*अव्यक्त भावना*

Written by

*अव्यक्त भावना*

अव्यक्त भावना,
लेखनीतुन व्यक्त कराव्यात..
कृतीतन व्यक्त न करता,
त्या सहज कागदावर उतराव्यात।।१।।

भाव अंतरीचे,
मनोमन व्यक्त व्हावेत…
गुज मनीचे,
हळुच उधळुन यावेत।।२।।

अबोल अंतकरण,
अलगदच अनवाणी करावे…
निखळ होऊनी,
शब्दातुनी ताल धरावे।।३।।

मन उधाण वाऱ्यात,
पाखरु होऊनी उडावे…
शब्दांची साज धरुनी,
अखंड समुद्रात पोहावे।।४।।

समुद्रातील पाण्यावीणा,
कधी शांत तर कधी रौद्र रूप धारावे….
निरभ्र जलातुनी,
मग शिंपल्यातील मोती वेचावे।।५।।

असच निरंतर,
शब्दांशीच खेळत बसावे….
आठवणींच्या पाल्हळयात,
स्वतःही बुडून जावे।।६।।

अश्याच अव्यक्त भावनांना,
शब्दांचे तेज मिळावे…
लेखनीतुन शब्दांना,
चिरंतर तेवत ठेवावे।।७।।

ती तेवत असणारी ज्योत,
अशीच अखंड पेटावी….
वाचतांनी वाचकांना ,
त्याची अनुभूती यावी।।८।।

व्यक्त झालेल्या भावना,
थेट हृदयाला भिडाव्यात….
शेवटी का होईना,
लेखनीला न्याय मिळावा।।९।।

©️अश्विनी दुरगकर

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत