आईची माया (भाग -1)

Written by

 

 

@अर्चना अनंत धवड ✍️

रोहित अणि रोमा च्या लग्नाला चार वर्ष झाली होती. आता कुठे बाळाची चाहूल लागली होती. दोघेही खूप आनंदी होते. रोहित रोमा ची खूप काळजी घ्यायचा. नऊ महीने रोमा ला फुलासारखे जपले. बाळ पोटात हालचाल करीत असे तेव्हा रोहित कुतूहलाने पोटाला स्पर्श करायचा. रोहित नी बाळाचे नाव पण ठरवून ठेवले होते. तो रोमा ला म्हणायचा “मुलगा झाला तर स्पर्श… अणि मुलगी झाली तर तु ठरवायचे”. बाळंतपणासाठी अगदी एक महिन्याची रजाच घेतली होती रोहित नी…. त्याला बाळा सोबतचा प्रतेक क्षण अनुभवायचा होता…

बाळंतपणासाठी, रोमा ला मोठ्या सरकारी दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. तिला प्रसववेदना सुरू झाल्या होत्या. लेबर रूम मध्ये रोमा वेदनेने विव्हळत होती. रोहित काळजीनं लेबर रूम समोर फेर्‍या मारू लागला. ईतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. रोहित ला खूप आनंद झाला. नर्स बाळाला घेऊन स्वच्छ करण्यासाठी ड्रेसिंग रूम मध्ये जात होती. रोहित बाहेर उभा होता. नर्स म्हणाली बघा तुमच बाळ. मुलगा झाला. रोहित ते गोर गोर गुटगुटीत बाल बघून हरखून गेला. सिस्टर म्हणाली पेढे वाटा. अणि रोहित पेढे आणायला पळाला .

तिकडे सिस्टर नी बाळाला बाईकडे स्वच्छ करायला दिले…. अणि स्वतः फ्रेश व्हायला गेली . ड्रेसिंग रूम मध्ये अशी व्यवस्था होती कि तिथे तीन चार अटेंडेंट (बाई) ची डय़ुटी असायची अणि बाळंतपण झाल की नर्स बाळ त्या अटेंडेंट ला द्यायची अणि आपण दिलेले बाळ परत त्या बाईकडून घेऊन बाळाच्या आईला द्यायची..

इकडे सलमा ला पण मुलगा झाला. सलमा अणि सलीम चे पण पहिलेच बाळ होते. ड्रेसिंग रूम मध्ये त्याला स्वच्छ करून पळण्यात ठेवले होते. रोहित चे बाळ आणणारी नर्स फ्रेश होऊन आली अणि पाळण्यातून बाळ उचलले अणि रोमा जवळ नेऊन दिले. नंतर सलमा च्या बाळाला आणणारी नर्स आली अणि पाळण्यातले बाळ उचलले . तिला थोडी शंका आली. ती म्हणाली मी आणलेले बाळ हेच आहे ना. बाई पण गडबडली. तिलाही थोडी शंका आली. पण प्रकरण आपल्या अंगावर येऊ शकते. अणि तसेही बाळ कुणीही बघितले नाही. तसेही लहान मुले सारखीच दिसतात.

ती म्हणाली होय सिस्टर, हेच बाळ दिल होत तुम्ही. अणि तीने ते बाळ सलमा जवळ नेऊन दिल. सलीम आणि सलमा नी बाळ आधी बघीतलेच नव्हते.

रोहित पेढे घेऊन आला. सगळ्याना पेढे वाटले अणि शेवटी रोमा जवळ गेला. रोमा बाळाला घेऊन झोपली होती..

“बघ आपला स्पर्श ” रोमा

रोमानी बाळाला रोहित च्या हातात दिले… रोहित नी बाळाला घेतले.. अणि पटकन खाली टाकले…

“रोमा हे आपले बाळ नाही” रोहित

“रोहित काय बोलतेस तू… अरे आपलं बाळ आहे” रोमा

“नाही रोमा हे आपल बाळ नाही . मी आपले बाळ बघितले होते. ते हे नाही “रोहित …

रोमा ला काय झाले काही कळत नव्हते . रोहित नी दवाखान्यात खूप गोंधळ घातला. डॉक्टरांनी नर्स अणि बाईला उभे केले . त्या म्हणाल्या की हेच तुमचे बाळ आहे. पण रोहित मानायलाच तयार नव्हता.

रोहित वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटला . तो काकुळतीला येऊन सांगत होता.  “सर, हे माझ बाळ नाही. तुम्ही चौकशी करा”.

” अरे ते तुझेच बाळ आहे . सगळे डॉक्टर, सिस्टर, बाई सांगते ना. ते तुझाच बाळ आहे” अधिकारी

” नाही सर ते माझ बाळ नाही अणि मी ते नेणार नाही” रोहित

” ठीक आहे आपण चौकशी समिती स्थापन करू. तो जो निर्णय देतील तो तुला मान्य करावा लागेल” अधिकारी

” ठीक आहे “रोहित

“पण तोपर्यंत मी ते बाळ नेणार नाही “रोहित .

” ठीक आहे. बघू या” अधिकारी .

रोहित रोमा जवळ आला . बाळाला नर्स वाटीने दूध पाजत होती कारण रोहित नी तिला दूध पाजण्यासाठी मनाई केली होती . रोहित नी रोमा चा हात धरला आणि म्हणाला चल आजच आपण जाऊ या. रोहित रोमा जायला निघाले . बाळ जिवाच्या आकांताने रडायला लागले. रोमा दारा पासून धावत आली बाळाला पदरा खाली घेतले. बाळ शांत झाले.

रोमा म्हणाली, हे बघ हे आपल बाळ नाही . ठीक आहे पण कुणीतरी आपल बाळ सांभाळत असेल ना. जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यत मी याला सांभाळेल ..  मी याची यशोदा होईल आणि हा माझा गोविंदा. ते बाळाला घरी घेऊन गेले…

चौकशी समिती बसली. त्या वेळी कुणा कुणाला बाळ झाले याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सलमा अणि रोमा दोघींना बाळ झाले होते. सलमा अणि सलीम ची चौकशी करण्यात आली. पण त्यांनी सांगितले की हे आमचेच बाळ आहे. रोहित ला जेव्हा बाळ दाखविले तेव्हा रोहित नी बाळाला ओळखले परंतु त्याच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. शेवटी चौकशी समितीचा निकल लागला. बाळाची अदला बदल झालेली नाही.

क्रमशः

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

  • धन्यवाद
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा