असा तू!! माझी लाईफलाईन

Written by

मी सुंदर आहे म्हणून तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून मी सुंदर आहे!!

मी पडले तर तू उठवतोस, अडखळले तर सावरतोस, चिडले तर हसवतो, रुसले तर मनवतो, भांडले तर तू गप्प राहून ऐकतो,रडले तर डोळे पुसतोस…

न बोलता माझ्या मनातलं ओळखतोस,गरज पडली तर
माझी आईही होतोस आणि बापही होतोस…

माझ्या आजारपणात हळवा होतोस पण तितकीच काळजीही घेतो,माझ्या दुःखांवर मायेचं पांघरून घालतोस,सुखात माझ्या मागे असतो पण दुःखाशी चार हात समोर उभा राहून करतोस..

मला तुझ्यासमान हक्क देतोस,माझा आत्मसन्मान जपतोस,पुरुषी अहंकाराच्या बळी न पडता माझा मोठेपणाही ताठ मानेने मिरवतोस …

असा तू..माझा नवरा..माझा आयुष्याचा जोडीदार..माझी लाईफलाईन!!!

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा