अशी असते आमची दिवाळी…!! # Divali

Written by

🔴अशी असते आमची दिवाळी…!!

ज्यावेळी दिवाळीच्या सोनपावलांची चाहुल लागते त्यावेळी दिवाळीची तयारी सुरु होते.जीवनाला प्रकाश देणारा तेजोमय सण मन अगोदरच उल्हासीत करतो त्या प्रणेनेच दिवाळीच्या तयारीची लगबग सुरवात होते.. घराची स्वच्छता , रंगरंगोटी उत्साहाने केली जाते..अंगणातील अडगळ दुर करुन स्वच्छ करुन रांगोळी घालण्यास सज्ज केले जाते…वर्षभर जनावारांचे पालनपोषन करायचे , त्यांना पोटच्या पोरासारख जपायच…त्यांंच्या धारोष्ण दुधाने किटल्या भरायच्या….गोकुळला ते दुध घालायचं ..आणि दिवाळी त्यांनी दिलेल्या मायेच्या पैशाने..बोनसने साजरी करायची…किती कष्टाचा सुंगध ..या दिवाळीला..आणि मग खरेदीला सुरवात..मुलांना कपडे..घरातील , आईवडिलाना ,बहिण भावाला दिवाळीची कपडे खरेदीने आनंद द्वीगुणीत केला जातो. फराळ साहित्य खरेदी करुन फराळ तयार करण्याची घरात लगबग सुरु होते …लहानमुले घरात एकच गलका करत असतात…अंघोळीला सुवासिक साबण , उटणे , अत्तर यामुळे घरात घमघमाट सुटलेला असतो. आपला फराळ झालेनंतर एकमेकांच्याकडे फराळ करण्यास जाणे मन संतुष्ट करण्यासारखे आसते.. .फराळ एकमेकांच्या घरात वाटण्याची काम शिताफिने चालु असते..फराळाचा गोडवा त्यामुळे आणखिन वाढतो.

लक्ष्मीपुजन दिवशी लक्ष्मीच्या समोर फराळ ठेऊन मनोभावे पुजा केली जाते… सर्वाना सुखसमृद्धि दे ..अशी प्रार्थना सर्वजन करतो.रात्री गवळण्यांचा सुंदर वाडा घातला जातो…चौकोनी पद्धतीने घातलेला वाडा मन आकर्षण करुन घेतो..बलीप्रतीपदा पाडवा या दिवशी सकाळी देवपुजा केली जाते..घरात पुरणपोळी करण्यास सुरु असते सर्व कामकाज आटोपून बहिण भावाला ओवाळणीचा कार्यक्रम याच वेळी असतो..अत्यंत हृदयस्पर्शी वाटणारा हा प्रसंग मनाला सुखावून जातो…बहिणीला ओवाळणी म्हणून साडी दिली जाते…त्यानंतर गावातील पालखी वाजतगाजत ग्रामदैवत भावेश्वरी मंदिराकडे जाते ..गावातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने देवळाकडे जातात..गार्हाणे घातल्यानंतर सर्वजण देवासमोर नारळ देतात..दरवर्षी दिपावलीला प्रत्येक देवाला नारळ देण्याची प्रथा फार पुर्वीपासुन असून आजही ती जोपासली जाते…भावेश्वरी , , बम्हदेव , निंग , विठलाई , मसणाई , मारुती , मंगाई , महादेव , लक्ष्मीदेवी , चाळोबा , मसोबा अशा तब्बल पंचवीस देवांना नारळ दिले जातात ..यानंतर घरी मग पुरणपोळीचा आस्वाद घ्यायचा थोडी विश्रांती घेतल्यानंतर आमच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर निंगुडगे या गावात बसवेश्वर या देवाची यात्रा दरवर्षी असते.या यात्रेला घरातील महिलामंडळ व मुले जातात मनसोक्त खरेदी करतात मुले खेळणी , आईस्क्रिम याचा लाभ घेतात..अतिशय आनंददायी वातावरण या जत्रेत असते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे कुस्ती…दुरवरुन अनेक नामवंत मल्ल आलेले असतात .रंगतदार कुस्त्या बघताना भान हरपून जाते..बघता बघता संध्याकाळ होते..तिथुन दंगामस्ती करत घराकडे यायचे…सर्वांनी एकत्र बसुन पुरणपोळीचा आस्वाद घ्यायचा…आस हे साचेबद्ध क्षण दिवाळीला ठरलेल असतात. … अधुन मधुन शेतीची व जनावारांची देखभाल ही ठरलेलीच..पण कमालिचा उत्साह…आनंद दिवाळीच्या सणाला लुटायला मिळतो…घरोघरी पणत्यांची रोषणाई …दिव्यांचा झगमगाट …..बालगोपाळांचा किल्यांचा छंद..फराळाची चंगळ …अशा सार्या मोहक क्षणांनी आयुष्य सजून जात..अशी ही दिवाळी क्षणांक्षणांला आठवणींचे बीज पेरत जाते..

आयुष्यात अशा लाखमोलाच्या दिवाळीला शतशः धन्यवाद द्यावेसे वाटतात…!!

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा