आईची माया (भाग -2)

Written by

 

 

@अर्चना अनंत धवड ✍️

मागील भागात आपणास माहिती आहे की सिस्टर अणि बाई च्या चुकीमुळे बाळाची अदलाबदल होते… परंतु हॉस्पिटल प्रशासन आपली चूक मानायला तयार नसते…. त्यामुळे नाईलाजाने रोहित ला बाळाला घरी आणावे लागते….. पूर्णपणे स्टोरी समजण्यासाठी भाग 1 वाचा)

रोहित बाळाला घेऊन घरी आला खरा, पण त्याच्या नजरेसमोर त्याच बाळ येत होत. आपल बाळ एका मुस्लिम कुटुंबात वाढत, याची आठवण जरी झाली तरी तो रात्र रात्र झोपत नव्हता. तो बाळाकडे ढुंकूनही पाहत नव्हता. रोमा त्याला पदराआड घ्यायची अणि विसरून जायची की हे आपल बाळ नाही. रोमा बाळाच्या संगोपनात रमून गेली होती…

रोहित ला स्वस्थ बसवत नव्हते. त्यानी कोर्टात केस केली. तोपर्यंत बाळ सहा महिन्याचे झाले होते… कोर्टाची तारीख पे तारीख सुरू होती. कोर्टाने परत चौकशीचे आदेश दिले. परत केस सलमा पासून सुरू झाली . सलमा चा अमीर पण मोठा झाला होता… तारीख पे तारीख करता करता तीन वर्ष लोटली . रोमा नी बाळाचे नाव गोविंदा ठेवले होते. गोविंदा आता बोबडे बोलायला लागला होता. दुडदुडू चालायला लागला होता. रोहित ला बाबा बाबा करायला लागला होता. सुरवातीला रोहित दुर्लक्ष करायचा . पण गोविंदा जेव्हा त्याच्या पाठीवर छोट्या छोट्या हातानी बाबा बाबा म्हणुन ठोकायचा तेव्हा त्याला गहिवरून यायचे. त्याला वाटायचे की झाल्या प्रकारात बाळाचा काय दोष. अणि असाच एकदा तो दुडदुडू धावत रोहित च्या मांडीवर जाऊन बसला. रोहित ने त्याला उचलले छातीशी धरले अणि पटापट मुके घेतले. आता रोहित पण बाळाचा लाड करायला लागला होता

तिकडे अमीर पण सलमा कडे कौतुकात वाढत होता. कोर्ट ची केस सुरुच होती.. शेवटी कोर्टाने डीएनए तपासणीचा आदेश दिला. दोन्ही बाळाची अणि आई वडिलांची डीएनए तपासणी झाली. तपासणीत सिद्ध झाले की गोविंदा सलीम चा अणि अमीर रोहित चा मुलगा आहे.

रोहित ला केस जिंकल्याचा आनंद झाला पण क्षणभरच . तो गोविंदाला सोडण्याचा विचारही करू शकत नव्हता. पण ज्या गोष्टी साठी आपण एवढी शक्ति अणि वेळ घालवला त्यापासून माघार घेणे त्याला कमीपणाचे वाटत होते. शेवटी कोर्टाच्या निकाला प्रमाणे त्यांना बाळाची अदलाबदल करायची होती. रात्रभर रोमा अणि रोहित विचारामुळे झोपू शकले नाही.

रोमा म्हणाली, अस वाटत उगीच आपण कोर्टात गेलो. रोहित शांतपणे ऐकत होता.. तो म्हणाला हे बघ आता कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल.

दुसर्‍या दिवशी बाळाच्या सामानाची पॅकिंग केली .दोघांनी बाळाचा खूप लाड केला. अणि बाळ घेऊन कोर्टात गेले.

तिकडे सलीम अणि सलमा पण रडून रडून बेहाल झाले होते. त्यानी अमीर चे समान पैक केले अणि अमीर ला घेऊन कोर्टात गेले. न्यायालयासमोर बाळाची अदलाबदल केली. दोन्ही बाळे आपल्या खर्या आईकडे जायला तयार नव्हती. दोघांनी खूप आकांत केला. कसतरी बळजबरीने ते आपआपल्या बाळाला घेऊन गेले. रात्र भर दोन्ही बाळे रडत होती. अणि आपण सांभाळलेल्या बाळाच्या आठवणीने आई वडील. रोमा म्हणाली आपण गोविंदाला परत घेऊन यायचे का.

“अग पण ते देतील का… आपणच कोर्टात गेलो अणि आपणच अस वागलो तर लोक आपल्यावर हसतील” रोहित

” मी गोविंदा शिवाय नाही राहू शकत” रोमा

“.हो ग, बरोबर आहे तुझ. मी पण नाही राहू शकत” रोहित .

तिकडे गोविंदा नी रडून रडून गोंधळ घातला होता अणि इकडे अमीर नी रात्रभर झोपू दिल नाही. शेवटी दुसर्‍या दिवशी सलीम अणि सलमा गोविंदा ला घेऊन रोहित च्या घरी आले. गोविंदा धावत रोमा कडे आला अणि अमीर सलमा कडे गेला. सलमा म्हणाली, हे पहा तुम्हाला अमीर ला नसेल द्यायचे तर नका देऊ पण तुम्ही गोविंदा ला घ्या . मी त्याचा आक्रोश नाही पाहू शकत.

“आम्ही पण तेच म्हणणार होतो. पण कोणत्या तोंडाने म्हणायच म्हणुन चुप होतो. आमचा गोविंदा आम्हाला द्या अणि तुमचा अमीर तुम्ही घ्या” रोहित

रोहित नी गोविंदाला उचलले त्याची कपाळाची पापी घेतली अणि म्हणाला माझा स्पर्श….

समाप्त…..

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

धन्यवाद

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत