सगळ्याच डोळ्यांना जमत नाही
ओघळणे गालावर,
अश्रुंनी फुले फुलतात
पण फुललेल्याच गालावर…
अश्रुंची मात्रा चालतच नाही
ज्यांच्या दयनीय जीवनावर,
त्यांचे डोळे असतात खाली
आणि अश्रु असतात भाळावर…
सगळेच डोळे खुश असतात
गोड गोड स्वप्नांवर,
काहींची मात्र स्वप्नच
उतरत नाही या जीवन-मंचावर…
ज्या निस्तेज डोळ्यांचे आवेग
येत नाहीत सहज ओठांवर,
जा तुम्ही एकदा त्यांच्या
पापण्यांच्या काठांवर…
—दिप्ती
Article Categories:
कविता