अरे संसार संसार

Written by

अरे संसार संसार
कष्ट पडती अपार
करती सारे चंगळ
माझा कुणा ना विचार

अरे संसार संसार
पती माझे डॉक्टर
घरासाठी नाही वेळ
लोका देती उपचार

अरे संसार संसार
लेकरं झाली द्वाड फार
कोरोनाची सुट्टी आता
करती पसारा घरभर

अरे संसार संसार
जसा गुलाब सुंदर
जरी टोचती काटे
गन्ध देती मनभर

  1. ©मेघना
Article Categories:
कविता

Comments are closed.