अशीही माणसे असतात समाजात.

Written by

तिने आज जे संगितले ते ऐकुन निशाला आतुन एकदम खून खोलतो अस झाल होत हे जरी खरं असल तरीही ती हमसून हमसून रडली देखील. कारण देखील तसच होत शितल सांगत होती की ती जेव्हा तिची मुलगी प्राची च्या वेळी बाळंत झाली (दुसरी वेळ) तेव्हा ती जाणुन बुजुण माहेरी गेली नव्हती कारण तिच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा जन्म झाला की लगेच दगावला होता आणी या कारणावरुन देखील शितलच्या सासरचे उदया हिच्या बाळाचे काही कमी जास्त झाले तर आईवडिलांवर आयुष्यभर टेपूर ठेवत बसले असते. शितल म्हणाली की बहिणीचा नवरा तिच्या आईवडिलाना एका शब्दाने देखील बोलला नाही की काय न कसे झाले एवढा समजुतदार होता तिचा मेहुणा. बरं ते असो पण सांगायची बाब ही की शितल डिलीवरी झाल्यावर हॉस्पिटल मधून घरी आली खरी पण म्हणतात ना आईचा हात आणी शेजिचा भात बरोबर असतो अस सगळ तिच्या पुढे आलेल्या दिवसात वाढून ठेवलं होत. झाल अस की तिची मावस सासू तिला पहायला आली आणी येताना देशी अंडी घेऊन आली पण सासूने पटकन ती बरणी उचलली न आपल्या लेकीच्या पुढे करुन म्हणते कशी ” हे घे कविता ही एवढी अंडी घेऊन जा मुंबईला देशी अंडी मिळत नाहीत तिकडे आणी तुला तर आवडतात ना फार!” कविता पण दोन मिनिटे स्तब्ध राहुन शितल कडे पाहत म्हणते कशी “शितल तु आईला आणायला सांग हा वस्तीवरुन! निशाच यावर अस मत होत की आईलाच आणुन दे म्हणून सांगायच ना मग बजावून. शितलला का म्हणायच की आई आणुन देइल. जस काही आईला पण खुप सुनेची खरेच खुप काळजी. मायेचा पाझर असता तर अस सुनेच्या तोंडचा घास लेकीच्या घशात नसता घातला. एवढच नाही तर कविता ने येताना 200 ग्राम चे तुपाचे पाकिट आणले होते तर ते देखील सासुने तिला रिटर्न न्यायला सांगितल. शितलच्या सासू बद्दल चिड तर होतीच पण निशाच्या मनाच्या हळवेपणा मुळे अश्रुंचा बांध देखील फुटून वहात होता.

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.