आंधळे प्रेम..

Written by

    मोना घरातील दोन नंबर ची मुलगी एक मोठी बहीण आणि 2 लहान भाऊ असे त्यांचे गावाकडील कुटुंब..  परिस्थिती जेमतेम , वडील मिळेल तसे काम करून घर चालवत आणि तिची आई देखील शिवणकाम करून घराला हातभावर लावत. पदरी चार मुले जेमतेम परिस्थिती असे एकंदरीत सर्व होते.पण त्यात पण ते सुखी होते .. मोनाची मोठी बहीण कविता जास्त काही हुशार नसल्याने तिला खूप शिकण्यात रस नव्हता . त्यामुळे घरच्यांनी कविता चे लग्न करण्याचा निर्णय घेतला..कविता तशी दिसायला सुंदर होती
काही दिवसात कविता चे लग्न पार पडले आणि मोना तिच्या पुढच्या शिक्षणा साठी युनिव्हर्सिटी मध्ये रवाना झाली.
तिथे  मोना  साठी  सर्व  नवीन  वातावरण  होते. तिथे  तिला रुळायला बराच वेळ लागला.ती खूप शांत  शांत राहत असे.आणि कोणामध्ये मिसळत देखील नव्हती. ती तिचा पूर्ण वेळ अभ्यासाला देत होती.कारण तिला तिच्या परिस्थिती ची जाणीव होती.तिच्या सोबत चे असणारे मुलं मुली चांगल्या परिस्थिती मधून आलेले असल्याने ते मजा करत, कधी पार्टी, कधी फिरायला जाणे असा त्याचं एकंदरीत वेळापत्रक असे.  परंतु मोना एकदम  साधे राहणीमान, गरीब असल्याने मुलं मुली देखील तिला जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न करत नसत किंवा तसं ती पण त्यांच्या ग्रुप मध्ये विशेष रस दाखवत नव्हती.
काही दिवसात परीक्षा होत होत्या आणि तेव्हा मोनांचे मार्क्स बघून सर्वांच्या मनात तिच्याबद्दल थोडा आदर निर्माण झाला.असे दिवसामागुन दिवस जात होते आणि तिला आता काही मित्र मैत्रिणी देखील झाले.आता मोना त्यांच्यात मिसळत होती, थोडी खुलत चालली होती. त्यांना देखील तिचा अभ्यासात फायदा होत होता. त्यांना आयत्या नोट्स मिळू लागल्या, जर्नल्स मिळू लागले म्हणून सर्व आता तिच्या मागे पुढे करू लागले.
आणि असच सर्व घडत असताना त्यांच्या ग्रुप मधील आशिष ची आणि तिची जास्त ओळख झाली..आशिष एकंदरीत सधन कुटुंबतील होता..त्याला असा अभ्यासात विशेष रस नव्हता परंतु घररच्यांच्या आग्रह खातर तो तिथे आलेला होता. आशिष दिसायला छान, उंच असा होता हातात पैसा खेळता होता म्हणून त्याला विशेष अनेक मुली भाव देत, त्याचा इतिहास बघता तो खूप सज्जन नव्हता. पण ह्या क्षणी तो कोणत्या मुली सोबत बंधनात नव्हता.  असे एकंदरीत असतांना मोना आणि आशिष ची अभ्यासाच्या निमित्ताने ओळख वाढली..तीचा त्याला अभ्यासात विशेष फायदा होत होता . तो देखील मोनाला मानसिक आधार देत कधी तिला पैश्यांचा प्रश्न निर्माण झाला तर त्या वेळी आशिष तिला मदत करत असे…त्यामुळे तिला आशिष चा विशेष आधार वाटू लागला.. ती कधीही काही प्रॉब्लेम झाला तरी आशिष कडे जात हळू हळू त्यांची मैत्री वाढत गेली..एकीकडे मोना त्याच्याबद्दल विचार करू लागली।पण आशिष च्या मनात तिच्याबद्दल विशेष असे काही नव्हते..त्याला फक्त अभ्यासात मदत म्हणून तो तिच्याशी अधिक चांगला वागत असे आणि माणुसकी म्हणून तिला मदत करत.
असेच दिवसामाघून दिवस जात होते.आता मात्र मोनाला आशिष शिवाय करमत नसे.प्रत्येक गोष्टी मध्ये तिला त्याची सवय झाली. काही करायचे म्हंटले कीं ती आशिष चे मत घेऊन च पुढे ते करत होती..असेच एक दिवस मोना ने आशिष ला बाहेर जाण्याबद्दल विचारले तो  देखील मैत्री खातर तयार झाला. मोना आता खूप खुश होती. कारण आज ते फक्त दोघेच बाहेर जाणार होते. आज ती एकदम छान तयार झाली. आशिष बाहेर गेटवर तिची वाट च बघत होता ती  लवकर गेटवर हजर झाली. मग दोघेही निघाले..,बाहेर जेवण करण्याचा त्यांचा प्लॅन झाला . आता मोना  आतून खूप घाबरली तिला भीती वाटू लागली काय करावे आशिष ला मनातील सांगावे कि नाही.कारण तीला भीती होती जर तो नाही म्हंटला तर ?? आशिष मात्र शांत च होता त्याला समजत नव्हते मोना का जास्त बोलत नाही..त्याने तिला एकेक विषय काढून बोलते केले. तेव्हा ती थोडी बोलली आणि तिचे दडपण कमी झाले. आता ते मस्त जेवले आणि पायी निघाले .तेव्हा मोना अचानक थांबली आणि म्हणाली मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे तेव्हा आशिष बिचकला कि असे काय झाले त्यावर मोना ने हळूच आपल्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा मात्र आशिष पुरता गोंधळून गेला त्याच्या साठी हे सर्व अनपेक्षित होते..त्याला काही समजत नव्हते काय सांगावे कारण त्याने तिच्याबद्दल असा विचार केलेला नव्हता आणि तो तिच्याशी अभ्यास साठी बोलत आणि त्या बदल्यात तिला मदत करत पण त्याला वाटले नव्हते की मोना याचा अर्थ असा लावेल आता मात्र तो टेन्शन मध्ये गेला काय करावे त्याला सुचत नव्हते त्याने तिला न दुखवता नंतर सांगेल असे वेळ म्हणून वेळ मारून नेली आणि ते निघाले. आता मात्र मोना विचार करू लागली की आशिष काय उत्तर देईल. ह्या सर्व मध्ये तिचे मात्र अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागले. एकीकडे आशिष देखील काय करावे ह्या विचारात पडला
तो रात्री हॉस्टेल ला येताच मित्रांनी विचारले काय रे कुठे गेला होतास काय झाले?? तेंव्हा आशिष ला समजेना काय करावे सांगावे कि नाही मग त्याने त्याच्या एक दोन जवळच्या मित्रांना  त्याने सांगितले ..अरे मोना ला मी आवडतो आणि तिने मला आज प्रोपोज केले यार मला समजत नाही काय करावे मग मित्र म्हणाला अरे तुला ती आवडते का?? तेव्हा आशिष ने संगीतले नाही माझ्या मनात तिच्याबद्दल असे काहीच नाही मला तिचा अभ्यासात खूप फायदा होतो म्हणून मी तिच्याशी जवळीक साधली असून त्या बदल्यात मी तिला वाटेल तेव्हा मदत करून सहानुभूती देतो अदर वाईज आय अँम नॉट इंट्रेस्टेड…आता मात्र मित्र चक्रावून गेले काय सांगावे…त्यातील एक मित्र म्हणाला अर्रे तिला तू स्पष्ट नाही सांगून दे..पण आशिष म्हणाला नाही रे मी एकदम असे नाही करू शकत.. किती झाले तरी अजून एक टर्म मला तिची मदत लागणार आहे. मी असे केले तर आमचं बोलणं बंद होईल आणि मला अभ्यासात मदत मिळणार नाही..आणि असाही तुमचा मला काही फायदा नाही उलट तुंम्ही देखील ती मला मदत करते त्यावर च पास होताय तर असे कसे करू मी..आता मात्र सर्वांना लक्षात आले…असे असेल तर एक कर  तू फक्त हो मी तुझ्यासोबत आहे असे सांग मात्र लग्न वगैरे ह्या बाबतीत काही वचन देऊ नको.. पुढे बघू असे म्हण..हे ऐकून आशिष ला थोडी कल्पना आली.. पुढे जाऊन कसे वागायचे याबद्दल…
एकीकडे मोना मात्र याच विचारात होती काय होईल !!अशिष हो म्हणेल का वगैरे…सकाळ होते आता मोना आवरून कॉलेज ला निघते.. मात्र तिची नजर आशिष ला च शोधत असते..ती बाहेर बसते तेवढ्यात आशिष येतो..हाय मोना काय करतेय?? तेव्हा ती थोडी भानावर येते आणि खुश होऊन विचारते आशिष काय ठरवले तू माझ्याबद्दल..आता आशिष ची पाळी असते वेळ मारून नेण्याची.. तो म्हणतो हो मला पण तू आवडते पण मी तुला हे नंतर सांगणार होतोच आता माझी हिम्मत नव्हती..
आता मोना मात्र हवेत च जाते..””आज में उपर आसमा निछे” अशी तिची परिस्थिती होते.. मग ते दोघे सोबत वर्गात जातात..
अशा प्रकारे त्याचं फिरणे, अभ्यास,पार्टी असे प्रकार चालूच असत ..मोना पाहिजे तसं सर्व मदत अशिष् ला अभ्यासात करत होती..पण तिचा आता अभ्यास कमी पडत होता..वेळोवेळी आशिष तिला अभ्यास बद्दल जाणीव करून फिरण्याला नकार देत.. त्याची पण आता ओढाताण होत होती हे सर्व मॅनेज करता करता..कारण मोना गावाकडील आणि साधी असल्याने त्याने तिच्याबद्दल तस कधी विचार केलेला नव्हता..तसेच त्याचे घर कडील अनेक श्रीमंत मित्र मैत्रिणी असल्याने त्याला मोना आवडणे म्हणजे त्याला पटणारे नव्हते…हा मात्र एकेक दिवस ढकलत होता

मोना एकीकडे प्रेमात आंधळी झाली होती..ती आपल्या घरची परिस्थिती विसरत चालली होती.. हळूहळू हि बातमी कॉलेज मध्ये पसरत चालली होती.. काही मुलींनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण मोनाच्या डोळ्यावर आंधळ्या प्रेमाची झापड होती.. अभ्यासात ती कमी पडली होती. तिचा पहिला नंबर बराच घसरला होता…”चॅटिंग करणे ,कधी फिरायला जाणे ह्या मधेच ती आता खुश असे…आता आशिष ने सांगितले शेवट चे दिवस छान अभ्यास  करून आम्हाला देखील मार्गदर्शन कर असे सांगितले तेव्हा ती तयार झाली. पण ती त्याला नेहमी विचारे आपले भविष्य काय पुढे आपण लग्नाबद्दल कधी जास्त बोललो नाही तेव्हा आशिष ने तिला अभ्यास कडे लक्ष द्यायला सांगून पुढचं पुढे असे म्हणून वेळ मारून नेली..
मोना सतत आशिष चा विचार करत आणि स्वताला नशीबवान समजत कि आशिष एवढ्या मोठ्या घरचा असून माझ्यासारख्या गरीब मुलीला स्वीकारले..पण वास्तविकतेची तिला थोडी देखील चाहूल नव्हती
असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि परीक्षा जवळ येत होत्या आणि सर्व आता पूर्ण आता अभ्यासात गुंतले होते.. सर्वांचा अभ्यास सुरू होता मोना मात्र अभ्यासात थोडी मागे पडली होती.. आल्यावर जस तीच यश होत ते बरच कमी झालेला होत..परंतु तिचे प्रयत्न सुरु होते.. आता ऐन परीक्षेची वेळ आली..स्वतः अभ्यास करुन आशिष ला मार्गदर्शन करून  त्यांची आता वेळ आली होती पेपर ची.. झाले बघता बघता परीक्षा संपली म्हणजेच कॉलेज चे शेवट चे वर्ष संपले.. सर्व आता आपल्या पुढच्या वेगवेगळ्या मार्गाला लागणार होते.. त्यामुळे सर्व आनंदा सोबत दुःखी देखील होते.सर्व एकमेकांपासून लांब जाणार..मोना तर खूपच दुःखी कारण गावाकडे गेल्यावर आता तिचे भेटणे कठीण होते आणि तिला माहिती होते गावाला गेल्यावर नक्कीच लग्नाचा विषय निघणार.पण जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. आशिष आणि ती बाहेर फिरायला गेले..आता मात्र आशिष ला सांगावे वाटत होते की माझे तुझ्यावर प्रेम नाही पण मला मजबुरीने तुला तसे तेव्हा सांगता आले नाही पण तो थांबला.
आता वेळ झाली सर्वांची घरी जाण्याची.. मोना आशिष ला पुढचं सर्व लवकर ठरवूया असे सांगत लवकर लग्न करू काहीतरी प्रयत्न  कर असे बजावून निघाली..
आशिष थोडा मनातून खुश देखील होता कारण हे सर्व सांभाळताना त्याचे स्वातंत्र्य थोडे कमी झाल्यासारखे वाटले आणि त्याची दमछाक देखील होत होती. आता तो घरी आला. मोना घरी गेल्यापासून त्याला थोडा थोडा वेळात फोन मेसेज करत होती,..आशिष जमेल तस बोलत असे..काही दिवसात आशिष बोर झाला ..आता मात्र तो तिला टाळू लागला ..मोनाच्या घरच्यांना देखील तिचे वागणे खटकत होते..तिच्यातील बदल जाणवत होता पण ती कोणालाही काही सांगत नव्हती..घरच्यांना आता तिच्याबद्दल अनामिक असे टेन्शन होते. एकीकडे आशिष चे टाळणे सुरु च होते,..एके दिवशी दोघा मध्ये जोरात भांडण झाले तेव्हा मात्र आशिष चा तोल सुटला आणि त्याने रागात तिला सर्व खरे सुनावले..,हे सर्व ऐकून मात्र मोना च्या पायाखालची जमीन सरकली तिला आता काहीच समजत नव्हते ती जे ऐकतेय ते खरे आहे की जे अनुभवले ते.. आशिष ने फोन कट करून तो नंबर कायमचा बंद केला इकडे मोना वेड्यासारखं वागत होती.. सारख फोन लावणे ,मेसेज करणे हेच चालले होते.. पण तिला तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.. आता ती पूर्ण खचली.. तिने जेवण बंद केले..झोपून राहू लागली.घरात कोणाशी बोलेना आता घरच्यांची पूर्ण खात्री पटली काहीतरी मोठे घडल्याची.. त्यांनी मोनाला खूपदा विचारले ती कोणाशी काहीच बोलत नव्हती तिची मनस्थिती ढासळत चालली होती. आता परिस्थिती हाताबाहेर चालली होती.  ती एक सारखं आशिष बद्दल विचार करत होती..
घरच्यांना तिची अवस्था बघवत नव्हती.त्यांनी तिला काहीच दिवसात एका मानसोपचार तज्ञा कडे बळजबरी  नेले.. तिथे देखील ती शांत होती पण 2 4 भेटी मध्ये डॉक्टरांनी तिला बोलते केले..आता घरच्यांना परिस्थिती कळली..डॉक्टरांनी तिला अनेक असे सल्ले उपदेश केले…हेच म्हणजे जीवन नाही आज तुम्हाला कोणी नाकारले म्हणून तुंम्ही रडत बसू नका त्यावर मात करून सफल व्हा आयुश्यात ती  व्यक्ती सोडून आपले आई वडील कुटुंब हे देखील खूप महत्वाचे असून त्यांना तुमच्या असण्याची जाणीव आहे व तुमच्या दुःखात ते नेहमी सहभागी असतात त्यामुळे त्याचा विचार करणेहे आपले प्रथम कार्य आहे..अश्या अनेक गोष्टींनी डॉक्टरांनी तिला त्या परिस्थिति तुन बाहेर काढून तिचे आयुष्य वेळीच सावरले…

( कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध नाही असल्यास योगायोग समजावा..)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत