अव्यक्त प्रेम

Written by

 

 

नाही जमले व्यक्त व्हायला
नाही जमले काही सांगायला
प्रेम ठेवले साठवून शेवटच्या क्षणाला
सरूनी काळ लगेच ही गेला
आता खरच गरज होती व्यक्त व्हायला
अचानक तो समोर ही आला
सांगून टाकणारच होते त्या क्षणाला
पण कदाचित मान्य नव्हते नियतीला
हातात पत्रिका ठेवून तो म्हणाला
नक्की ये माझ्या लग्नाला
एवढे बोलून तोही निघाला
काम खूप होती त्याला ह्या घडीला
कधीच कस कळलं नाही त्याच्या मनाला
काय चालु असेल माझ्या मनात ह्या क्षणाला
का नाही जमले मला ही व्यक्त व्हायला
का नाही जमले त्याला कधी सांगायला
कदाचित खरच मान्यच नसेल ह्या नियतीला
अव्यक्त प्रेम माझे राहिले ते शेवटच्या क्षणाला
ठाम पणे सांगितले मी माझ्या मनाला
शुभेच्छा दे हसत त्याला
त्याच्या पुढील भावी जीवनाला
आणि तुही लाग पुढील वाटचालीला

©भावना विनेश भुतल

 

Article Categories:
कविता

Comments are closed.