“अहो, ऐकलत का” कि “अरे,ऐकतोस का”….

Written by

मी आणी माझा नवरा, आम्ही क्लासमेटस..इंजीनियरिंग चे चार वर्ष सोबत..नवरा किंवा प्रियकर होण्याआधी तो माझा खुप चांगला मित्र झाला होता..हळुहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणी मग परिकथेतल्या राजकुमार आणी राजकुमारी सारखे सगळे कसे छान जळून येऊन आमचे लग्न झाले..लग्न झाल्यावर पहिल्याच् दिवशी चुलत सासू बाई म्हणाल्या ‘आता त्याला “अहो” करुन हाक मारायला शिक, आता तो तुझा मित्र नाही राहिला तुझा नवरा झालाय”..

त्यांचे बोलने ऐकुन खुप दडपण आले मला अचानक ज्या व्यक्तीला मी सहा वर्षे ‘अरे’ करुन संबोधत आले त्याला लगेच ‘अहो’ म्हणायची सवय कशी होईल..मी प्रयत्न करु लगले पण अवघड होते हे सगळे माझ्यासाठी..त्याला बोलून दाखवली माझी व्यथा..तसा तो खुप समजुतदार..तो म्हणाला “इथे आहोत तोवर कर ऐडजस्ट,आपण दोघेच असताना नाही गरज..कुणी काहीही म्हणो मी अजुनही तुझा मित्र आहे आणी आयुष्यभर तुझा मित्र रहायला आवडेल मला”!!! ☺️किती हलका झाला मनावरचा भार..शब्दात न सांगता येण्यासारखा..

आज लग्नाच्या तीन वर्षानंतर ही आम्ही मित्र मैत्रीण आहोत हे माझे अहोभाग्य च म्हणवे लागेल..? फक्त घरची मंडळी आल्यावर किंवा घरी गेल्यावर काही दिवस आम्ही नवरा बायको होतो?सासूबाई ना माहिती आहे कि आम्ही एकटे असताना त्यांच्या मुलाला मी नावाने आवाज देते, डायरेक्ट नाही बोलत त्या पण बोलून दाखवतात..मागे एकदा बोललेल्या कि “मुलांवर काय संस्कार करतील अशा मुली ज्या नवरयाला नावाने आवाज देतात..नवरा देव असतो”!!

मला समजून गेले टोमणा मलाच आहे..पण मला खरच हा प्रश्न आहे कि नावाने आवाज देणे आणी आदर न करण याचा खरोखर काही संबंध आहे का? स्त्री कितिही मॉडर्न झाली तरिही तिचा नवरा हा तिच्यसाठी देवसारखाच असतो नाही का?माझा ज्या बायका ‘अहो’ बोलतात त्याना ही काही विरोध नाही..फक्त म्हणणे हेच आहे कि प्रत्येक नवरा बायको चे नाते वेगळे असू शकते.नवरा ही एकमेव व्यक्ती असते बाई च्या आयुष्यात सासर घरी जी तिच्या जवळची असते हक्काची असते मग त्यानी एकमेकांना काय म्हणावे हा त्यांचा व्ययक्तिक निर्णय असू नये का?

लहानपणापासुन आई आपल्याला शिकवते कि वडीलधारया आणी मोठ्या माणसाना अहो संबोधित करायचे, त्याना आदर दयायचा ..माझ्याही आई ने तसेच शिकवले होते अर्थतातच..पण मी आई ला विचारयचे कि मग काकू, मावशी,मामा, आजी हे सगळे पण मोठी आणी वडिल धारी माणसे आहेत मग त्याना तर मी अरे किंवा अग म्हणू शकते मग त्यांचा अनादार नाही होत का? आई कडे उत्तर नसे माझ्या प्रश्नाचे मग काय नेहमीप्रमाणे जशी आपली सगळ्यांची आई बोलते तसच ती ही बोलायची ‘नसता शहाणपणशहाणपणा करु नको सांगितले ते ऐकत जा’?
पण मला या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे आणी जर उद्या माझ्या मुलाने मला हा प्रश्न विचारला तर मी नक्की उत्तर देण्याचा प्रयन्त करेन..माझ्या मते आपण मामा, काकू, मावशी ,आजी(आई ची आई) याना अग किंवा अरे म्हणतो कारण ती आपली हक्काची माणसे असतात.ती नाती जन्मजात आपल्याला मिळालेली असतात याउलट सासरची नाती ही नंतर जळून येतात.ती हक्काची नसतात असं माझे अजिबात म्हणण नाही पण सासर हे सासरच असते ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, तिथे नेहमी अपेक्षांचे ओझे वागववे लागतेच..असो तो माझा मुद्दा नाही मला फक्त हेच वाटते कि आदर किंवा सन्मान हा काय संबोधले यावर नाही तर मनातल्या भावना आणी प्रेम यावर अवलंबून असतो नाही का?

मैत्रिणीनो तुम्हालाही असे अनुभव आले असतिल..कमेंट करुन नक्की कळवा..

©®सुवर्णा राहुल बागुल
फोटोसाभार: गूगल

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा