“असे काही तुला द्यावे… आनंदाचे क्षण!”

Written by

“असे काही तुला द्यावे… आनंदाचे क्षण!”

“आयुष्याच्या या वळणावर,
मन तृप्त झाले!
माझे मी पण हरवून,
मी तुझ्यात विलीन झाले!”

“मागे वळून पाहता,
तू खूप काही दिलेस मजला…
नांव, ओळख, संपत्ती अन मान,
असे सदैव माझ्या दिमतीला!”

“आज मनापासून वाटते,
असे काही तुला द्यावे… आनंदाचे क्षण..
ज्याने माझ्या पश्चात,
जगण्याचे बळ तुला मिळावे!”

© सौ. सुचिता वाडेकर…✍

Article Categories:
कविता

Comments are closed.