अव्यक्त प्रेम….

Written by

शितल ठोंबरे #

अव्यक्त प्रेम……

निशा आणि सुनिल च्या लग्नाला वर्ष होत आल.दोघांच लग्न अगदी कांदेपोह्याचा पारंपारिक कार्यक्रम करून झालेल.दोघांची पसंती घेऊन.पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांना पसंत पडले आणि लग्नगाठ बांधली गेली.संसाराला सुरुवात झाली.लग्न इतक्या घाईगडबडीत झालं की दोघांना एकमेकांना समजून घ्यायला,विचार,स्वभाव जाणून घ्यायला वेळच नाही मिळाला.

निशाचा स्वभाव बोलका तर सुनिल अत्यंत शांत,अबोल. सुनिल चा स्वभाव निशा ला खटकत असे.पण ती कधी बोलून दाखवत नसे.असतो एखाद्याचा स्वभाव अस म्हणून सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केल.तस पाहता सुनिल निशा ची फार काळजी घ्यायचा.तिला काय हव नको,ती काही बोलण्याआधीच तिच्या साठी सर्व काही हजर असायच.तिच्या मैत्रीणी तिला नेहमी चिडवत,” तुझ बर आहे बाई तू काही न मागताच तुझा नवरा आपसूकच सार काही आनून देतो.आणि आमच्या कडे दहा वेळा ओरड केल्यावर एकदा वस्तू हजर होते.” कोणी म्हने ,”भारी जीव आहे तुझ्यावर सुनिलरावांचा” यावर निशा फक्त गालातल्या गालात हसे.

इकडे निशाच्या मनात वेगळच द्वंद्व सुरु झालेल.सुनिल निशा ची सर्वोतोपरी काळजी घ्यायचा.नवरा म्हणून आपली निशा प्रती असणारी सारी कर्तव्ये पार पाडायचा.पण त्याचा अबोल स्वभाव इतका अबोल होता की,शब्दातून त्याने निशा जवळ कधी कबूल केलेच नाही की त्याचे निशा वर किती प्रेम आहे.निशा ने कधी त्याला याबद्दल हटकलच तर त्यावर तो अगदी शांत पणे उत्तर द्यायचा “हे काय बोलायची गोष्ट आहे.” निशा हिरमुसली व्हायची.

हळूहळू तर तिला त्याच्या या स्वभावाचा राग यायला लागला.निशा ला वाटायच कधी तरी सुनिल ने तिला जवळ घेऊन बोलाव ” निशा राणी मी तुझ्यावर प्रेम करतो.” पण प्रत्येक वेळी निशाचा अपेक्षाभंग व्हायचा.
सुनिल मात्र निशा च्या विरुद्ध विचारांचा होता. शब्दांनी व्यक्त केल म्हणजेच प्रेम असते हे त्याला मुळीच पटत नव्हते.आपण निशा साठी जे काही करतोय ते प्रेमच तर आहे मग अजून वेगळ व्यक्त करण्याची काय गरज?

या सगळ्यात निशा मात्र फार दुखावली गेली.आपल्या जोडीदाराकडून तिला जे अपेक्षीत होत ते तिला मिळतच नव्हतं.तिच मन अगदी खट्टू झाल.हळूहळू तिचा बोलका स्वभाव शांत व्हायला लागला.ती आपल्याच विश्वात गुंतून राहू लागली.सुनिल ला समजेना निशाला अचानक झालं तरी काय??

निशा वारंवार आजारी पडू लागली.दिवंसेदिवस तिची तब्ब्येत ढासळू लागली.डोळे खोल गेले.डोळ्यांखाली काळी वर्तुळ जमा झाली.चेहरयावरच सारं तेज नाहिस झाल.डॉक्टराना दाखवन्यात आलं पण तिचे सारे रिपोर्ट नॉर्मल होते.डॉक्टरांनाही तिच्या आजाराच निदान करता येईना.

एकदिवस निशा घरातच चक्कर येउन पडली.तिला हॉस्पिटलमधे भरती करण्यात आलं.डॉक्टरानी आपल्या परिने सारे प्रयत्न करून पाहिले पण निशाच्या तब्ब्येतीत काही सुधारणा होत नव्हती.सुनिलला तर धक्काच बसला एवढी हसरी,बोलकी,अवखळ आपली निशा तिला अचानक झालं तरी काय?

निशा हॉस्पिटलच्या बेडवर शांत पहुडली होती.सुनिलचे डोळे रडून रडून लाल झाले होते,सूजले होते,कित्येक रात्री त्याने निशासाठी जागून काढल्या होत्या.सुनिल ने निशाचा हात आपल्या हाती घेतला.” निशा …निशा काय झालं गं तुला.माझ्यासाठी तुला बरं व्हावच लागेल.मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत.तुला काय झाल तर मी ही माझ्या जीवाच बरं वाईट करून घेईन.माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.”

सुनिलला जाणवलं निशाची आपल्या हातावरची पकड हळूहळू घट्ट झाली आहे.तिच्या त्या स्पर्शाने सुनिल ला जरा धीर आला.कशालाच प्रतिसाद न देणारी निशा अचानक हातांची हालचाल करु लागली. डॉक्टरांसाठी सुद्धा हा एक चमत्कारच होता.डॉक्टरांनी सुनिल खोलीत असताना काय काय घडल सर्व सुनिल कडून काढून घेतलं.सुनिलने निशाशी त्याच बोलण,निशाचा हात हाती घेण,निशाच्या हाताची हालचाल जाणवण सारं काही सांगितलं.

डॉक्टरांना औषध सापडलं होत.डॉक्टरांनी सुनिल ला विश्वासात घेऊन समजावल,” निशाला तुझ्या काळजी बरोबरच तुझ्या प्रेमाची ही गरज आहे.त्यासाठीच कदाचित तीची ही अवस्था झाली आहे.”

खरतर सुनिलच ते वाक्य निशावर एखाद्या औषधा प्रमाणे काम करायला लागल होत.सुनिल आता निशा जवळ बसून तिच्या वर आपल किती प्रेम आहे हे वारंवार तिला सांगू लागला. “माझ तुझ्यावर प्रेम आहे ,मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. निशा तू मला हवी आहेस “हळूहळू निशाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

निशाने आपले डोळे उघडले सुनिल तिच्या समोरच होता.तीची काळजी घेत.आपल तिच्यावरच प्रेम व्यक्त करत.सुनिल निशाला म्हणाला ” काय हे वेडाबाई अस कोणी करत का? तुझ्याशिवाय माझ काय झाल असत .”

तेव्हा निशा सुनिलला म्हणाली ,” तुम्ही माझी काळजी घेतली मला हव नको ते सार पाहिल पण माझ्या मनाचा विचार कधी केलाच नाहीत.माझ्यावर असणार प्रेम कधी व्यक्तच केल नाहीत.तिच गोष्ट मला आतल्या आत पोखरत गेली.प्रेम करण जितके महत्वाचे तितकच ते व्यक्त करणही महत्वाच.”

आज खरया अर्थाने माझ प्रेम मला मिळालं.सुनिलने नकळत झालेल्या आपल्या या चुकीची माफी मागितली.वेडाबाई माझी! यापुढे दिवसातून शंभरदा म्हणेन,माझ तुझ्यावर प्रेम आहे.
निशा अगदी मनोमन खुलली, आनंदली………..क्षणातच सुनिल च्या मिठीत विसावली.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा