आईची सकारात्मकता

Written by

आणि नृत्य स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आहे सायलीने…. सायली साठी जोर दार टाळ्या वाजवा रे…. अशी घोषणा झाली…. सायलीच्या आईने विद्याने सायली ला खुणावले… मग सायली स्टेज कडे गेली…. आणि राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तिने भरतनाट्यम नृत्य करून पहिले बक्षीस मिळवले होते….. विद्या च्या डोळ्यात आनंदाश्रू होते….

विद्या एकदम भूतकाळात गेली……

विद्या चे महेश शी लग्न झाल्यानंतर चार वर्ष त्यांना मूल बाळ नव्हतं…. दवाखान्यात खूप उपचार केले पण दिवस काही राहीनात म्हणून सगळी मंदिरे पालथी घातली, धागेदोरे घातले….मग कंटाळून सगळं सोडून दिलं आणि नेमकं याच वेळी तिला दिवस गेले…..

घरी सगळ्यांना खूप आनंद झाला…. घरच्या मंडळींनी खूप काळजी घेतली….. दिवस भरले…. बाळाने पोटात शी केली म्हणून सिझेरियन करावे लागले…… आणि गोड, गोंडस अश्या सायलीचा जन्म झाला…..

जन्म झाल्यावर सायलीचे रडणे इतर बाळांसारखे नव्हते…. फरक लक्षात येण्यासारखा होता….. सायलीला शांत करण्यासाठी जेव्हा तिच्या बाबांनी टाळी वाजवली तेव्हा लक्षात आले की सायलीला ऐकू येत नाहीये…. काही तपासण्या केल्यावर लक्षात आले की सायली मुकी आणि बहिरी आहे…..
विद्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी हा जबरदस्त मानसिक धक्का होता…. विद्याचे तर हात पाय गळून गेले होते….. सायलीचे वडील एका कोपऱ्यात जाऊन खूप खूप रडले….सगळ्या घरामध्ये आनंदा ऐवजी दुःखाचे वातावरण तयार झाले…. पण आपण दुःख दाखवले तर सगळेच खूप परेशान होतील म्हणून सायलीचे बाबा विद्याला म्हणाले होईल सगळं ठीक…..

हळूहळू सगळेच जण सायली सोबत रुळू लागले होते… ती ही खूप हुशार होती…. ती अश्या प्रकारे वागत होती की ती मुकी बहिरी आहे असं जाणवतही नव्हतं….सायलीची शक्ती म्हणजे तिला लागणारी कुठलीही चाहूल…….सायली आता चार वर्षांची झाली होती….

तिला मूकबधिर शाळेमध्ये घातले गेले…. तीथेही ती अगदी प्रथम क्रमांक मिळवत होती….

एक दिवस विद्या टेलीव्हीजन वर नृत्याचा कार्यक्रम बघत असताना सायली नुसतं बघूनच नृत्याचा ठेका धरत होती…. विद्याच्या ते लक्षात आले….

घराच्या बाजूलाच भरतनाट्यम चे क्लासेस चालत असत… विद्या सायलीला क्लास ला घेऊन गेली….सुरुवातीला नृत्याच्या गुरूंना सायलीला बघून तिला शिकवणे अवघड वाटले…. पण क्लास मधील मुलींना बघून ती ज्या प्रकारे ताल धरत होती ते पाहून नृत्य गुरूंनी सायलीला फक्त भरतनाट्यम शिकवण्याचे नाही पण वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्याचे आव्हान स्वीकारले होते….

आणि आज ते सर्व साध्यही झाले होते… सायली सोबत आता विद्यालाही स्टेज वर बोलावण्यात आले……आणि टाळ्यांच्या गजरात दोघींचं कौतुक होत होते….

ह्या सगळ्यांना तिच्या आईची सकारात्मकताच कारणीभूत होती ना….

कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा
©® डॉ सुजाता कुटे

Article Categories:
इतर

Comments are closed.