अवहेलना स्त्रीची…….

Written by

©अर्चना अनंत धवड ✍️

मावस सासू म्हणाली, प्रिया तयार हो, साडी नेसून घे… (हातात साडी, ब्लाऊज वगैरे घेऊन आली)लोकं येतात बर नाही वाटत…. तिची बहीण चिडली… अरे ती चक्कर येऊन पडते… तिला उभ रहायची शक्ति नाही अणि तुम्ही हे काय सांगतात… आम्हाला तर नाही जमणार तुम्हाला जमत असेल नेसून द्या साडी….

मावस सासू शांत झाली… पण तिला माहेरच्यांनी मध्ये बोललेले तिला आवडले नव्हते…

जाऊ दे… मला काय करायचे कुणी येत जात… बर दिसत नाही म्हणुन म्हटले… असे बडबडत ती निघून गेली….

प्रियाच्या नवर्‍याची बॉडी घरी येणार होती हॉस्पिटल मधून….. प्रिया बत्तीस वर्षाची मुलगी.. नवर्‍याचे कॅन्सर नी निधन झाले…. प्रिया घरी ड्रेस घालून होती म्हणुन तिला तिची मावस सासू साडी नेस म्हणत होती… प्रिया मात्र शुद्धीतच नव्हती .. बॉडी घरी आली… सगळीकडे रडारड सुरू झाली… प्रेताचे सगळे सोपस्कार पार पडत होते दुसरीकडे तिच्या शरीराचे .. मोठे कुंकू कपाळावर लावले.. कदाचित शेवटचे म्हणुन मोठे असावेत…. प्रेत उठल्यावर ती निष्प्राण होऊन बसली होती…. कुणीतरी म्हणाले अरे कुंकू पुसा… मंगळसुत्र तोडा… बांगड्या फोडा… या सगळ्यात तिची सासू किंवा नणंद कुठेही नव्हत्या… कारण त्या सुद्धा दुःखात बुडालेल्या होत्या.. परंतु दूरच्या नातेवाईक स्त्रिया मात्र आपले कर्तव्य चोख बजावीत होत्या….

एकीने कुंकू पुसले…. कुणी म्हणाले मंगळसूत्र तोडा…

दुसरी म्हणाली.. अग ते सोन्याचे आहे….

प्रिया, काढ बर मंगळसूत्र….

प्रिया मात्र निर्विकार बघत होती…

दुसरी म्हणाली, अग तिला काय सांगते.. काढ ना तू… अणि जवळपास मंगळसुत्र ओरबाडून काढले… कुणी जोडवी काढली तर कुणी बांगड्या फोडल्या…. अणि दोघी जणी तिला हात धरून आंघोळीसाठी घेऊन गेल्या…..

हे सगळे करतांना त्या स्त्रियांचा हात जराही थरथरला नाही…. हे सगळे दृश्य तिची आई अणि बहीण असहायपणे पाहत होत्या….मनात म्हणत असतील जिथे देवांनी सुखच ओरबाडून घेतले तिथे मंगळसूत्र अणि कुंकू काय आहे…

मनात म्हटले, कुठल्या रुढी, परंपरा पाळतो आपण…

एवढा नवरा गेल्यावर तिच्या दृष्टीने सौभाग्य अलंकार काही महत्त्वाचे नसतात…. परंतु अस ओरबाडून घेणे, अणि तेही एका तीस बत्तीस वर्षाच्या मुलीच्या अंगावरचे….. थोडा सुद्धा तुमचा हाथ थरथरत नाही…

या सगळ्या प्रकारात पुरुषाचा काहीही रोल नव्हता…. एका स्त्री नी दुसर्‍या स्त्रीच दुःख समजून घेऊ नये यासारखी दुसरी शोकांतिका ती कोणती…

एका स्त्रीची एक स्त्रीच अवहेलना करते….. नाही का???

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत