अमावस्येच्या रात्रीतला दीप उत्सव

Written by

आरं ए पोरा सरक की,बाजूला !

मंदिरात दिवा लाऊ देतो का न्हाय म्हणत एका बाईने दिन्याला सणसणीत शिवी हासडली पण धिट दिन्या तिथे लुडबूड करतच होता, हे बघत पाटलाच्या एका माणसाने त्याला हातापायाने तुडवलं तसा दहा वर्षाचा दिन्या रक्त ओघळत शरीराने, घाबरून बाजूला सरकला.

पण लगेच थोड्यावेळाने कोणी बघत नाही म्हणून तो परत मंदिरात,दिव्यांच्या आरासजवळ आला अन् तिथले चार पाच ‘तेलाने भरलेले दिवे’ उचलत तो झपाझप आपल्या झोपडीवजा घरात आला….

आणलेल्या दिव्यांच्या प्रकाशाच्या उबेत तो त्याच्या आजारी ‘माय‘ ला आपल्या रक्ताळलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करत कपड्याने शेकू लागला, दिव्यातली तेलवात जळत होती अन् अमावस्येच्या रात्रीतला तो दीप उस्तव दिन्याच्या झोपडीत लखलखत होता.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत