा च्या आईकडे पाहिलं.

‘व्हाय? आय मीन, आजकाल महिलांनी फक्त चूल आणि मूल यात अडकून राहणं म्हणजे खरंच डिजगस्टिंग.. तुमचं एज्युकेशन नसेल जास्त पण तरी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे बाहेर’

‘तुमचं म्हणणं खरं आहे, पण मला कोणीही जबरदस्ती केलेली नाही, माझ्या आवडीने मी घर सांभाळते, मला त्यात खरच खूप आनंद मिळतो.

मुलं घरी आली की आई च्या हातच गरम गरम जेवण जेवतात, सुट्टीच्या दिवशी मुलं आणि मी मिळून काहितरी नवीन शिकतो, आणि मुलं शाळेत गेली की घरातली कामं करते. केवळ धुणी भांडी नाही, तर घराला घरपण येईल असं काहीतरी करायला मला आवडते. घरासमोर एक बगीचा तयार केला आहे, अनेक प्रकारची फुलझाडं आणि फळझाड लावले आहेत, मुलं रमतात तिथे. घरी पाहुण्यांची सतत येजा असते, त्यांना हवं नको ते पाहायला लागतं. त्यांचं मनसोक्त स्वागत करून त्यांचा आवडीचा स्वयंपाक बनवणे, त्यासाठी पूर्वनियोजन करणे, उत्कृष्ट स्वयंपाक बनवणे आणि त्यांनी तृप्त होउन निरोप देऊन जाणे यात खूप आनंद मिळतो मला, आणि मुलं सुद्धा पाहुण्यांची आदराने विचारपूस करतात. पहाटे लवकर उठून आम्ही सगळे देवळात जातो, तिथल्या शांत वातावरणात काही क्षण घालवतो, मग तिथे मुलांच्या आजी त्यांना गोष्टी सांगतात, मंदिरातून देवाचा आशीर्वाद आणि गोष्टीतला बोध घेऊनच मुलं घरी येतात. गृहिणी म्हणून घरात साफसफाई, इस्त्री, भांडी, धुणी, पाहुणे, स्वयंपाक, आजारपण काढणे, सर्व पूजा अरचा पार पाडणे, सण उत्सव साजरे करणे..ही यादी कधीही न संपणारी आहेत. आणि स्वखुशीने मी हे सगळं करतेय’

‘किती आऊटडेटेड विचार आहेत’, असं इशा ची आई मनातल्या मनात पुटपुटली.

इतक्यात शाळा सुटायची घंटा वाजली,

स्वरा पळत पळत आली आणि आईला हसतमुखाने बिलगली,

‘आई आपल्या बागेतली मोगऱ्याची फुलं उद्या उमलतील ना? मी तुला गजरा करून देईल त्यांचा’

“ईशा, व्हेयर आर यु गोइंग? कम हिअर”

“ममा, मला बोलायचं नाहीये तुझ्याशी, माझ्या सायन्स प्रोजेक्ट ला प्राइझ नाही मिळालं, तुझ्यामुळेच’

‘डोन्ट से लाईक दिस ईशा, कोणाला मिळालं प्राइझ?’

‘स्वरा ला’

‘व्हॉट? हाऊ?’

“हर मॉम इस इंजिनियर”

ईशा ची आई निःशब्द

वातावरणात कमालीची शांतता

जाता जाता स्वरा ची आई म्हणाली,

“अभिमान आहे मला गृहिणी असल्याचा”

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा