आईतली मैत्रिण

Written by

आईतली मैत्रिण

“चिनु, चल आवरलं का ? नंतर उशीर झाला तर माझ्या नावाने बोंबाबोंब करतेस.”
“हो ग आई”
“टिफिन घेतलास?”
“हो,घेते.” टेबलवरचा टिफिन बॉक्स बॅगेत उचलून बॅगेत टाकण्याआधी तिनं तो उत्सुकतेनं उघडुन पाहिला.
“हे काय! पालकची भाजी ” डब्यातली पालकची भाजी आणी चपाती पाहुन चिन्मयीचा चेहरा हिरमुसला.
“मम्मी काय गं हे,आय डोन्ट लाईक इट.”ती नाराजीच्या सुरात आईला म्हणाली.
“हो गं,पण पीरियडसच्या दिवसात असं पौष्टिक अन्न खावं. शरिरातील अशुद्ध रक्त बाहेर पडताना शरिराला उर्जेची मोठ्या प्रमाणात गरज असते. एकुणच तुमच्या वयाच्या सर्वच मुलांनी खुप प्रोटिन्स,मिनरल्स ज्यातुन मिळतात असे पदार्थ खायला हवेत.”
“ओ,मम्मी नॉट अगेन.” आपल्या दोन्ही कानांवरती हात ठेवत तिने मानेने आईच्या बोलण्याला ‘नो’ म्हटलं.
“मम्मी,आय नो.हे सर्व तू मला खुप पुर्वी सांगितलं आहेस.पीरियडस म्हणजे काय इथपासुन काय खावं- प्यावं इथपर्यंत.हा तेव्हा फस्ट टाईम इंन्टरेस्टिंग वाटलं होतं ऐकायला बट आता नको.”
“ओ.के…..ओ.के..” म्हणत आईने शरणागती पत्करली.
टिफिन बॉक्स उचलुन तिनं बॅगेत कोंबला.दारावरची बेल वाजली तशी तिने बॅग पुन्हा चेक केली. “चल,बाय सि.यु. निमिषा आली.” विजेच्या वेगाने दार उघडुन ती निमिषा सोबत गेलीसुद्धा. चिन्मयीची आई मात्र गॅलरीतुन त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बराचवेळ पाहत राहिली.
चिन्मयीचं हल्ली बदलेलं वागणं तिला अस्वस्थ करत होतं. किती मोठी झाली ना चिनु! तिला आठवली ती नर्सरी स्कूलमध्ये तिचा हात पकडून पाउल टाकणारी चिनू. आपला चिमुकला हात तिच्या हातातुन सुटताना आई जाऊ नको हा घरि मला सोडून असं निरागसपणे बोलणारी चिनू. पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर रोज आदित्यच्या बाईकवर आपल्या दोन्ही हातांनी त्याला घट्ट बिलगून बसणारी, बाईक स्टार्ट झाल्यावर इमारतीच्या गॅलरिकडे पाहून आईला टाटा करणारी चिनु. किती खात्री असायची ना तिला मी गॅलरीतून तिला पाहतेय! रेल्वेस्टेशन,भाजी मंडई अगदि देवळातही तिचा हात सतत माझ्या हातात देणारी चिनु! आई आपल्यासोबत आहे हा विश्वास असायचा त्या स्पर्शात. हल्ली सगळं बदललंय पण अचानक बदलंल कि चिनु मोठी झाली. छे! मोठी कुठे आता तर चौदा वर्षांची आहे ती! तरि हल्ली तिच्या सोबत कसं वागावं हेच समजत नाही. कधी, कोणत्या गोष्टींवरून चिडेल, रागवेल सांगता येत नाही. आता परवाचीच गोष्ट, शाळेतुन घरि आली तीच उड्या मारत. खुशीचं कारण म्हणजे दोन दिवसांची शाळेची सहल जाणार होती माथेरानला. मी आढेवेढे न घेता दुसर्‍या दिवशी फि चे पैसे आणि परवानगीपत्रावरती सही देखील दिली. बोलता बोलता म्हटलं कि,’परमिशन तर आम्ही दिली पण तो दर्‍याखोर्‍याचा भाग आहे.उगीच कुठेतरी जाऊन सेल्फि काढु नका.” या वाक्यावरती ती भडकली आणी तडातडा निघून गेली. रोजचं झालंय तिचं असं वागणं. अर्थात मी पूर्ण वेळ घरि असते म्हणून मला ते आदित्यपेक्षा जास्त जाणवतं असं त्याचं म्हणणं असतं. शेअरिंग करायला, खेळायला दुसरं भावडं नाही एकटीने वाढण्याचा परिणाम असेल का हा. आदित्यची तेव्हा नवी नोकरी होती. तुटपुंज्या पगारात मुंबईत राहणं,मुलांना वाढवणं सोप नाही म्हणून एकच अपत्य असावं हा निर्णय आमचा होता. बरेच उलट सुलट विचार तिच्या मनावर आदळत होते. चिनू हळूहळू मोठी होतेय हे तिच्या लक्षात येतं होतं. गृहिणी असली तरि ती सुशिक्षित,जागरूक पालक होती. बर्‍याच विचारांती ती एका निष्कर्षापर्यंत येऊन पोचली. रात्री आदित्यच्या कानावर या सार्‍या गोष्टी घातल्या. चिनूचं बदललेलं वागणं,वाढत वय यावर त्यांच्यातही बर्‍यापैकी चर्चा झाली. तिच्या निर्णयावरती आदित्यनेही आनंदाने ‘गो अहेड’ चा हिरवा कंदिल दिला.

क्रमशः
Like, Comment & Share with author name
Stay tunned for 2nd part

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.